गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर येत्या चार ते पाच महिन्यात घेतली जाणार आहे. संदर्भातील राज्य निवडणूक आयोगाकडून चार सदस्य प्रभाग रचनानुसार निवडणूक होणार असल्याने त्या संदर्भात प्रारूप प्रभाग रचना करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिला होता. त्यासंदर्भातील निवडणुकींसाठी तयार केलेला प्रभाग रचनेचा प्रारूप आज कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सादर केला जाणार आहे. येत्या चार ते पाच दिवसात तो अहवाल नगरविकास विभागाकडे जाणार असून 9 ऑक्टोंबर रोजी त्याला अंतिम मान्यता मिळणार आहे.
कर्नाटकच्या भाजपच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन आलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णय हा कर्नाटकचा वैध हक्क असल्याचे स्पष्ट केले. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यानंतर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसेल.
ईडीमध्ये कार्यरत असताना अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन या दोन माजी मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या कपिल राज यांनी राजीनामा दिला होता. आता ते रिलायन्समध्ये नोकरीला लागले आहेत. कपिल राज हे माजीआयआरएस अधिकारी आहेत. १७ जुलैला त्यांनी स्वच्छेनिवृत्ती घेतली होती
राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचे अध्यक्षतेखाली हाताने मैला उचलणा-या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालणे व त्यांचे पुनर्वसन करणे बाबतचे अधिनियम २०१३ ची अंमलबजावणी, सफाई कर्मचा-यांच्या समस्या व त्याचे निराकरण करणेबाबत आढावा बैठक ०७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे पार पडली. या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करुन त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी दिले.
नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी संभाव्य युतीचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर मनोमिलन झाल्याचे बोलले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुरुवारी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती.बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांना सहाव्या रांगेत बसवण्यात आल्याचे दृश्य समोर आले आहे. यावरुन एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी टीका केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत, त्यांनी आज काँग्रेसचे खासदार, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. यात महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
कोल्हापूरकरांच्या रोषानंतर वनताराकडून कोल्हापूरच्या नागरिकांची माफी मागितली आहे. महादेवी हत्तीण नांदणी येथे लवकरच येणार आहे. कोल्हापूरकरांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावरही पदयात्रा काढली होती. राजू शेट्टी यांनी व्हिडिओ शेअर करीत अनंत अंबानी आणि अंबानी परिवार यांचे आभार मानले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी 11.30 वाजता पुणे शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत विविध प्रकल्पांचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 12.45 वाजता पायाभूत सुविधा विकास प्रकल्प प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत ते यशदा येथे संवाद साधणार आहेत. दुपारी 2 वाजता : पुणे शहर सर्वंकष गतीशीलता योजना सादरीकरण, यशदा. दुपारी 3 वाजता : पुणे शहर वाहतूक व्यवस्थापन आराखडा सादरीकरण, यशदा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित 'अजेय-द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाने 'सीबीएफसी'ची गुरुवारी कानउघाडणी केली. चित्रपट न पाहताच प्रमाणपत्र न देण्याचे कसे ठरविले? चित्रपटात काय आक्षेपार्ह आहे ते सांगा. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून 'ना-हरकत' प्रमाणपत्र आणण्याचा आग्रह धरू नका, असे न्यायालयाने म्हटले.
सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे दिल्ली दोऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे देखील दिल्लीला गेले आहेत. हे दोन्ही नेते दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी झाले. या बैठकीतील त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते मागच्या रांगेत बसल्याचं दिसत आहे. याच फोटोवरून शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिलं की, "इंडिया आघाडीत उद्धटराव, विश्वप्रवक्ते ,पेंग्विनची ही जागा, आता काही बोललं तर बोलणार की लायकी काढतात म्हणून."
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मारहाण आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी मित्राच्या मदतीने अपहरणाचा कट रचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पडळकरांच्या कार्यकर्त्याच जीव थोडक्यात बचावला आहे. शरणु हांडे असं अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. तर अमित सुरवसे असं अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. सुरवसे हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा समर्थक असल्याचं सांगण्यात येत आहे. संशयित आरोपीने याआधी आमदार पडळकरांच्या गाडीवर हल्ला केल्याची माहिती आता समोर आली आहे.
‘'खालिद का शिवाजी' या चित्रपटामुळे महाराष्ट्रात नवा वाद सुरू झाला होता. या चित्रपटातून चुकीचे संदर्भ आणि खोटा इतिहास दाखवल्याच आरोप काही संघटनांनी केला होता. त्यानंतर राज्य शासनाने या चित्रपटाचे प्रदर्शन काही काळ थांबवावे यासाठी पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आता महिन्याभरासाठी या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे.
इंडिया आघाडीकडून 11 ऑगस्ट रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा राहुल गांधींनी आरोप केला होता. त्यानंतर इंडिया आघाडीच्या बैठकीत हा मोर्चा काढण्याबाबत एकमत झालं आहे. राहुल गांधींनी काल पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात 40 लाख संशयित मतदार असल्याचा आरोप केला होता.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे बीडमधील एका रुग्णालयात आले होते. यावेळी ते ज्या लिफ्टमधून जात होते ती पहिल्या मजल्यावरून खाली आदळल्याचा प्रकार घडला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आता याबाबतची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यासाठी संबंधित रुग्णालयाला विद्युत विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे रुग्णालयाने नूतनीकरण न करताच विनापरवाना लिफ्ट सुरू केल्याचं उघडकीस आलं आहे.
दिल्लीत ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट झाली आहे. या भेटीचे फोटो आता समोर आले आहेत. राहुल गांधींच्या घरी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकी दरम्यान या दोघींची भेट झाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयालयाने कबुतरखान्यांवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे. नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे, असं सांगत कोर्टाने ही बंदी कायम ठेवली आहे. शिवाय या संदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घेऊन महानगरपालिका आणि सरकारने निर्णय घेण्याचे निर्देश देखील कोर्टाने दिले आहेत.
भाजपा नेत्या नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञातांने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आरोपीने व्हिडीओद्वारे ही धमकी देत तो व्हिडिओ व्हायरल केला आहे. या प्रकरणानंतर अमरावती पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.