Maharashtra Municipal Corporation Election 2026 Result live Updates  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Election 2026 Result live updates : पुण्यात आतापर्यंत प्रभागानुसार विजयी झालेल्या उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Result live Updates : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडलं आहे. तर आज या निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. त्याआधी एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आहेत ते नेमके कसे आहेत? यासह आज 16 जानेवारीच्या दिवसभरातील निकालाच्या सर्व अपडेट्स जाणून घेऊया.

Jagdish Patil

Pune Election Result Live Update : पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ३३ चे विजयी उमेदवार

पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ३३, शिवणे, खडकवासला धायरी टपाल मतदान व अंतिम निकाल कंसात एकूण मते

अ)

धनश्री कोल्हे (भाजप) - ३४ (३२६८५) - विजयी

रश्मी घुले (राष्ट्रवादी- शरद पवार) - ४० (२७७९८)

दीपाली पांगारे (मनसे) - ४ (४०७१)

ब)

अनिता इंगळे (राष्ट्रवादी शरद पवार)- ५४ (३१४७६) - विजयी

ममता दांगट (भाजप)-१७ (२३७१२)

सीमा पोकळे (शिवसेना)- ५ (४५६२)

सोनाली पोकळे ५ (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - (३५९०)

क)

सुभाष नानेकर (भाजप) - १७ (२५५५६) - विजयी

संदीप मते (राष्ट्रवादी शरद पवार)- ४९ (२५०१७)

राहुल पोकळे (अपक्ष) - १० (९००१)

राहुल घुले (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- ४ (३७१५)

ड)

काका चव्हाण (राष्ट्रवादी -शरद पवार)- ५३ (२९९४४) - विजयी

किशोर पोकळे (भाजप)- २१ (२६५९४)

शिवाजी मते (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- ४ (३७०२)

Pune Election Result Live Update : प्रभाग क्रमांक 08 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी

पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 08 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी झालेत.

अ - परशुराम वाडेकर

ब - अजित गायकवाड

क - सपना छाजेड

ड - सनी उर्फ चंद्रशेखर निम्हण

अशी भाजपच्या विजयी उमेदवारांची नावे आहेत.

Pune Election Result Live Update : अविनाश बागवे फेरमतमोजणीची मागणी करणार

काँग्रेसचे अविनाश बागवे फेरमतमोजणीची मागणी करणार आहेत. मतांमध्ये केवळ ४५ मतांचा फरक असल्यामुळे ते फेरमतमोजणीची मागणी करणार आहेत.

Pune Election Result Live Update : पुणे प्रभाग क्रमांक २२ – काशेवाडी – डायस प्लॉटमधील मतमोजणीची आकडेवारी

प्रभाग २२ – काशेवाडी – डायस प्लॉट

(सहावी फेरी)

(अ)

मृणाल कांबळे (भाजप) - 14079

इंदिरा बागवे (काँग्रेस) - 13850

आघाडी -- मृणाल कांबळे

रफिक शेख (काँग्रेस) - 14043

संदिप लडकत (भाजप) - 13687

आघाडी -- रफिक शेख

(क)

अर्चना पाटील (भाजप) - 15788

दिलशाद जुबेर बाबू शेख (काँग्रेस) - 12344

आघाडी -- अर्चना पाटील

(ड)

अविनाश बागवे (काँग्रेस) - 12352

विवेक यादव (भाजप) - 12410

शेख शाहनुर रशीद (राष्ट्रवादी) - 7999

आघाडी -- विवेक यादव

PMC Election : पुण्यातील प्रभाग क्रमांक 10 मधून चारही भाजपचे उमेदवार विजयी

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. या प्रभागातील भाजपचे दुसरे पॅनल संपूर्णपणे विजयी ठरले. किरण दगडे पाटील, दिपाली पवार, अल्पनाताई वरपे आणि दिलीप वेडे पाटील यांनी मतदारांचा विश्वास संपादन करत स्पष्ट विजय मिळवला आहे.

प्रभाग क्रमांक ३६ मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी

सहकारनगर पद्मावती प्रभाग क्रमात 36 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी झालेत. यामध्ये महेश वाबळे 5000 मतांनी विजय.भोसले शैलजा 2595 मतांनी आणि सई थोपटे 2400 मतांनी तर विना घोष 4000 मतांनी विजय झाल्या आहेत.

Pune Election Result Live Update : मला पाडण्यासाठी जुन्या पक्षातील नेत्यांनी फोन केले, प्रशांत जगताप यांचा आरोप

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्याच्या मुलाचा काँग्रेसच्या प्रशांत जगताप यांनी पराभव केला आहे. आपल्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना जगताप म्हणाले, हा शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा विजय आहे. माझ्या वानवडीमधील मतदारांचा विजय आहे. मला पाडण्यासाठी जुन्या पक्षातील नेत्यांनी फोन केले. मात्र शेवटी विचारांचा विजय झाला म्हणत जगताप यांनी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.

पुण्यातील आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार भाजप ५० तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी ५ जागांवर आघाडीवर

पुण्यातील आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार भाजप ५० जागांवर आघाडीवर तर राष्ट्रवादी काँग्रेस ५ आणि कांग्रेस ५ जागांवर आघाडीवर आहे.

Pune Election Result Live Update : कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी पिछाडीवर

कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे 1671 मतांनी पिछाडीवर आहे.

Pune Election Result Live Update : पुणे प्रभाग क्रमांक १० बावधन भुसारी कॉलनीतील मतमोजणीची आकडेवारी

PMC : प्रभाग क्रमांक १० बावधन भुसारी कॉलनी

पहिली फेरी

अ) ओबीसी

१) राजेंद्र गोरडे – मनसे - 818

२) अभिजीत दगडे – एनसीपी (अजित पवार) - 3604

३) किरण दगडे – भाजप - 7234

४) नोटा - 256

ब) सर्वसाधारण महिला

१) आरती करंजावणे – आम आदमी पक्ष - 339

२) रूपाली थरकुडे – भाजप - 5481

३) मीनल धनवटे – शिवसेना - 301

४) जयश्री मारणे – एनसीपी - 3810

५) स्वाती वेडे-पाटील – मनसे - 1049

६) वैशाली कंधारे – अपक्ष - 65

७) नोटा - 330

क) सर्वसाधारण महिला

१) पौर्णिमा गायकवाड – मनसे - 686

२) सुजाता भुंडे – एनसीपी (अजित पवार) - 3973

३) सुरेखा मारणे – काँग्रेस - 402

४) अल्पना वरपे – भाजप - 5846

५) मंगल सोनटक्के – शिवसेना - 659

६) नोटा - 263

ड) सर्वसाधारण

१) रमेश उभे – शिवसेना - 232

२) शंकर केमसे – एनसीपी (अजित पवार) -2830

३) कुणाल घारे – आम आदमी पक्ष - 270

४) राहुल दुधाळे – शिवसेना (उबाठा) - 1463

५) दिलीप वेडे-पाटील – भाजप - 5285

६) किरण आढागळे – अपक्ष -61

७) किरण इंगळे – अपक्ष -23

८) सचिन धनकुडे – अपक्ष - 17

९) महेश म्हस्के – अपक्ष - 13

१०) निलेश वाघमारे – अपक्ष-17

११) चंद्रकांत शिंदे – अपक्ष - 14

१२) नोटा - 177

प्रशांत जगतापांसाठी कही खुशी कही गम! स्वत: विजयी मात्र आईचा पराभव...

पुण्यातून काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप हे विजयी झालेत. त्यांनी भाजपचे अभिजीत शिवरकर यांचा पराभव केला आहे. मात्र, त्यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप यांचा पराभव झाला आहे.

Pune Election Result Live Update : पुण्यातून काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप विजयी

पुण्यातून काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे अभिजीत शिवरकर यांचा पराभव केला आहे.

Pune Election Result Live Update : पुणे ब्रेकिंग पुण्यातील प्रभाग २९ ची मतमोजणी थांबवली

पुण्यातील प्रभाग २९ ची मतमोजणी थांबवली. वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 29 मध्ये मोजणीच्या वेळी उमेदवारांनी वोटिंग मशीनमध्ये आक्षेप घेत मतमोजणी थांबवण्यासाठी विनंती केली आहे.

Pune Election Result Live Update : पुण्यातील एकमेव प्रभाग क्रमांक 22 मध्ये काँग्रेसची आघाडी

प्रभाग क्रमांक 22 मध्ये काँग्रेसचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत.

प्रभाग २२ – काशेवाडी – डायस प्लॉट

(दुसरी फेरी)

(अ)

मृणाल कांबळे (भाजप) - 3927

प्रिया मोरे (राष्ट्रवादी) -- 1051

निकीता जाधव (शिवसेना) -- 476

इंदिरा बागवे (काँग्रेस) -- 6169

लक्ष्मी कांबळे (मनसे) -- 283

आघाडी -- इंदिरा बागवे

(ब)

संदिप लडकत (भाजप) -- 4261

हरेश लडकत (राष्ट्रवादी) -- 1002

अनिल दामजी (शिवसेना) -- 1237

रफिक शेख (काँग्रेस) -- 6250

आघाडी -- रफिक शेख

(क)

अर्चना पाटील (भाजप) -- 5054

फिरोजा खान (राष्ट्रवादी) -- 1742

नुरजाह शेख (शिवसेना) -- 373

दिलशाद शेख (काँग्रेस) -- 5337

आघाडी -- दिलशाद शेख

(ड)

विवेक यादव (भाजप) -- 3872

शाहनुर शेख (राष्ट्रवादी) -- 3314

अविनाश बागवे (काँग्रेस) --5199

आघाडी -- अविनाश बागवे

Pune Election Result Live Update : पुण्यातून आमदार बापू पठारे यांची सून 'इतक्या' मतांनी आघाडीवर

पुणे प्रभाग ३ मधून आमदार बापू पठारे यांची सून ४० मतांनी आघाडीवर आहे. तर प्रभाग ३९ मधून गुंड बापू नायर पिछाडीवर. तर प्रभाग २५ मध्ये दुसऱ्या फेरीत भाजपच्या स्वरदा बापट १३ हजार ९०० मतांनीबापू मानकर १४ हजार ५०५ मतांनी तर स्वप्नाली पंडित ५३७४ मतांनी आघाडीवर आहेत.

Pune Election Result Live Update : पुण्यातील पहिला निकाल जाहीर, राष्ट्रवादीचा एक तर भाजपचे 3 उमेदवार विजयी

पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असतानाच प्रभाग क्रमांक २० शंकर महाराज मठ, बिबेवाडी येथील चित्र स्पष्ट झाले आहे. या प्रभागातून भारतीय जनता पक्षचे तीन उमेदवार विजयी झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही एक उमेदवार यशस्वी ठरला आहे.

भाजपकडून राजेंद्र शिळीमकर, तन्वी दिवेकर आणि मानसी देशपांडे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र शिंदे यांचा पराभव करत आपली जागा कायम राखली. घुले यांच्या विजयामुळे प्रभागात राष्ट्रवादीची उपस्थिती टिकून राहिली.

Pune Election Result Live Update : प्रशांत जगताप पुन्हा ९०० मतांनी पिछाडीवर

प्रशांत जगताप पुन्हा ९०० मतांनी पिछाडीवर गेले आहेत. तर अभिजीत शिवरकर यांना 4900 मतं मिळाली आहेत.

Pune Election Result Live Update : पुण्यात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगतापांसह आबा बागुल पिछाडीवर

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप प्रभाग क्रमांक ३६ अ मधून पिछाडीवर आहेत. जगतापांसह अश्विनी कदम आणि आबा बागुल हे दिग्गज नेते देखील पिछाडीवर आहेत.

तर प्रभाग क्र ३६ मधून शैलजा भोसले २००० मतांची लीडवर आणि अश्विनी कदम पिछाडीवर आहेत.

Pune Election Result Live Update : सुरूवातीला पिछाडीवर असलेल्या प्रशांत जगतापांची दुसऱ्या फेरीत मुसंडी

पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी दुसऱ्या फेरीत मुसंडी मारली असून ते ५५१ मतांनी आघाडीवर आहेत.

Pune Election Result Live Update : पुण्यात प्रभाग ४० मधून वसंत मोरे यांचे चिरंजीव रुपेश मोरे पिछाडीवर

पुण्यात प्रभाग ४० मधून वसंत मोरे यांचे चिरंजीव रुपेश मोरे पिछाडीवर आहेत. तर दुसरीकडे पुण्यात भाजप ३१ ठिकाणी आघाडीवर आहे तर अजित पवारांची राष्ट्रवादी ५ जागांवर आघाडीवर आहे.

Pune Election Result Live Update : पुण्यातील प्रभागानुसार आघाडीच्या उमेदवारांची आकडेवारी

प्रभाग 124 मध्ये शिवसेना उबाठा चे साकिना शेख आघाडीवर

शिवसेना शिंदेच्या ज्योती खान पिछाडीवर

1270 मतांनी साकीनाका शेख पुढे

Pune Election Result Live Update : पुण्यातील प्रभागानुसार आघाडीच्या उमेदवारांची आकडेवारी

प्रभाग -४० कोंढवा येवलेवाडी

अ गट

बाळा कवडे- १२०३

अर्चना जगताप - २३७९

रोहिदास साळवे - २६६

आघाडी अर्चना जगताप- ११७६

ब गट

वृषाली कामठे- २२२४

संगीता ठोसर - ८८५

वर्षा मारकड- ११४५

आघाडी - वृषाली कामठे १०८५

क गट

पूजा कदम -२१२५

स्नेहल कामठे- ४००

सपना धर्मावत - ९५६

आघाडी - पूजा कदम - ११६९

ड गट

रंजना टिळेकर - २३७८

गंगाधर बधे- ११३२

रूपेश मोरे-५७८

आघाडी रंजना टिळेकर- ११९६

तर पुण्यातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजपचे चारी उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे प्रशांत जगताप अद्याप पिछाडीवरतीच आहेत.

Nagpur Election Result Live Update : नागपूरमध्ये भाजप ५० जागांवर आघाडीवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरमध्ये भाजप ५० जागांवर आघाडीवर आहे.

नागपूर महानगरपालिका-

एकुण जागा- 151

भाजप- 50

शिवसेना- 02

काँग्रेस- 15 जागांवर आघाडीवर आहे.

Pune Election Result Live Update : भाजप आमदार योगेश टिळेकर यांची आई आघाडीवर

पुण्यातून भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांची आई रंजना टिळेकर मतमोजणीच्या सुरूवातीच्या कलांमध्ये आघाडीवर आहेत.

Pune Election Result Live Update : पुण्यातील प्रभाग २० मधून भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर

पुण्यातील प्रभाग २० शंकर महाराज मठ बिबवेवाडीमध्ये भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर आहेत. यामध्येआबा शिळीमकर, तन्वी दिवेकर आघाडीवर, मानसी देशपांडे, आणि महेंद्र सुंदेचा आघाडीवर.

Pune Election Result Live Update : पुण्यातून काँग्रेसचे प्रशांत जगताप पिछाडीवर

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या सुरूवातीच्या मतमोजणीच्या कलांमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप पिछाडीवर आहेत. जगताप यांनी नुकतंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर प्रशांत जगताप यांची आई रत्नप्रभा जगताप या देखील पिछाडीवर आहेत.

Kolhapur Municipal Election Result Live Update : कोल्हापुरात प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेसचे राहुल माने आघाडीवर

कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेसचे राहुल माने सुरुवातीच्या कलात आघाडीवर आहे. तर माजी स्थायी समिती सभापती शिवसेनेचे उमेदवार शारंगधर देशमुख पिछाडीवर. भाजपचे विजय देसाई, माधवी पाटील आणि शिवसेनेचे संगीता सावंत आघाडीवर आहेत.

Pune Municipal Election Result Live Update : मतमोजणीच्या सुरूवातीलाच पुण्यात भाजप 32 जागांवर आघाडीवर

महानगरपालिका मतमोजणीच्या सुरूवातीलाच पुण्यात भाजप 32 जागांवर आघाडी घेतली आहे. पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये प्रमुख लढत झाली होती.

Solapur Mahanagar Palika election result LIVE : सोलापूरमध्ये २२ जागांवर भाजपची आघाडी

सोलापूरमध्ये २२ जागांवर भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे.

Pune Municipal Election Result Live Update : पुण्यात निकालाआधी झळकले भाजपच्या विजयाचे बॅनर

पुण्यात पुन्हा झळकले भाजपच्या उमेदवाराच्या विजयाचे बॅनर. लहू बालवडकर यांच्या विजयाचे बॅनर झळकले. मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याआधीच हे बॅनर लावल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

BMC Election Result Live Update : मुंबईमध्ये पहिल्या कलांमध्ये भाजपची आघाडी

मुंबई महापालिकेच्या मतमोजणीला अखेर सुरूवात झाली असून सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. तर ठाण्यात भाजप तीन जागांवर आघाडीवर आहे.

Maharashtra Municipal Election Result Live Update :  राज्यातील 29 महापालिकांच्या टपाल मतमोजणीला सुरूवात...

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील 29 महापालिकांच्या मतमोजणीला अखेर सुरूवात झाली आहे. सुरूवातीला टपाल मतमोजणीला सुरूवात करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार

छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मतमोजणी केंद्रात झालेल्या गर्दीवर पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये माजी महापौर विकास जैन आणि काही शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याने पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या व उमेदवार हर्षदा शिरसाट आक्रमक झाल्या असून लाठीमार करणाऱ्या पोलीसांवर कारवाई करा, अन्यथा मतमोजणी होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Kolhapur Municipal Election Result Live Update : कोल्हापूरमध्ये ८१ पैकी ६५ जागा महायुतीला मिळतील - चंद्रकांत पाटील

एकमेव कोल्हापूरमध्ये मी सगळ्यांना आम्ही म्हणा असं सांगणार आहे, कारण आम्ही सगळ्यांनी मिळून कोल्हापूरमध्ये महायुती केली. त्यामुळे कोल्हापूरमध्ये ८१ पैकी ६५ जागा महायुतीला मिळतील, असा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Malegaon Municipal Election Result Live Update : मालेगावात 'या' ४ ठिकाणी मतमोजणी होणार

मालेगावातील वखार महामंडळ गुदाम येथे मालेगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २, ४, ५, ८, ११, १२, १३, १५, आणि १७ या प्रभागांची, आयएमए हॉल १, ९, १० या प्रभागांची, छत्रपती शिवाजी जिमखाना येथे ३, ६, ७, १४, १६, १९ या प्रभागांची तर कृष्णा लॉन्स १८, २०, २१ या प्रभागांची मतमोजणी होणार आहे.

Pune Election Result Live Update : पुण्यात निकाला आधीच गणेश बिडकर यांच्या विजयाची लागले बॅनर

पुण्यात निकालाआधीच गणेश बिडकर यांच्या विजयाचे बॅनर लागले असून त्या बॅनरवर बिडकर यांचा 'महापौर' साहेब असा उल्लेख करण्यात आला आहे.

Pune municipal corporation election result LIVE : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मतदारांसाठी आभारपत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांसाठी आभारपत्र लिहित आभार मानले आहेत. 'लोकशाहीचा हक्क बजावत उत्स्फूर्तपणे मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानतो, अजित पवार यांनी मानले मतदारांचे आभार', मतदान केंद्रांवर सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीबद्दलही मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अशा शब्दात अजित पवारांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

PMC Election Result Live Update : पुणे महापालिका प्रभाग निहाय मतदान

पुणे महापालिका प्रभाग निहाय मतदानाची मध्यरात्री उशिरापर्यंत उपलब्ध झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे

१ - ५२.९०

२ - ५०.२८

३ - ५४.१२

४ - ५६.६५

५ - ५१.४३

६ - ५४

७ - ४९.७६

८ - ४५.१२

९ - ५२.९३

१० - ५५.०५

११ - ५६.६८

१२ - ४९.३२

१३ - ५०.४५

१४ - ५२.१३

१५ - ५५.८८

१६ - ५१.९८

१७ - ४९.९१

१८ - ४५.५४

१९ - ४७.९७

२० -५३.५०

२१ -५०.९७

२२ -५३.४९

२३ -५१.९७

२४ -५४.७५

२५ -५४.००

२६ -५२.५२

२७-५२.००

२८-५४.००

२९ -५१.३४

३०- ५५.५२

३१ - ५२.०७

३२ - ५५.३९

३३ - ५८.८१

३४ - ५४.९२

३५ - ४८.५९

३६ - ५४.६

३७ - ४९.०९

३८ - ५४.०१

३९ -५२

४० -५०

४१-४९.७८

PMC Election Result Live Update : पुणेकरांचा कौल कोणाला? पुणे शहरात ५२.४२ टक्के मतदान

पुणे शहरात ४१ प्रभागातील १६३ नगरसेवकांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न

१८ लाख ६२ हजार पुणेकरांनी बजावला मतदानाचा हक्क

सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग कमी मात्र संध्याकाळी मोठ्या संख्येने पुणेकर पडले बाहेर

एकूण मतदार: १८ लाख ६२ हजार ४०८

पुरुष मतदार: ९ लाख ७३ हजार ५०३

महिला मतदार: ८ लाख ८८ हजार ८०९

इतर मतदार: ९६

सर्वाधिक मतदान झालेला प्रभाग: शिवणे खडकवासला प्रभाग ३३ (५८ टक्के)

सर्वात कमी मतदान झालेला प्रभाग: औंध बोपोडी, प्रभाग ८ (४५ टक्के)

BMC Election Result Live Update : अरुण गवळींचा पक्ष लढवलेल्या सर्व जागा जिंकण्याचा अंदाज

मुंबई महापालिकेच्या दोन जागा लढवणाऱ्या अरुण गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा या दोन्ही जागांवर विजय होईल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

BMC Election Result Live Update : वंचितला भोपळा तर काँग्रेसला फक्त 16 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज

ज्युबिलिएंट डेटा स्टुडिओ एक्झिट पोलच्या अंदाजानुसार 150 जागा लढवलेल्या काँग्रेसला फक्त 16 ते 25 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर 45 जागा लढवलेल्या वंचित एकाही जागेवर विजयी होणार नसल्याचा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवला आहे.

BMC Election Result Live Update : मुंबईत भाजपला सर्वाधिक 127 ते 155 जागा मिळण्याचा अंदाज

मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचे मतदान पूर्ण होताच विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. त्यानुसार मुंबईत 227 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक 127 ते 155 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला 54 आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसनेला 44 ते 58, तर मनसेला फक्त 6 जागा मिळतील असा अंदाज ज्युबिलिएंट डेटा स्टुडिओ एक्झिट पोलच्या अंदाजानुसार हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra Election Result Live Update : पुणे शहरात ५२.४२ टक्के मतदान

पुणे शहरात ४१ प्रभागातील १६३ नगरसेवकांसाठी नागरिकांनी मतदान केलं आहे. पुण्यातील १८ लाख ६२ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Maharashtra Election Result Live Update : एक्झिट पोल्सचे अंदाज जाहीर! मुंबई कुणाची? पुणेकरांचा कैल कुणाला? जाणून घ्या

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली असून आज मुंबईसह सर्वच महापालिकेचे निकाल जाहीरहोणार आहेत. पण त्याआधीच एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आले असून मुंबईत ठाकरे बंधूंना झटका बसला आहे. येथे डीव्ही रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार महायुतीतील भाजप-शिवसेनेला (शिंदे) १०७ ते १२२ जागा मिळतील. तर ठाकरे बंधूंच्या युतीला ६८ ते ८३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजप शिवसेना युतीला १३१ ते १५१ जागा, ठाकरे बंधूंच्या युतीला ५८ ते ६८ आणि काँग्रेसला १२ ते १६ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT