महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15,000 पोलिस भरतीस मंजुरी.
(अन्न, नागरी पुरवठा विभाग)
राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण.
(विमानचालन विभाग)
सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय .
(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ.
महाराष्ट्रातील पोलिस भरती करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील पोलिस दलात तब्बल 15 हजार नवीन भरतींना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या उपस्थितीत आज, मंगळवार दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती इथेनाॅल धोरणामुळे सुधारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हे धोरण आणल्याची धाराशिव इथं माहिती देताना, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचलं. साखर संघाच्या अहवालात मोदी आणि शाह यांचा फोटो अन् अभिनंदनाचा ठराव न घेतल्याने आपण अजित पवारांना 'जनाची नाही तर मनाची ठेवा', असं म्हणत सुनावलं होतं, असा गौप्यस्फोट मंत्री विखे पाटलांनी केला. त्यावेळी अजित पवार हे मंत्रिमंडळात नव्हते, असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले. मंत्री विखे पाटील यांच्या या गौप्यस्फोटामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
खासदार भास्कर भगरे, राजभाऊ वाजे, अरविंद सावंत, बजरंग सोनवणे, निलेश लंके, डॉ. शोभा बच्छाव यांसह विरोधी पक्षाच्या खासदारांनी कांद्याच्या माळा घालून आज संसदेत आंदोलन केले. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
भाजप खासदारांना 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान दिल्लीत आमंत्रित करण्यात आलं आहे. भाजपची दिल्लीत तीन दिवस कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत खासदारांशी संघटनात्मक बाबींवर चर्चा होणार आहे. तसेच देशातील सध्याचे मुद्दे आणि पक्षाची रणनीती कार्यशाळेत मांडली जाणार आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सरकारने शेतकरी कर्जमाफीचे दिलेले आश्वासन फसवे निघत असल्याने रविकांत तुपकर यांची क्रांतिकारी शेतकरी संघटना आता सरकारच्या विरोधात आक्रमक झाली आहे. हिंगोलीमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची राख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. शिर्डी लोकसभेचे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी सोडचिठ्ठी दिली आहे. अकोले तालुक्यातील मारुती मेंगाळ यांच्या प्रवेशानंतर दराडे आणि मेंगाळ यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. मेंगाळ यांनी पक्ष प्रवेशावेळी बोगस यादी सादर करत पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप दराडे यांनी केला होता. मात्र अकोले इथं आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी आपण मारुती मेंगाळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे म्हटले. पक्षांतर्गत वादामुळे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी आपला राजीनामा एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे.
पुण्याच्या खेडमधील कुंडेश्वर अपघातात 10 महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अटक करण्यात आली आहे. ऋषिकेश करंडे असे अटक केलेल्या चालकाचं नाव आहे. ऋषीकेशवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला आहे. सोबतच जखमी 30 महिला आणि लहानग्यांच्या जीव धोक्यात आणला. ऋषिकेश याला रात्रीचं म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात तसेच चामोर्शी तालुक्यात डेंगी तापानं कहर केला आहे. मुलचेरा तालुक्यातील येल्ला गावातील दोन, तर शांतीग्राम गावातील एका महिलेचा मृत्यू डेंगी तापानं झाला आहे. मुलचेरा तालुक्यात डेंगीमुळे चार दिवसांत 236 जणांच्या तपासणीत तब्बल 66 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात 14 वर्षांखालील 12 मुलांचा समावेश आहे. येल्ला गावात सर्वाधिक 41 रुग्ण आढळले असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
खासदार विशाल पाटील यांचे कट्टर समर्थक नगरसेवक मनोज सरगर यांच्यासह माजी महापौर कांचन कांबळे आणि नगरसेविका शुभांगी साळुंखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगतील भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
छत्रपती संभाजीनगर शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार फैजल उर्फ तेजा एजाज सय्यद ( रा. किलेअर्क) याने मैत्रिणीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारत मैत्रिणीच्या हातात गोळी घुसली आहे. तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी रात्री 12 वाजता किलेअर्क भागात घडली. बेगमपुरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपी तेजा एजाजला ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तेजा एजाज सय्यद हा आठ ते दहा दिवसांपूर्वीच जेलमधून जामिनावर बाहेर आला आहे.
अंगारकी चतुर्थी निमित्त पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत आज मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आज पुण्यातील आप्पा बळवंत चौकाकडून बुधवार चौकापर्यंत जाणारा रस्ता बंद राहणार आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज बाजीराव रोड, शिवाजी रोड वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. तर वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्यांना जे.एम.रोड मार्गे पुढे जावं. तर शिवाजी रोडवरून स्वारगेटकडे जाणाऱ्यांनी टिळक रोड मार्गाचा वापर करावा, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
पुनर्विकासाअंतर्गत पात्र धारावीकरांना देण्यात येणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळामध्ये वाढ करत 500 स्क्वेअर फुटांचे घर देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीआरपीला दिले होते. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर धारावीकरांना 500 स्क्वेअर फुटांची घरे मिळणार आहेत.
भिवंडी शहरात भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी यांची निर्घृण हक्या करण्यात आली आहे. प्रफुल्ल तांगडी यांच्यासह तेजस तांगडी अशा आणखी एका तरूणाची हत्या करण्यात आली आहे. भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी येथील ही घटना घडली आहे.
पुण्यातील जिल्ह्यातील खेडमधील कुंडेश्वर येथे दर्शनाला जात असताना झालेल्या भीषण अपघातात 10 महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात 30 हून अधिक महिला जखमी झाल्या आहेत. जखमींवर चाकण आणि इतर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिला भाविक श्रावण सोमवारनिमित्त कुंडेश्वर येथे दर्शनासाठी पिकअपने जात असताना भरधाव पिकअप शंभर फूट खोल दरीत कोसळल्यामुळे हा अपघात घडला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.