Sharad Pawar, Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

MVA Meeting : ठाकरेंचे सहा खासदार फुटले! महाविकास आघाडी सावध, बैठक सुरू: शरद पवार उपस्थित राहणार!

Uddhav Thackeray Harshvardhan Sharad Pawar : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक मुंबईत सुरू आहे. पुढील रणनीती या बैठकीत ठरवली जाणार असल्याची माहिती आहे.

Roshan More

Uddhav Thackeray News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेते सावध झाले आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. या बैठकीला शरद पवार हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

पावसळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थितीसोबतच विविध राज्यातील प्रश्न या सगळ्या संदर्भात बैठक होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ठाकरेंच्या सहा खासदारांच्या फुटी नंतर बदललेल्या राजकीय परिस्थिवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित आहेत. तर, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील उपस्थित आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंसोबत भास्कर जाधव देखील उपस्थित आहेत.

राज्यस्तरावरची आता कोणतीही मोठी निवडणूक लगेच नाही. मात्र, ठाकरेंचे खासदार फुटल्याने राजकीय परिस्थिती बदललेली आहे. या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी एकसंध ठेवणे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचा रोडमॅप काय असावा याविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.

ठाकरे अ‍ॅक्टिव्ह मोडवर

उद्धव ठाकरे हे पुन्हा मैदानात उतरल्याचे दिसत आहे. आज होणाऱ्या बैठकीला ते उपस्थित राहिले आहे. तर, फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघाचा ते दौरा करणार आहेत. तेथील राजकीय परिस्थितीचा आढाव घेत ते संघटनात्मक ताकद मतदारसंघात कायम ठेवण्यासाठी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT