Mahadev Jankar
Mahadev Jankar Sarkarnama
महाराष्ट्र

Mahadev Jankar News : महादेव जानकरांना हव्यात विधानसभेच्या 50 जागा ; विधानपरिषद अन् राज्यसभेबाबतही केलंय विधान, म्हणाले...

Mayur Ratnaparkhe

Mahadev Jankar on Maharashtra Vidhan Sabha Elections : आधीच महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमधये विधानसभेच्या जागांवरून रस्सीखेच सुरू असताना, आता महादेव जानकरांकडून विधानसभेच्या 50 जागांची मागणी महायुतीकडे केली आहे. जानकरांनी केल्या या मागणीमुळे महायुतीचं टेन्शन वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

महादेव जानकर(Mahadev Jankar) यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी 50 जागा हव्या आहेत. तर जानकरांच्या या मागणीमुळे महायुतीमधील विधानसभेच्या जागा वाटपाचा तिढा आणखी वाढणार असल्याचं दिसत आहे.

याशिवाय जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने 104 जागांवर स्वबळावर लढण्याची तयारीही केलेली आहे. मात्र जानकरांनी 200 जागांची तयारी आपण केली पाहीजे, तेव्हाच कुठं मित्र पक्ष आपला विचार करतील. असं म्हणत एकप्रकारे महायुतीला सूचक इशाराच दिला आहे. याशिवाय राज्यात विधानपरिषदेच्या अकरा जागांपैकी एक जागा आणि राज्यसभेतील एक जागा मिळाली पाहीजे, अशी मागणी जानकरांकडून केली गेली आहे.

महादेव जानकरांचाही विधानपरिषदेचा कार्यकाळ संपत आला आहे, त्यामुळे त्यांना महायुतीकडून काय आश्वासन दिलं गेलं आहे, हे जेव्हा मीडियाकडून विचारलं गेलं तेव्हा जानकर यांनी सांगितलं की, 'लोकसभेला आम्हाला सांगितलं होत, की राज्यसभा, विधानपरिषद देवू. त्यामुळे ते आम्हाला मिळेल.

तसेच, ज्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्याशी आमचं बोलणं झालं होते, त्याच्याकडूनच आम्हाला राज्यसभेबाबतचा शब्द दिला गेला होता. भाजप आपला शब्द नक्कीच पाळेल, असा मला विश्वास आहे. कारण, आजपर्यंत पाळलेला आहे. मला मंत्री करतानाही पाळला होता आणि विधानपरिषदेची जागा देतानाही पाळला होता.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT