Paddy Scam sarkarnama
महाराष्ट्र

India Pakistan ceasefire Live : गडचिरोलीत 10,000 क्विंटल धान घोटाळा

Ceasefire Violation | भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले. त्यानंतर भारताने देखील आपल्या लष्कराला पाकला जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात दिले आहेत.

Jagdish Patil

Naresh Mhaske News : थंड हवेच्या ठिकाणी जायचं अन् शहाणपण शिकवायचे धंदे सोडा; नरेश म्हस्के यांची ठाकरेंवर टीका

भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर शस्त्रविराम घोषणा करण्यात आली. मात्र पाकिस्तानने आगळीक सुरूच आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी कोणत्या आधारावर केली? असा सवाल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांचं ऐकून शस्त्रविराम का केला? अशी शंका उपस्थित केली होती. यानंतर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना, देशाच्या नेतृत्वाने कच खाल्ली असं म्हणणं फार सोपं असतं. थंड हवेच्या ठिकाणी जायचं आणि देशाला शहाणपण शिकवायचे धंदे आता सोडून द्यायला पाहिजे. देश पूर्ण विचारांती हा निर्णय घेतो आणि जो निर्णय देश घेतो, तो देशाच्या फायद्या करता घेतला जातो असे त्यांनी म्हटले आहे.

Kolhapur Rain News : वळवाच्या पहिल्या पावसाने पन्हाळगड तटबंदीच्या शिळा कोसळल्या

पन्हाळगड व परिसरात रविवारी (ता.11) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला. यावेळी एक तास झालेल्या संततधार वळवाच्या पहिल्या पावसामुळे पन्हाळगडाच्या तटबंदीच्या शिळा मुख्य रस्त्यावर कोसळल्या.

Paddy Scam News : गडचिरोलीत 10,000 क्विंटल धान घोटाळा; अध्यक्ष, उपाध्यक्षांसह 5 जणांना अटक

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून धान घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरू होती. आता या प्रकरणी देऊळगाव खरेदी केंद्राच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर धान घोटाळा प्रकरणी खरेदी केंद्राच्या अध्यक्ष सचिवासह 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Satej Patil News : भाजपच्या पक्ष प्रवेशाचा डाव बंटी पाटलांनी उधळला? मात्र दोन माजी महापौरांसह एका दोन गरसेवक धक्का देणारच

स्थानिकच्या तोंडावर विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात दिलेल्या उमेदवारीवरून मोठा काँग्रेसमध्ये बंडखोरी शक्यता निर्माण झाली होती. तर डझनभर माजी नगरसेवकांचा एक गट शिंदे गट, भाजप किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी हा प्रवेशाचा डाव उधळवून टाकला असून अनेक नगरसेवकांचे मन परिवर्तन करण्यात यश मिळवले आहे.

Ajit Pawar News : अजित पवार यांनी नांदेडमधील शहीद जवानाच्या कुटुंबीयांची भेट घेतली

नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. 11) भेट घेतली. यावेळी त्यांनी शहीद जवान सचिन वनंजे यांच्या आई - वडील आणि पत्नीची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाऊन घेतल्या. तसेच त्यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना काय मदत करता येईल यासाठी सरकार प्रयत्न करेल अशी ग्वाही दिलीय.

DGMO: पत्रकार परिषदेत आली मोठी माहिती समोर

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं कंबरडे मोडले आहे. भारताचे DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा युद्धविराम करारावर सहमती झाली आहे. या कराराचा पुढाकार पाकिस्तानकडून घेण्यात आला, ज्याला भारताने आपल्या अटींसह स्वीकारले. हा करार दोन्ही देशांच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स (DGMO) स्तरावर झाला. भारतीय DGMO आज यासंदर्भात पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींचा खुलासा केला.

Bjp : हजारो लोकप्रतिनिधींसह पक्षाला ठोकला रामराम

शेकापचे बडे नेते तसेच पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह हजारो पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. रायगडात पक्षप्रवेशाची भलीमोठी रांग यावेळी पाहायला मिळाली. त्यामुळे रायगडमध्ये शेकापला हा मोठा धक्का बसला आहे. उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आणि रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या पक्षप्रवेश पार पडला.

Narendra Modi : ऑपरेशन सिंदूर सुरुच राहणार

नवी दिल्ली : पाकिस्तानमधून गोळ्या झाडल्या तर भारतातून तोफगोळे डागले जातील, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. ऑपरेशन सिंदूर थांबणार नसून ते सुरुच असल्याचे भारताने स्पष्ट केले. तसेच अमेरिकेच्या मध्यस्तीनंतर नव्हे तर भारताने स्वतःच्या अटींवर शस्त्रसंधीची घोषणा केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांशी चर्चा केली. तिकडून गोळ्या आल्या तर गोळे फेका, अशा सूचना त्यांनी दिल्या. हम उनको मिट्टी मे मिला देंगे, शत्रूला त्यांच्या घरात घुसून मारलं, तिकडून गोळी चालली तर इकडून गोळे टाका, याचा पुनरुच्चारही मोदी यांनी यावेळी केला.

PM Vishwakarma Yojana : केंद्र सरकारची एक योजना, जी तुम्हाला दररोज पाचशे रुपये मिळवून देईल..

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान, सरकारकडून दररोज 500 रुपये स्टायपेंड देखील दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, सरकार लाभार्थ्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी कोणत्याही हमीशिवाय 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देखील देते.  18 पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या लोकांना लाभ दिले जातात. ही एक कौशल्य सन्मान योजना आहे.

India-Pakistan War : गुप्तचर विभागाकडून अमेरिकेला धोकादायक माहिती अन् मोदी-शरीफ यांना आले फोन

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी भारत-पाक तणावात आमचा काय संबंध असं वक्तव्य 9 मे रोजी केलं होतं. पण दोन देशातील वाढता संघर्ष पाहता व्हान्स, परराष्ट्रमंत्री रुबिया मार्को सुसी विलेस यांच्यात बैठका झाल्या. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी धोकादायक माहिती दिली होती. त्यानंतर व्हान्स यांच्याकडून ट्रम्प यांना शस्त्रसंधीच्या प्लॅनची माहिती देण्यात आली. ट्रम्पसोबतच्या चर्चेनंतर व्हान्स यांचा भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन करण्यात आला, अशी माहिती आहे. 

India-Pakistan :  भारतीय सैन्य दलाचे तीनही महासंचालक देणार माध्यमांना माहिती

भारत-पाकिस्तान युद्धविरामानंतर सैन्य दलाच्या लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सेवांच्या महासंचालक आज सायंकाळी साडे सहा वाजता मिलिटरी ऑपरेशन्स द्वारे माध्यमांना माहिती देणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी काल ट्विट करत भारत-पाकिस्तान या दोन देशामध्ये युद्धविराम झाल्याची माहिती दिली होती. त्यांतर तीन तासातच पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलाच्या तीन्ही महासंचालकांकडून अधिक माहिती देण्यात येणार आहे.

Raju Shetty : शेतकऱ्यांच्या जगण्याचे वास्तव साहित्यिकांनी समाजासमोर मांडले पाहिजे..

भारतीय संस्कृतीचा उदय शेतकऱ्यांपासून झाला. पण राज्यकर्ते आणि शासकीय यंत्रणेच्या भावना बोथट झाल्यामुळे शेतकऱ्याला अन्याय सहन करावा लागतो. भांडवलदारांनी त्यांना लुटण्याचे काम केले. साहित्यिकांनी शेतकऱ्यांचे चित्र योग्यपणे मांडले पाहिजे, अशी अपेक्षा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेत बोलताना व्यक्त केली.

Prakash Ambedkar : शस्त्रविरामाची माहिती ट्रम्प यांच्याकडून का? मोदींनी ती का दिली नाही?

पाकिस्तानकडे मर्यादित प्रमाणात दारूगोळा होता, जो जास्तीत जास्त 10 दिवस पुरला असता. त्यामुळे, पाकिस्तान आणि त्यांच्या पाठबळावर चालणाऱ्या दहशतवादाला कायमची समाप्ती देण्याची संधी आपल्या हातात होती. पण आपण ती संधी गमावली, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली.

Devendra Fadnavis  : 100 वर्षे कुठल्याही वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा टिकेल!

आज सिंधुदुर्गतील मालवण किल्ल्यावर छत्रपतींचा नवा पुतळा दिमाखात उभा राहिला. जवळपास 93 फुट ऊंच हा पुतळा असून 10 फुटाचा चबुतरा देखील आहे. विशेष म्हणजे देशातला हा सर्वात उंच पुतळा आहे. किमान 100 वर्षे कुठल्याही वातावरणात पुतळा टिकेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  पुतळ्याच्या मेन्टेनन्सची जबाबदारी पुढील 10 वर्षांसाठी कंत्राटदार यांच्याकडेच असेल. आम्ही निर्धार केला होता कुठल्याही परिस्थितीत महाराजांना साजेसा पुतळा उभारू तो पूर्ण झालाय.

Praful Patel : चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही : प्रफुल पटेल

भारत-पाकिस्तानच्या युद्धा चिल्लर माणसाच्या सगळ्या गोष्टींची आपण कितपत नोंद घ्यावी, हा महत्वाचा प्रश्न आहे. ज्यांना स्वतःला काही माहिती नाही. आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे, देशाचे भले कशात आहे, हे ज्यांना माहिती नाही. त्यामुळे चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला.

Jalna : जालना महापलिकेवर शिवसेनेचाच भगवा फडणार

प्रथमच अस्तित्वात आलेल्या जालना महानगरपालिकेची येत्या चार महिन्यांत निवडणूक होणार आहे. पहिल्या निवडणुकीत या महापलिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी व्यक्त केला आहे.

Malvan : राजकोटमध्ये उभारण्यात आलेल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

मालवणमधील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. त्याच ठिकाणी अल्पावधीत शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पालकमंत्री नीतेश राणेही उपस्थित होते.

Solapur Bazar Samiti : देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार नव्या नियुक्त्या

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे माजी आमदार दिलीप माने यांची, तर उपसभापतिपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे समर्थक सुनील कळके यांची निवड झाली आहे. ही निवड आगामी दोन वर्षांसाठी असणार आहे. त्यानंतर नव्या संचालकांना संधी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ह्या निवडी करण्यात आलेल्या आहेत

Rahul Gandhi : तातडीने संसदेचे विशेष अधिवेशन घ्यावे

पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान मधील जाहीर केलेले युद्धविराम यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे अशी मागणी कॉंग्रेसचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Sanjay Raut : मध्यस्थी करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा काय संबंध?

भारत पाकिस्तान युद्धात मध्यस्ती केल्याने संजय राऊत यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. आमची माणसे मेली आहेत, आमच्या २६ महिलांचा सिंदूर पुसला आहे. मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे कोणत्या अधिकाराने मध्यस्थी करत आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Solapur APMC : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत माजी आमदार दिलीप माने सभापती पदी आणि भाजप नेते सुनील कळके यांची उपसभापती पदी निवड जाहीर करण्यात आली.

Harshvardhan Rane : पाकिस्तानी अभिनेत्री सोबत काम करण्यास नकार 

अभिनेता हर्षवर्धन राणे याने त्याच्या ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये जर पहिल्याच भागातील कलाकार घेतले तर काम करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेनसोबत काम करण्यास त्याने स्पष्ट नकार दिला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर अभिनेता हर्षवर्धन राणेनं शपथ घेतली आहे. भारतीयांकडून त्याचे कौतुक होत आहे.

माघार घेण्याची गरज नव्हती, बेअब्रु झाली - संजय राऊत

भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीवरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदा टीका केली आहे. माघार घेण्याची गरज नव्हती, बेअब्रु झाली. असे निशाणा राऊत यांनी साधला तसेच इंदिरा गांधीं असत्या तर पाकिस्तानचे अस्तित्व राहिले नसते असे म्हटले.

शस्त्रसंधीसोबत कश्मीरवर देखील तोडगा काढणार : डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सकाळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ट्रम्प यांनी चार दिवसांच्या संघर्षानंतर युद्धविरामासाठी सहमती दर्शवल्याबद्दल दोन्ही देशांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, या आक्रमकतेमुळे लाखो लोकांचे प्राण गेले असते. शांतता प्रस्थापित झाल्यानंतर आता ते दोन्ही देशांसोबत व्यापार आणि काश्मीर प्रश्नाच्या समाधानासाठी एकत्रितपणे काम करतील.

भारत पाकिस्तान तणावात सीएच्या परीक्षा लांबणीवर

भारत पाकिस्तान तणावामुळे ‘सीए’च्या परीक्षा लांबणीवर गेली आहे . ९ ते १४ मेदरम्यान होणाऱ्या इंटरमिजिएट, अंतिम व पोस्ट क्वॉलिफिकेशन कोर्सच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

संरक्षण मंत्रालयाची आज पत्रकार परिषद

संरक्षण मंत्रालयाकडून आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालय भारत पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीची सविस्तर माहिती या पत्रकार परिषदेतून देण्याची शक्यता आहे.

Indian Navy : मुंबईभोवती सुरक्षा वाढवली

Indian Navy : भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भारतीय नौदलाने आता मुंबईतील समुद्रात ताफा तैनात केला आहे.

India Pakistan War Updates : नियंत्रण रेषेवर गोळीबार नाही - लष्करी अधिकारी

भारत-पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर सध्या गोळीबार सुरू नाही, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यानी दिली आहे. शिवाय श्रीनगरमध्ये कोणताही स्फोट झाला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद

जम्मू काश्मीर सीमारेषेवर तैनात बीएएसएफ जवान मोहम्मद इम्तियाज पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना शहीद झाले. आज (11 मे) जम्मूतील फ्रंटियर मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

Ajit Doval : अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या घोषणेनंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर बोलताना युद्ध हा भारताचा पर्याय नाही, असं डोवाल यांनी म्हटलं आहे. मात्र, दहशतवादाविरोधात कारवाई करण्याची गरज आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT