बीड जिल्ह्यातील पोलिस प्रशासन आणि गुन्हेगारी विषयांवर आमदार सुरेश धस यांनी आज जोरदार टीका केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अनेक गंभीर मुद्यांना हात घातला. त्यांनी थेट पोलिसांची कार्यपद्धती, गुन्हेगारी वाढ, आणि ठेवीदारांच्या पैशांचे अडकलेले व्यवहार यावरून हल्लाबोल करताना, महादेव मुंडे हत्या प्रकरणात पोलिसांनी गंभीरपणे तपास न करता 'मिटवा-मिटवी' केली असल्याचा आरोप केला. त्यांनी, या प्रकरणात गुंतलेल्या अधिकाऱ्यांची नावे ज्ञानेश्वरीताई कुमावत साहेबांना सांगतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता या आरोपांवर पोलिस प्रशासन काय प्रतिक्रिया देतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नुकसात राज्यात हिंदी सक्तीवरून वाद पेटला होता. यामुळे राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे चांगलेच अडचणी आले होते. ठाकरे बंधुंनी केलेल्या एल्गारानंतर हा निर्णय राज्य सरकारला मागे घ्यावा लागला होता. यानंतर आता मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमाच्या शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत असणारे 'गर्जा महाराष्ट्र माझा' घ्यावे लागणार आहे. जे बंधनकारक असेल. तसे न केल्यास कारवाई केली जाईल असा दमच राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी भरला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सहकुटुंब भेट घेतली. तर ही भेट उपराष्ट्रपती नियुक्तीवरून घेतल्याचे बोलले जात आहे. यावेळी शिवसेनेचे सर्व खासदारही उपस्थित होते. यानंतर त्यांनी, शिवसेना-मनसे युतीवरुन ठाकरेंना डिवचताना टीका केली आहे. शिंदेंनी, आम्ही लोककल्याणच्या मार्गाकडे गेलो, ते मात्र दहा जनपथकडे गेले. हे बाळासाहेबांना नक्कीच आवडलं नसतं. पण ते त्यांनी केलं, असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून लगावला आहे.
राज्याच्या राजकारणात दोन वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नेमणूक झाली आहे. यावरून राज्यातले राजकारण तापलं असून आमदार रोहित पवार यांनी या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांनी, सत्ताधारी पक्षाची प्रवक्ता म्हणून बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं चुकीच होईल, न्याय व्यवस्थेच्या निपक्ष:पणावर दूरगामी परिणाम होईल, अशी टीका केली होती. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, या नियुक्तीवर बोलताना, काय निर्णय घ्यायचा यात केंद्र किंवा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो. हा पूर्ण न्यायालयाचा अधिकार आहे, त्यांनी म्हटलं आहे.
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा कोर्टानं सुनावली आहे. बैठकीस आत जाऊ देण्यास मज्जाव केल्यानं पोलिस निरीक्षक पराग जाधव यांच्या कानशिलात लगावल्या प्रकरणी सोनेगाव पोलिसांत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
राज्यभर चाललेल्या मराठी मराठीचा वाद आता पुणे महापालिकेमध्ये देखील रंगल्याचे पाहायला मिळाल. महापालिका आयुक्तांची बैठक सुरू असताना मनसेचे काही पदाधिकारी थेट बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. त्या ठिकाणी बैठक सुरू असल्याचं सांगत या पदाधिकाऱ्यांना हटकलं असता आयुक्त आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.
महादेवी हत्तीणीसाठी सुप्रीम कोर्टात नांदणी मठ राज्य सरकार आणि वनताराच्यावतीने याचिका दाखल होणार आहे. वनताराच्यावतीने नांदणी इथल्या मठाच्या जागेमध्येच महादेवी हत्तीणीसाठी एक चांगलं सेंटर उभं करण्यात येणार आहे. महादेवीची मालकी ही मठाची असणार मात्र देखभाल वनताराच्यावतीनं करण्यात येणार आहे.
बेस्टचे महाव्यवस्थापक श्रीनिवास हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी अतिरिक्त कार्यभार सनदी अधिकाऱ्याला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सामान्य प्रशासन विभागाने आशिष शर्मा यांची ऑर्डर काढली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने अश्विनी जोशी यांची एकाच दिवशी ऑर्डर काढली. त्यामुळे नेमका अधिकार कोणाचा असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मी लपून छपून काही काम करत नाही. मी जे करतो ते सगळ्यांच्या समोर करतो. सर्व खासदारांसोबत मी आज गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. खासदारांचे काही विषय होते, ते या भेटीदरम्याान मांडले, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर मी जाहीरपणे भेटतोय, खासदारांसोबत भेटतोय, केंद्र आणि राज्य सरकार जे काही सकारात्मक प्रकल्प मिळून सुरू आहेत, अशा प्रकल्पांसंदर्भात देखील या भेटीमध्ये चर्चा झाली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माळशिरसचे नेते आणि माजी आमदार हनुमंत डोळस यांचे सुपुत्र संकल्प डोळस यांनी केलं आहे, या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. बेस्ट पतपेढीची ही निवडणूक 18 ऑगस्टला होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसेच्या मनसे कर्मचारी सेनेने एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.
महिला व बालकल्याण विभागाने बोगस लाभार्थ्यांकडून 11 महिन्यांचा संपूर्ण लाभ रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे .या निर्णयानुसार प्रत्येक बोगस खात्याकडून 16500 वसूल करण्यात येतील. इतकंच नव्हे तर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येणार आहे .मात्र ज्या महिलांनी त्यांच्या स्वतःच्या खात्याऐवजी इतर कुटुंबीयांचे खाते तात्पुरते जोडले आणि नंतर ते बदलले अशा लाभार्थींचा लाभ सुरू राहणार आहे
सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजिमयने 28 जुलै रोजी घेतलेल्या मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयात 3 नवीन न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये, भाजप प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांचेही नाव आल्याने आमदार रोहित पवार यांनी टीका केली होती. न्यायव्यवस्था न्यायव्यवस्थेचे काम करत असते. काय निर्णय घ्यायचा यात केंद्र किंवा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो. याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. मात्र, हा पूर्ण न्यायालयाचा अधिकार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी दुपारी मुंबईत दाखल झाले आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ते दिल्लीत आले आहेत. इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार असून त्यासोबतच राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ते स्नेहभोजन घेणार असल्याचे समजते. ठाकरे आजपासून तीन दिवस दिल्लीत असणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशध्यक्षपद स्वीकारल्यानंतर शशिकांत शिंदे हे आज पहिल्यांदा नाशिक दौऱ्यावर आले आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ते बैठका घेणार आहेत. तसेच मार्गदर्शन करणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर आहेत. आताच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्ली दौरा केला होता. त्यानंतर बुधवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीवेळी दोघांमध्ये राज्यातील राजकारणाविषयी अर्धा तास चर्चा झाली असल्याचे समजते. संसद भवन कार्यालयात त्यांनी ही भेट घेतली.
प्रांजल खेवलकरसोबत या प्रकरणातील आरोपींना कोर्टात हजर केले असता कोर्टाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. मात्र, खेवलकरच्या वकिलांनी अजूनही कोर्टात जामिनासाठी अर्ज केला नाही. त्यातच आता या प्रकरणात थेट राज्य महिला आयोगाने उडी घेतली आहे. या प्रकरणातील अहवाल हा मागवण्यात आला आहे. शिवाय प्रांजल खेवलकरने 28 वेळा स्वत:च्या नावाने हॉटेल बुक केल्याचे म्हटले असून प्रांजल खेवलकर यांनी परप्रांतीय मुलींना बोलावले होते आणि हे मोठे रॅकेट असू शकते म्हटले आहे. बीडमधील एका बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने महिला आयोगाला याबाबत पत्र दिले आहे. आता यावरून रोहिणी खडसे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. यासोबतच काही प्रश्नही उपस्थित केली आहेत.
कोल्हापुरात महादेवी हत्तीण (माधुरी) परत आणण्याविषयी मोठे आंदोलन झाले. लोक रस्त्यावर उतरले. मोठा मोर्चा काढण्यात आला. विविध आजीमाजी लोकप्रतिनिधी ही आंदोलनात उतरले. त्यानंतर काल मुंबईत मंत्रालयात याविषयी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत हत्तीण परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी वनताराचे सीईओ यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे ही हत्तीण परत आणण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीच याविषयीची माहिती ट्विट करत सोशल मीडियावर दिली आहे.
उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार दोन दिवसांच्या बीड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. अजितदादांचा दौरा बुधवारी दुपारपासून सुरु होणार आहे. असल्याने जिल्हा प्रशासनासह पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. शहराचे बकाल रूप समोर येऊ नये, यासाठी पालिका प्रशासनाची धडपड सुरू आहे. अजित पवार ज्या मार्गावरून येणार आहेत. ते मार्ग सकाळपासूनच चकाचक करण्यात आले आहे.दुसरीकडे अजित दादांच्या दौऱ्यानिमित्त मुंडे आणि सोळंके यांच्यातील गटबाजी समोर आली. त्यामुळे मुंडे आणि सोळंके यांच्यातील नाराजी पालकमंत्री अजित पवार दूर करणार का? हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे .
दादरच्या कबुतरखाना येथे दोन तासापासून सुरु असलेले आंदोलन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मध्यस्थीनं मागे घेण्यात आले आहे. सध्या कबुतरखाना परिसरात पोलिस बंदोबस्त आहे.
आज कबुतरखाना परिसरात जे झाले ते चुकीचे झाले. कायद्या हातात घेऊ नका, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. मुंबईकरांनी शांतता राखावा. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असे लोढा म्हणाले.
वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या २३ वर्षीय तरुणीने मंगळवारी (ता. ५) रात्री वसतिगृहातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्योती कृष्णकुमार मीना (वय २३, रा. राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे
दादर येथील कबुतरखाना परिसरात जैन समाजाने गर्दी केली आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. कबुतरखान्यावरील ताडपत्री नागरिकांनी फाडली आहे. बांबू तोडत प्रवेश केला आहे.
Delhi MLAs receive iPhone 16 Pro and iPads: दिल्लीतील आमदार हायटेक होत आहे. दिल्ली विधानसभेतील सर्व ७० आमदारांना नुकतेच आयफोन 16 प्रो, आयपॅड आणि टॅबलेट देण्यात आले आहेत. पेपरलेस कामकाजाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर मुद्द्यांवरील चर्चेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी प्रहारचे अध्यक्ष, माजी आमदार बच्चू कडू शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.
दादरमधील ऐतिहासिक कबुतरखान्याला वाचवण्यासाठी आज सर्वधर्मीयांकडून प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी दहा वाजता ही सभा सुरु होईल. ज्यात विविध धर्मांचे धर्मगुरू आणि अनुयायी सहभागी होणार आहेत.
पुणे-नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. येत्या महिनाभरात ही रेल्वे सुरू करण्याचे नियोजन मध्य रेल्वेच्या बोर्डाकडून सुरू झाले आहे. या एक्सप्रेसमुळे पुणे-नागपूर प्रवास जवळापास दीड ते दोन तासांनी कमी होणार आहे.
मराठा आरक्षण लढ्यातील विजयाशिवाय फेटा बांधणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी फेटा बांधण्याचा आग्रह केल्यानंतर जरांगे पाटील यांनी फेटा बांधण्यास नकार दिला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण लढ्यातील विजयाशिवाय फेटा बांधणार नसल्याचं सांगितलं. तर 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जरांगे पाटलांच्या आंदोलनात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सहभागी होणार आहेत.
मंगळवारी रात्री वरळीतील महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर खालिद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून घोषणाबाजी करण्यात आली आहे. या घोषणाबाजीनंतर फडणवीसांनी कार्यक्रम खराब करू नका, असं आवाहन घोषणाबाजी करणाऱ्यांना केलं. त्यानंतर पोलिसांनी नंतर घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.
मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी 'जनता दरबार' सुरू केला आहे. आठवड्यातून दर मंगळवारी हा 'जनता दरबार' भरवला जाणार असून यामध्ये नागरिकांना भेटीसाठी कोणतीही पूर्व परवानगी घ्यावी लागणार नाही. पोलिसांच्या उपक्रमामुळे आता सर्वसामान्यांना आपल्या अडचणी थेट आयुक्तांच्या कानावर घालता येणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर संध्याकाळी जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. तसंच ते पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक घेणार आहेत. शिवाय 7 ऑगस्ट रोजी राहुल गांधींनी आयोजित केलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला देखील ते हजर राहणार आहेत. या दिल्ली दौऱ्यात आमदार आदित्य ठाकरे हे देखील उद्धव ठाकरेंसोबत असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.