Mumbai News : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सध्या निवडणुकीची तयारी केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटपाची बोलणी सुरु आहे. जागावाटप आणि निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. तर, उमेदवारीसाठी इच्छुकांकडून वरिष्ठांची भेट घेतली जात असल्याने राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसापासून तापले आहे.
महायुतीमधील जागावाटपावरुन दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. विशेषतः गेल्या काही दिवसापासून भाजप (Bjp), शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातच जागावाटपाची चर्चा सुरु आहे. या तीन पक्षांची जागावाटपाची चर्चा पूर्ण झालेली नाही. त्यामुळे छोट्या मित्रपक्षांना अद्याप जागावाटपासाठी येण्याचे बोलावणे आले नाही. त्यामुळे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी महायुतीत आम्ही असलो तरी आम्हाला अजून कोणी चर्चेसाठी बोलावले नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
महायुतीच्या जागावाटपाची चर्चा गेल्या काही दिवसापासून रखडलेली आहे. त्या तीन जणांचे मिटत नसल्याने आमच्यापर्यंत अजूनही कोणी आलेले नाही. आम्हाला आमची ताकद आहे त्या जागा मिळाव्यात. आम्ही 34 ते 35 जागा आम्हाला मिळायला हव्यात, अशी आमची मागणी आहे. जर आम्हाला बोलावणं आले नाही तरी आम्ही आमच्या बळावर 288 जागा लढायला मोकळे आहोत असेही महादेव जानकर यांनी स्पष्ट केले आहे.
मी माझ्या पायावर खंबीर आहे. मी माझ्या ताकदीने दहा ते बारा आमदार निवडून आणू शकतो, असे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांची महादेव जानकर यांनी भेट घेतली होती. त्यांना जागा देण्या संदर्भात चर्चा देखील सुरु होती. त्यानंतर महायुतीने सन्मानजनक जागा दिल्या होत्या. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीत जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे
महाविकास आघाडी जरा जास्तच हवेत
आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी जरा जास्तच हवेत आहे. त्यामुळे त्यांच्यासॊबत जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.