छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मतमोजणी केंद्रात झालेल्या गर्दीवर पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये माजी महापौर विकास जैन आणि काही शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याने पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या व उमेदवार हर्षदा शिरसाट आक्रमक झाल्या असून लाठीमार करणाऱ्या पोलीसांवर कारवाई करा, अन्यथा मतमोजणी होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकमेव कोल्हापूरमध्ये मी सगळ्यांना आम्ही म्हणा असं सांगणार आहे, कारण आम्ही सगळ्यांनी मिळून कोल्हापूरमध्ये महायुती केली. त्यामुळे कोल्हापूरमध्ये ८१ पैकी ६५ जागा महायुतीला मिळतील, असा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
मालेगावातील वखार महामंडळ गुदाम येथे मालेगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २, ४, ५, ८, ११, १२, १३, १५, आणि १७ या प्रभागांची, आयएमए हॉल १, ९, १० या प्रभागांची, छत्रपती शिवाजी जिमखाना येथे ३, ६, ७, १४, १६, १९ या प्रभागांची तर कृष्णा लॉन्स १८, २०, २१ या प्रभागांची मतमोजणी होणार आहे.
पुण्यात निकालाआधीच गणेश बिडकर यांच्या विजयाचे बॅनर लागले असून त्या बॅनरवर बिडकर यांचा 'महापौर' साहेब असा उल्लेख करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांसाठी आभारपत्र लिहित आभार मानले आहेत. 'लोकशाहीचा हक्क बजावत उत्स्फूर्तपणे मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानतो, अजित पवार यांनी मानले मतदारांचे आभार', मतदान केंद्रांवर सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीबद्दलही मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अशा शब्दात अजित पवारांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
पुणे महापालिका प्रभाग निहाय मतदानाची मध्यरात्री उशिरापर्यंत उपलब्ध झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे
१ - ५२.९०
२ - ५०.२८
३ - ५४.१२
४ - ५६.६५
५ - ५१.४३
६ - ५४
७ - ४९.७६
८ - ४५.१२
९ - ५२.९३
१० - ५५.०५
११ - ५६.६८
१२ - ४९.३२
१३ - ५०.४५
१४ - ५२.१३
१५ - ५५.८८
१६ - ५१.९८
१७ - ४९.९१
१८ - ४५.५४
१९ - ४७.९७
२० -५३.५०
२१ -५०.९७
२२ -५३.४९
२३ -५१.९७
२४ -५४.७५
२५ -५४.००
२६ -५२.५२
२७-५२.००
२८-५४.००
२९ -५१.३४
३०- ५५.५२
३१ - ५२.०७
३२ - ५५.३९
३३ - ५८.८१
३४ - ५४.९२
३५ - ४८.५९
३६ - ५४.६
३७ - ४९.०९
३८ - ५४.०१
३९ -५२
४० -५०
४१-४९.७८
पुणे शहरात ४१ प्रभागातील १६३ नगरसेवकांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न
१८ लाख ६२ हजार पुणेकरांनी बजावला मतदानाचा हक्क
सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग कमी मात्र संध्याकाळी मोठ्या संख्येने पुणेकर पडले बाहेर
एकूण मतदार: १८ लाख ६२ हजार ४०८
पुरुष मतदार: ९ लाख ७३ हजार ५०३
महिला मतदार: ८ लाख ८८ हजार ८०९
इतर मतदार: ९६
सर्वाधिक मतदान झालेला प्रभाग: शिवणे खडकवासला प्रभाग ३३ (५८ टक्के)
सर्वात कमी मतदान झालेला प्रभाग: औंध बोपोडी, प्रभाग ८ (४५ टक्के)
मुंबई महापालिकेच्या दोन जागा लढवणाऱ्या अरुण गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा या दोन्ही जागांवर विजय होईल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
ज्युबिलिएंट डेटा स्टुडिओ एक्झिट पोलच्या अंदाजानुसार 150 जागा लढवलेल्या काँग्रेसला फक्त 16 ते 25 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर 45 जागा लढवलेल्या वंचित एकाही जागेवर विजयी होणार नसल्याचा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचे मतदान पूर्ण होताच विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. त्यानुसार मुंबईत 227 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक 127 ते 155 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला 54 आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसनेला 44 ते 58, तर मनसेला फक्त 6 जागा मिळतील असा अंदाज ज्युबिलिएंट डेटा स्टुडिओ एक्झिट पोलच्या अंदाजानुसार हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे शहरात ४१ प्रभागातील १६३ नगरसेवकांसाठी नागरिकांनी मतदान केलं आहे. पुण्यातील १८ लाख ६२ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली असून आज मुंबईसह सर्वच महापालिकेचे निकाल जाहीरहोणार आहेत. पण त्याआधीच एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आले असून मुंबईत ठाकरे बंधूंना झटका बसला आहे. येथे डीव्ही रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार महायुतीतील भाजप-शिवसेनेला (शिंदे) १०७ ते १२२ जागा मिळतील. तर ठाकरे बंधूंच्या युतीला ६८ ते ८३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजप शिवसेना युतीला १३१ ते १५१ जागा, ठाकरे बंधूंच्या युतीला ५८ ते ६८ आणि काँग्रेसला १२ ते १६ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.