दोन्ही ठाकरे बंधूच्या युतीबाबत राज्यात चर्चा सुरु आहे. दरम्यान, आता राज ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत योग्य वेळी बोलेन असं राज ठाकरे म्हणाल आहेत.
तेजस्वी यादव यांच्याकडे दोन मतदान कार्ड असल्याचा पुरावा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. आयोगाने त्यांना नोटिस पाठवली आहे. या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवसापासून काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी हे बिहारमध्ये 'मतदाता अधिकार यात्रा'काढणार आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम आज उपस्थित नव्हते. विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे, आरोपीचे वकील विकास खाडे न्यायालयात हजर होते. आरोपी वाल्मिक कराड यांच्या मालमत्तेबाबत आज न्यायालयात बाजू मांडण्यात आली.
पनवेलमधील डान्सबॉरवर शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती, याप्रकरणी पनवेल पोलिसांनी कारवाई केली आहे. योगेश चिल्ले यांनी पोलिसांनी अटक केली आहे. नाईट रायडर या डान्सबार वर ही दगडफेक झाली होती.
पुण्यात तीन दलित मुलींचा कोथरुड पोलिस ठाण्यात छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्या आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या लवकरच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार आहेत.
अलमट्टी धरणाप्रकरणी आज केंद्र सरकारसोबत महाराष्ट्राच्या शिष्टमंडळांची बैठक आहे. महाराष्ट्र सदनात 12 वाजता आमदार- खासदारांची याबाबत बैठक होणार आहे. शिष्टमंडळात सर्वपक्षीय 12 लोकप्रतिनिधींचा समावेश असून केंद्रीय मंत्री सी आर पाटील उपस्थित राहणार आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. झारखंड राज्याची स्थापना झाल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चा पक्ष स्थापन करून त्यांनी राजकारण केले. त्यांचे पुत्र हेमंत सोरेन हे झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
कल्याण डोंबिवलीमधील सामाजिक कार्यकर्ते जतिन प्रजापती यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हाध्यक्ष नंदू परब आदी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कल्याण पश्चिमेतील महाजनवाडी सभागृहात हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.
धनंजय मुंडे यांची पाच महिन्यांपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, राजीनामा दिल्यानंतर त्यांनी त्यांना मिळालेला शासकीय बंगला सोडलेला नाही. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ हे अजुनही बंगल्याच्या प्रतिक्षेत आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज 11 देखील या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत आरोपी वाल्मीक कराडच्या मालमत्ता जप्तीच्या अर्जावर निर्णय होणार आहे.तसेच वाल्मीक कराडचे वकील वाल्किच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करणार आहेत. विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब फुले आज विशेष न्यायालयात सरकारच्या बाजुने काम पाहणार आहेत.
कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये अत्यंत खालच्या पातळीवर जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. याबाबत गुन्हा दाखल व्हावा म्हणून दोन दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करत होते. मात्र पोलिसांकडून याची दखल घेतली जात नव्हती. रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास आमदार रोहित पवार, वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर हे पोलिस आयुक्तालयात दाखळ झाले. पोलिसांनी तक्रार घेतली नसली तरी जनमताच्या दबावापुढे झुकत पोलिसांकडून तसं लेखी मात्र आम्ही घेतलं. पोलीस यंत्रणा सर्वसामान्यांना अशाच प्रकारे त्रास देणार असेल तर आम्हीही 'आवाज खाली' असाच प्रतिसाद देऊ. झोपलेले गृहमंत्री जागे होतील, ही अपेक्षा!, असे रोहित पवार म्हणाले.
कोथरुड पोलिसांनी तीन सामाजिक कार्यकर्त्यांवर केलेल्या छळाच्या विरोधात अत्याचारित तीन महिला, अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते १ ऑगस्टपासून सकाळी १०.३० वाजल्यापासून पोलिस आयुक्त (CP) कार्यालयासमोर ठाण मांडून बसले होते. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल न केल्यानेवंचितच्या कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.