Municipal elections Maharashtra : राज्यात २९ महापालिका निवडणुकांचे निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. २९ पैकी २५ महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येणार असले तरी सर्वाधिक महापौर भाजपचेच असणार आहेत. पण या निवडणुकांचे निकालही धक्कादायक ठरले आहेत. ठाकर बंधूंसह पवार काका-पुतण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस काही महापालिकांमध्ये भोपळाही फोडता येणार नाही, अशी सध्याची चर्चा आहे.
अनेक महापालिकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. एकहाती सत्ता काबीज करत मित्रपक्षांसह विरोधकांना धक्का दिला आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये प्रभाव पाडता आलेला नाही. २९ पैकी तब्बल २३ ठिकाणी मनसेला भोपळाही फोडता येणार नाही, असे सध्याचे चित्र आहे.
मनसेपाठोपाठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही हीच स्थिती आहे. पवारांच्या पक्षाचाही तब्बल २० ठिकाणी एकही नगरसेवक नसेल, अशी स्थिती आहे. या दोन पक्षांचीच राज्यात सर्वात दयनीय स्थिती आहे. दोन्ही पक्षांचे सर्व महापालिकांमध्ये सर्व मतदारसंघात उमेदवारही नव्हते. राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या पक्षाची ही पहिलीच निवडणूक होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना करिष्मा दाखविता आला नाही. मात्र, अनेक वर्षे राजकारणात असलेल्या मनसेला अजूनही जम बसविता आलेला नाही.
या दोन पक्षांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही मोठा धक्का बसला आहे. नऊ महापालिकांमध्ये पक्षाचा भोपळाही फुटणार नाही, असे चित्र आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसवरही ही नामुष्की ओढवली आहे. काँग्रेसचाही सात महापालिकांमध्ये एकही नगरसेवक नसेल, असे सध्याचे कल आहे.
तेवढ्याच महापालिकांमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसलाही आपले नगरसेवक पाठविता आले नाहीत, असे चित्र आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही लातूर आणि परभणी या दोन महापालिकांमध्ये भोपळा फोडता येणार नाही, असे सध्याच्या निकालावरून दिसत आहे. भाजप वगळता राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांना या निवडणुकीत झटका बसला आहे.
राजकीय पक्षांची धक्कादायक कामगिरी -
मनसे – २३ (सोलापूर, मालेगाव, कोल्हापूर, अहिल्यानगर, इचलकरंजी, जळगाव, पिंपरी चिंचवड, धुळे, अकोला, सांगली, अमरावती, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, मीरा भाईंदर, भिवंडी, वसई-विरार, पनवेल, उल्हासनगर)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – २० (नाशिक, सोलापूर, मालेगाव, कोल्हापूर, अहिल्यानगर, इचलकरंजी, जळगाव, पिंपरी चिंचवड, धुळे, अमरावती, चंद्रपूर, जालना, परभणी, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष – ११ (सोलापूर, मालेगाव, धुळे, पिंपरी चिंचवड, सांगली, जालना, नांदेड, मीरा भाईंदर, भिवंडी, वसई विरार)
काँग्रेस – ७ (इचलकरंजी, जळगाव, पिंपरी चिंचवड, धुळे, ठाणे, वसई विरार, नवी मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेस – ७ (जालना, मीरा भाईंदर, भिवंडी, वसई विरार, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर)
शिवसेना – २ (लातूर, परभणी)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.