Ramdas Kadam On Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Update : देशभरात दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

सरकारनामा ब्युरो

'व्हॉईस ऑफ देवेंद्र' राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा! पुणे विद्यापीठाचा उपक्रम; रोहित पवारांचा निशाणा

'थोडे दिवस थांबा अनेक गोष्टी मी काढणार...'; रामदास कदमांचा ठाकरेंना इशारा 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारविरोधात काढलेल्या रॅलीत सावली बारचा उल्लेख हल्लाबोल केला होता.त्या टीकेवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी पलटवार केला आहे. कदम म्हणाले, ‘उद्धवजी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमच्याकडून रामदास कदमचा केस देखील वाकडा होणार नाही. थोडे दिवस थांबा अनेक गोष्टी मी काढणार असल्याचा इशाराही दिला आहे.

राज्य सरकारच्या परिवहन विभागाचा स्कूल व्हॅनबाबत मोठा निर्णय

राज्य सरकारच्या परिवहन विभागाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसह रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी परवाने वाटप खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत लवकरच अधिसूचना लवकरच जारी अशी होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

भाजप नेत्यानंच EVM हॅक करण्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडलं आहे. ठाकरेंनी मतदान प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून भाजपाच्याच एका नेत्यानं ईव्हीएम हॅक करण्याचं प्रात्यक्षिक करून दाखवल्याचा धक्कादायक दावा केला आहे. 

महाराष्ट्र सरकारमधील कलंकित मंत्र्याची हकालपट्टी करा; जन आक्रोश आंदोलन

महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील कलंकित व भ्रष्ट मंत्र्यांना मंत्रिमंडळातून हाकलण्याच्या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने अंधारे चौकात ‘महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन’ करण्यात आले. जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. ठाकरे गटाने भ्रष्टाचार व गैरकारभाराविरोधात निषेध व्यक्त करून तत्काळ कारवाईची मागणी केली.

कुंडेश्वर दर्शनाला जाताना पिकअप गाडीचा भीषण अपघात9

कुंडेश्वर दर्शनाला जाताना पिकअप गाडीचा भीषण अपघात झाली आहे. या अपघातात 9 जाणांचा मृत्यु आणि 21 जाण गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट- मनोज जरांगे पाटील

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरले आहेत. येत्या 29 ऑगस्ट रोजी ते मुंबईत धडकणार असून, या आंदोलनादरम्यान दंगल घडवण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. गोवा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात हा कट आखण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे आंदोलनाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून, प्रशासनाकडून सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची तयारी सुरू आहे.

नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण

नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यामुळे नाशिकमध्येही शिवसेनेची निराशा झाली आहे.

15 ऑगस्टला रायगडमध्ये आदिती तटकरे करणार ध्वजारोहण

रायगड जिल्हाचा पालकमंत्रीपदाचा वाद अद्यापही मिटला नाही. तरी रायगडमध्ये 15 ऑगस्टला आदिती तटकरे करणार ध्वजारोहण करणार असल्याची माहिती मिळत आहे. तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन ध्वजारोहण करणार असल्याचे शासनाच्या परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Kapil Sharma : कॉमेडियन कपील शर्माच्या सुरक्षेत वाढ

लॉरेन्स बिश्नोईकडून मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कॉमेडियन कपील शर्माच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या आठवड्यात कपिल शर्माच्या कॅनडा येथील कॅफेवर गोळीबार झाला होता. कपिल शर्माने सलमान खानला शोला बोलावल्याने धमक्या मिळत असल्याचे बोलले जाते आहे.

एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नाशिकमधील बैठकीत राडा

एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नाशिकमधील बैठकीत गोंधळ उडाला. अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा बैठक घेतल्यानंतर दोन गट भिडले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप झाल्यामुळे दोन गटात शिवीगाळ, कॉलर पकडून धक्काबुक्की करत मारामारी झाली. पोलिस व सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून वाद शांत केला.

Maharashtra Politics Live Update : उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

मोर्चानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेण्यासाठी ठाकरे यांची मोर्चा काढला होता.

Maharashtra Politics Live Update : राहुल गांधींना 3 राज्यांच्या निवडणूक आयोगाची नोटीस

मत चोरीचा आरोप करणाऱ्या लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 3 राज्यांच्या निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोग आणि मतचोरीच्या आरोपांवर पुरावे देण्यासाठी आणि स्पष्टीकरण देण्यासाठी ही नोटीस दिली असल्याची माहिती आहे.

HINDI POOJA CONTROVERSY : विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात हिंदी भाषेतून पूजा सांगणाऱ्याविरोधात कारवाईचे संकेत

अमराठी भाविकाच्या आग्रहाखातर पंढरपूरच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात हिंदी भाषेतून पूजा सांगणाऱ्या पुजाऱ्याविरोधात कारवाईची मागणी होत आहे. यावर देवस्थानने संबंधित प्रकार खपवून घेणार नाही, असं काही झाले असेल, तर संबंधित पुजाऱ्याविरोधात कारवाई होईल. परंतु पूजा ही संस्कृतमध्येच सांगितली जाते. अमराठी भाषिक पुजारी कोण आहेत, याची माहिती घेतली जात असल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले. दरम्यान, राहुल सातपुते या भाविकांनं तक्रार केल्यानं हा प्रकार समोर आला.

Latur Update : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लातूरमध्ये अनावरण

लातूर इथं दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजी मंत्री धनंजय मुंडे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात हा पुतळा उभारण्यात आला आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

राज ठाकरेंविरोधात मराठीच्या मुद्यावर दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. अमराठी लोकांविरोधात राज ठाकरे द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. ही याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल करण्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. तसंच उच्च न्यायालयात याचिका का दाखल केली नाही, असा सवाल देखील सर्वोच्च न्यायालयाने केला आहे.

Jitendra Awhad : 'तुळजाभवनी मंदिराला हात लावू नका'; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

'तुळजाभवनी मंदिराला हात लावू नका', असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. जीर्णोद्धारासाठी मंदिराचं शिखर हटवण्यासंदर्भात पुरातत्व विभागानं अहवाल दिला आहे. यावरून वाद निर्माण झाला आहे. मंदिर बचाव कृती समितीच्या उद्याच्या कार्यक्रमात देखील जितेंद्र आव्हाड सहभागी होणार आहेत.

Uddhav Thackeray : मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर होऊ दे चर्चा; उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींचा आव्हान

महायुती सरकारमधील भ्रष्टाचारावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे. 'चाय पे चर्चा केली होती, तशी आपण भ्रष्टाचारावर होऊ दे चर्चा', असं आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कीव येते. ते भ्रष्टाचाऱ्यांसाठी बदनाम होत असल्याचा टोला देखील ठाकरे यांनी लगावला.

Uddhav Thackeray Mumbai : 'मी देखील मंत्र्यांची हकालपट्टी केली होती'; उद्धव ठाकरेंनी मुंबईतील मोर्चात महायुती सरकारला करून दिली आठवण

'मी देखील मंत्रिमंडळ चालवले आहे. मुख्यमंत्री होतो. त्यावेळी देखील मी मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते. अक्षरश: महिलांसंदर्भात आरोप होते. त्यावेळी संबंधित मंत्र्यांना वनवासात पाठवले होते. कोण होता हा मंत्री माहिती आहे ना', असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्यावर केलेल्या कारवाईची आठवण मुंबईतील मोर्चाला संबोधताना करून दिली.

Supriya Sule : निवडणूक आयोगाविरोधात लढाई महात्मा गांधींजींच्या तत्त्वांनुसार सुरू राहणार; सुप्रिया सुळे

'आमची लढाई सुरू राहणार, कोणत्या परिस्थितीमध्ये ही लढाई मागे घेतली जाणार नाही. महात्मा गांधी यांनी घालून दिलेल्या तत्त्व अन् आदर्शावर ही लढाई लढू', अशी प्रतिक्रिया इंडिया आघाडीच्या दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

Delhi Police : दिल्लीत बेकायदेशीर आंदोलन, इंडिया आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्लीत कुठही आंदोलन करता येत नाही. तरी इंडिया आघाडीने मोर्चा काढला. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन जवळच्या पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिस दलाचे सीपी दीपक पुरोहित यांनी दिली. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांवर काय कारवाई होणार, याबाबत पुढं निर्णय घेतला जाईल, असेही सीपी दीपक पुरोहित यांनी सांगितले.

India election controversy : राहुल गांधी, प्रियंका गांधी,  डिंपल यादव, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

केंद्रीय निवडणूक आयोगावर इंडिया आघाडीच्या काढलेल्या मोर्चाचं नेतृत्व करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह प्रमुख खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दिल्ली पोलिसांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाभोवती बॅरिकेड्स लावले होते. इंडिया आघाडीचे खासदार एवढे आक्रमक झाले होती की, ते बॅरिकेड्सवर चढले. कथित मतचोरीच्या घोटाळ्यावरून इंडिया आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे.

Crime Update : यवतमाळच्या पाटणबोरीत 31 जुगारींना अटक; छाप्यात 45 लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी इथं जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी एक लाख 56 हजार 760 रुपये रोख, 36 लाख रुपये किंमतीच्या तीन कार, तीस मोबाईल, 95 खुर्च्या आणि इतर सामग्रीसह तब्बल 44 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. शकूर पाशा अंकुर अहमद, हनम कोंडा तेलंगणा यांच्यासह तब्बल 31 जुगारींना अटक केली.

India Alliance Protest : इंडिया आघाडीचा मोर्चा पोलिसांनी अडवला

इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला आहे. मकर द्वार ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यास सुरुवात केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चा अडवला. खासदारांनी हातामध्ये 'सेव्ह व्होट'चे बॅनर घेतले आहेत. तर दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की इंडिया आघाडीने या मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेतली नाही.

India Alliance Protest : निवडणूक आयोगाविरोधात ३०० खासदार एकवटले

निवडणूक आयोगाविरोधात आज इंडिया आघाडीचा दिल्लीत मोर्चा आहे. त्यासाठी राहुल गांधीच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचे खासदार एकत्र येत निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करत आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. मतचोरीचा जाब विचारणार आहे.

Mahadevi Elephant Case | महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी आज सर्वोच्च न्यायालयात याचिका

महादेवी हत्तीणीला कोल्हापूर जिल्ह्यात परत आणण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे. राज्य सरकार, नांदणी मठ आणि वनताराच्या टीमकडून संयुक्तरित्या ही याचिका दाखल केली जाणार आहे. महादेवी हत्तीणीला परत आणण्याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल.

India Alliance Protest : परवानगी नसेल तरी मोर्चा काढावा -राजु शेट्टी

इंडिया आघाडीकडून निवडणुकीत मतांची चोरी झाली याविरोधात सर्व खासदार एकत्र येत केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत. मात्र या मोर्चाला आजून परवानगी मिळाली नाही. परवानगी नाकारली तरी सुद्दा मोर्चा काढला पाहीजे. अर्थात मोर्चाच्या नेतृत्वाने ते ठरवावं. परंतु पहिल्यांदाच इतिहासात असा मोर्चा निघतोय. अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.

मतांची चोरी झालीच आहे - हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेसला गळती लागली आहे केवळ कांगावा आहे. काँग्रेस हा विचारधारा असलेला पश्र आहे. भाजप काँग्रेसयुक्त झाली आहे. मतांची चोरी झाली आहे यात दुमत नाही. भाजप निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर डल्ला मारला जात आहे. राज्याच्या निवडणुकीत ते दिसून आले, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले.

काँग्रेस कार्यकर्त्यांची आज पुण्यात कार्यशाळा

आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसच्या नवीन कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन पदाधिकारी आहेत त्यांना मार्गदर्शन होणार आहे. तसेच प्रत्येक कार्यकर्त्या प्रशिक्षित केले जात आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जनआक्रोश आंदोलन

दिल्लीत इंडिया आघाडी आंदोलन करत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन करणार आहे. उद्धव ठाकरे हे आंदोलनात मुंबईत सहभागी होणार आहेत.

कबुतरखान्याच्या विरोधात मराठी एकीकरण समिती आक्रमक

दादरमधील कबुतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी जैन समुदायातील काही लोक आक्रमक झाले आहेत. मात्र, कोर्टाने कबुतरखाना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे समर्थन मराठी एकीकरण समितीने केले आहेत. कबुतरखाना सुरू करण्याच्या मागणी विरोधात समिती आक्रमक झाली असून त्यांनी बुधवारी आंदोलनासाठी जमण्याचे आवाहन केले आहे.

बीड कारागृहात राडा, 'खोक्या'कडे गांजा; पोलिसाला धमकावले

बीडच्या कारागृहात गांज्या वाटपावरून मोठा राडा झाला. कारागृहात असलेला कुख्यात खोक्या ऊर्फ सतीश ‎‎भोसले याचाकडे गांजा होता. ते घेणेसाठी तीन कैदी भिडले. त्यांच्याती वाद सोडवण्यासाठी कारागृहातील एक कर्मचारी गेला असताना त्याला देखील मारण्याची धमकी त्या कैद्यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कारागृहात नेमका गांजा आला कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दादर कबुतरखाना परिसरात पोलिस बंदोबस्त

दादरमधील कबुरतखान्यावर मध्यरात्री ताडपत्री टाकण्यात आली. तसेच या परिसरात पोलिस तसेच दंगल नियंत्रक पथक तैनात करण्यात आले आहे. कबुतखाना बंद करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत. तर, जैन समाज कबुतरखाना सुरू ठेवण्यासाठी आग्रही आहे.

मुंबई शिवसेना कार्यकारणी निवडीच्या प्रतीक्षेत

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मुंबईतील कार्यकारणीची निवड मागील एका वर्षापासून केलेली नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

India Alliance Protest : इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगावर मोर्चा

राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या मतदारयाद्यांमध्ये घोळ असून मत चोरी होत असल्याचा आरोप केला होता. इंडिया आघाडीच्या बैठकीत मत चोरीबाबत एकमत झाले होते. आज मत चोरीच्या निषेधार्थ तसेच कारवाईसाठी इंडिया आघाडीकडून निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर आज (सोमवार) मोर्चा काढण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT