Maharashtra Political Live updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : देशाला पुन्हा अराजकतेमध्ये नेण्याचा पवारांचा प्रयत्न; मंडल यात्रेला परवानी देऊ नये : हिंदू महासंघ

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

सरकारनामा ब्युरो

Opration Sidoor : आॅपरेश सिंदूर दरम्यान, भारताने पाकिस्तानची पाच फायटर जेट्स पाडली..

भारताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. भारतीय सैन्य दलांनी केलेल्या या कारवाईवर इंडियन एअरफोर्सचे प्रमुख अमर प्रीत सिंह यांनी पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी इंडियन एअरफोर्सने पाकिस्तानची 5 फायटर जेट्स पाडली असं एअर फोर्स प्रमुख अमर प्रीत सिंह यांनी सांगितलं. या ऑपरेशनच्या माध्यमातून आम्ही पाकिस्तानला स्पष्ट आणि कठोर संदेश दिला. पाकिस्तानच्या पाडलेल्या विमानांमध्ये पाच फायटर विमान आणि एक टेहळणी करणारं AWACS विमान होतं.

Hindu mahasangh : देशाला पुन्हा अराजकतेमध्ये नेण्याचा पवारांचा प्रयत्न; मंडल यात्रेला परवानी देऊ नये : हिंदू महासंघ

देशाला पुन्हा एकदा १९९० च्या अराजकतेमध्ये घेऊन जाण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आहे, असे हिंदू महासंघ मानते. मंडल आयोगाने अनेक तरुणाचे बळी घेतले होते, अनेकांनी आत्महत्या केल्या होत्या. मंडल आयोगामुळे देशात हिंसेचे वातावरण तयार झाले होते. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतरही ओबीसीला खूप काही मिळालं, अशातला भाग नाही. ओबीसी समाजाच्या मान्यतेनंतर महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. जातीचं राजकारण करून लोकांना भडकविण्याचे काम या मंडल यात्रेमुळे होईल, असे हिंदू महासंघाला वाटते. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काढण्यात येणाऱ्या मंडल यात्रेला सरकारने परवानी देण्यात येऊ नये, अशी मागणी हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे.

Devendra Fadnavis : शरद पवार इतके दिवस बोलले नाहीत, पण आज अचानक का बोलले : देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मला दोघेजण भेटले होते. त्यांनी मला विधानसभेच्या १६० जागा जिंकून देण्याची ग्यारंटी दिली होती, असा दावा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, इतक्या दिवसानंतर शरद पवार यांना राहुल गांधींना भेटल्यानंतर त्याची आठवण का आली? इतके दिवस पवार बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले. राहुल गांधी हे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रीप्टवर रोज कपोलकल्पित कहाण्या सांगतात. तीच अवस्था पवारांची झाली नाही ना? राहुल गांधी ईव्हीएमवर बोलत होते, तेव्हा पवार हे ईव्हीएमला दोष देणे योग्य नाही, अशी भूमिका मांडत होते. आज अचानक पवार जे बोलले तो राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम वाटतोय.

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली : वायुदलप्रमुख

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तनाची पाच लढाऊ विमाने पाडण्यात आली आहेत. याच मोहिमेदरम्यान पाकिस्तानमधील दहशतवादी तळही उद्‌ध्वस्त करण्यात आले आहेत. मुरीदकेचा बहावलपूरचा हवाईतळही उद्‌ध्वस्त करण्यात आलेला आहे. संपूर्ण ऑपरेशनमध्ये एस-४०० ही विमाने गेमचेंजर ठरली आहेत. या मोहिमेमध्ये पाकिस्तनाचे मोठे नुकसान झाला आहे, असा दावा वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी केला आहे.

Shivsena UBT : उद्धव अन्‌ राज ठाकरेंच्या एकत्र येण्याबाबत आदित्य ठाकरेंचे मोठे विधान

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबतची चर्चा सुरू आहे. निवडणुकीसाठी हे दोन्ही नेते एकत्र येणार का, या प्रश्नावर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ अनेक वर्षांपासून बोलत आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून हे दोन्ही भाऊ एकत्र येत आहे. पुढच्या काळात हे दोन्ही भाऊ निर्णय घेतील. जे मुंबई आणि महाराष्ट्राचे हिताचे असेल ते नक्की होईल. देशपातळीवर मात्र आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकत्र आहोत, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Mva News : महाविकास आघाडीत राज पर्व सुरू होणार असल्याची जोरदार चर्चा

ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी आता शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत राज पर्व सुरू होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. थोड्यावेळी पूर्वी काँग्रेसच्या गोटातूनही तसेच संकेत मिळाले. विजय वडेट्टीवार यांनी दोघांच्या एकत्र येण्याविषयी आशावाद व्यक्त केला. तर खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला त्यांच्या एकत्र येण्याने काही अडचण होणार नसल्याचे संकेत दिले. त्यातच शरद पवार यांनी आज जी बॅटिंग केली, त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Devendra Fadnavis : रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त दिल्या सर्वाना शुभेच्छा

रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच यावेळी बोलताना त्यांनी महायुती लाडक्या बहिणीमुळे सत्तेत आले असल्याचेही स्पष्ट केले.

Ekanath khadse : जिल्हाभरात खडसे यांच्या विरोधात आंदोलन

जळगावच्या चाळीसगावात एकनाथ खडसे विरोधात भाजपा आक्रमक झाल आहे. एकनाथ खडसेंच्या फोटोला जोडे मारत भाजपचे आंदोलन सुरु आहे. शुक्रवारी जिल्हाभरात एकनाथ खडसे यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आले होते. शनिवारी हे आंदोलन सुरु आहे.

Sharad Pawar : दोन माणसं भेटली 160 जागा जिंकून देतो म्हणाली - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्याला दोन माणसं भेटली होती. या माणसांनी आपल्या 160 जागा जिंकूण देण्याचा दावा केला होता. त्यांची भेट आपण राहुल गांधी यांना घालून दिली. राहुल आणि मी ठरवले की यात आपण पडायचे नाही.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्लीचे सह सल्लागार, नवलप्रकाश, वरिष्ठ सल्लागार, कर्नल अनु दयाल माथर, सह सल्लागार विजय लोकेश सिंह हे महाराष्ट्र राज्यातील मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पुणे या जिल्ह्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत सुरु असलेल्या कामकाजाबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे संपन्न झाली.

Sharad Pawar : आजपासून राज्यभरात मंडल यात्रा, शरद पवार करणार यात्रेचा शुभारंभ

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आजपासून राज्यभर ‘मंडलयात्रा’ला सुरुवात होत आहे. या यात्रेद्वारे पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी निवडणुकांची रणनीती ठरवली जाणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सभा, बैठकांद्वारे जनतेशी थेट संवाद साधण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.

Sanjay Raut : मुंबईत ठाकरे बंधू  एकत्र, मविआ नव्हे : संजय राऊत 

मुंबईसाठी दोन्ही ठाकरे बंधू स्वतंत्र भूमिका घेण्यास तयार आहेत. ठाकरे बंधूंची युती इंडिया आघाडीचा विषय नाही असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ठाकरे बंधू एकत्रित लढण्यास इंडियात कुणाला आक्षेप नाही असं राऊत यांनी म्हटलं आहे. राहुल गांधीसोबतच्या बैठकीनंतर आम्ही आशावादी आहोत असं राऊत यांनी म्हटलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात उद्धव ठाकरे व राज ठाकरे अशी युती असेल असे संकेत राऊत यांनी दिले आहेत.

Kabutar Khana Controversy : मनाई असताना कबुतरांना दाणे टाकणे सुरुच 

दादरचा सुप्रसिद्ध कबुतरखाना तसेच इतर काही कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले आहेत. . तरीदेखील काही नागरिक कबूतरांना खाद्य देत असल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच, एका व्यक्तीने गाडीतून कबूतरांना अन्न देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.न्यायालयाचा निर्णय असूनही, वाद कायम आहे. कबूतरखान्याजवळ एका इसमाने त्याच्या गाडीच्या टपावर कबूतरांसाठी खाद्य ठेवल्याचा प्रकार उघड झाला आहे.

Mahadevi Elephant : महादेवीच्या घरवापसीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी राज्य सरकार, वनतारा आणि नांदणीतील मठातर्फे सोमवारी (11 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयाला एकत्रित पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे आता महादेवी संदर्भात या सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार? याकडे कोल्हापुरकरांचं लक्ष लागंल आहे.

Solapur Crime : शरणू हांडे अपहरण प्रकरणी आणखी दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

सोलापुरातील आमदार गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडे अपहरण प्रकरणी पोलिसांनी आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. राकेश भीमाशंकर कुदरे, श्रीकांत बाबुराव सुरपुरे अशी या संशयितांची नावे आहेत. या दोघांना कर्नाटकातील इंडी तालुक्यातून ताब्यात घेतलं आहे. शरणू हांडे याचे अपहरण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी 4 आरोपी पोलिसांच्या अटकेत होते. त्यानंतर काल रात्रीच्या सुमारास सोलापूर पोलिसांनी आणखी दोन संशयिताना ताब्यात घेतलं असून त्यांचा या प्रकरणात सहभाग होता का? याची तपासणी करून अटकेची कायदेशीर कारवाई पूर्ण केली जाणार आहे.

Pune News : पुण्यातील कबुतरांच्या खाद्यबंदीचा वाद आता उच्च न्यायालयात

महापालिकेने शहरातील 20 ठिकाणी कबुतरांना सार्वजनिक खाद्य टाकण्यास बंदी केली आहे. त्याच उल्लंघन करणाऱ्यांना 500 रुपयाचा दंड केला जातो. मात्र, पुण्यातील शाश्वत फाउंडेशनने या बंदीला विरोध करणारी याचिका दाखल केली आहे. 2023 मध्ये पालिकेने हा निर्णय घेतला होता. मात्र , कबुतरांचा हक्क हिरावून घेतला जातोय असं शाश्वत फाउंडेशनच म्हणणं असून या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Pranjal khewalkar : खडसेंचे जावई प्राजंल खेवलकरच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता

प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये ज्या व्हिडिओ क्लीप सापडल्यात, त्यापैकी 4 तरुणींना पोलिसांनी शोधून काढल्याची माहिती आहे. या तरुणींनी तक्रार केल्यास खेवलकरांविरोधात महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत माहिती दिली होती.

Girish Mahajan : उत्तरकाशीत अडकलेले सर्व पर्यटक सुरक्षित-  गिरीश महाजन

उत्तराखंडमधील धराली परिसरात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तिथे महाराष्ट्रातील 171 पर्यटक अडकले होते. हे सर्व पर्यटक आता सुरक्षित ठिकाणी असून उर्वरित एक पर्यटक कृतिका जैन यांच्याशीही संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील सर्व पर्यटक सुखरूप असून त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

Thackeray Poltics : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत  ठाकरे बंधुंची युती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडीट सोसायटीची निवडणुकीत एकत्र आले आहेत. 18 ऑगस्ट या होणाऱ्या या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेनेने युती केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT