Maharashtra Political Live updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Updates : पाकिस्तान बरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रोह आहे - संजय राऊत

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

सरकारनामा ब्यूरो

पाकिस्तान बरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रोह आहे - संजय राऊत

काल पाकिस्तान बरोबर भारत जिंकले त्याच्याबरोबर 25 महिलांचे कुंकू पुसलेले परत आले का यात भरपाई काय झाली? पाकिस्तानला घुसून मारण्याची संधी आली असताना भारतीय जनता पक्षाच्या सरकारने माघार घेतली. क्रिकेटच्या मैदानावरती ती काय फिक्सिंग मॅच होती कालच्या मॅचवर दीड लाख कोटींचा जुगार खेळायला गेला यात पाकिस्तानला सुद्धा त्याचे पैसे मिळाले असतील. कालच्या मॅचमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान एक हजार कोटी मिळाले असतील. तुम्ही पाकिस्तानला आमच्याविरुद्ध लढण्यासाठी महिलांचं कुंकू पुसण्यासाठी सक्षम करत आहात याच्यावर बोला पाकिस्तान जिंकला हरला आम्हाला काही फरक पडत नाही., असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

kokan Rain live: सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट; तळकोकणात पावसाचा जोर वाढला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. अनेक भागात ढगाळ वातावरण असून सावंतवाडी कुडाळ भागात पावसाचा जोर वाढलेला असून पुढील काळात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Pune Rain live: पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील ३ तासात आपल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने दिले आहे.

Acharya Devvrat: उपराज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या उपराज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी असेल.

Beed live: बंजारा समाजाचा आज मोर्चा

एसटीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी आज बीडमध्ये बंजारा समाजाच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात आमदार धनंजय मुंडे सहभागी होणार असल्याची शक्यता आहे.

Rain news live:  उरळीकांचन, हडपसरसह विविध भागात पाणी साचले

पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, पुण्यातील लोणी, उरळीकांचन, हडपसरसह विविध भागांत झाडे पडली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईतही उपनगरांतील शाळांना सुट्टी देण्यात आली.

निवडणुकीच्या कामाला लागा, एकनाथ शिंदेंचे आमदारांना आदेश

आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या आमदार, खासदारांची बैठक घेतली. मंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत निवडणुकीच्या तयारीला लागा,असे आदेश शिंदेंनी आमदार खासदारांना केले.

थेऊरमध्ये पावसाच्या पाण्यात 150 जण अडकले

थेऊर येथील रुके वस्ती जिल्हा परिषद शाळा परिसरात पावसाच्या पाण्यात 100-150 नागरिक अडकले. स्थानिक मदतकार्याबरोबरच पीएमआरडीए व NDRF टीमने बचाव करून सुमारे 50-55 नागरिकांना सुरक्षित हलविले. पाणी ओसरत असून सकाळपर्यंत उर्वरित नागरिक घरी परततील. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पुण्याला ऑरेंज अलर्टचा इशारा, पुढील तीन तास जोरदार पाऊसाची शक्यता

पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात विजांसह वादळी वारे आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आक्रोश मोर्चा आज काढण्यात येणार आहे. नाशिकमध्ये जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी झोपेचं सोंग घेतलेल्या आणि शेतकरी कर्जमाफीसह अनेक खोटी आश्वासनं देऊन जनतेला फसवणाऱ्या स्वार्थी सरकारविरोधात नाशिकमध्ये बळीराजाचा आक्रोश मोर्चा सुरू होतोय.. पाऊस आला तरीही अन्नदात्याच्या हक्काच्या या लढ्यात हजारोंच्या संख्येने सामील व्हा..! असे आवाहन केले आहे.

मुंबई, ठाणे, पालघर बंद पाडू, खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दी बा पाटील यांचे नाव द्यावं यासाठी कार रॅली आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीनंतर मात्र पंधरा दिवसांमध्ये नवी मुंबईचे विमानतळा बद्दल नोटिफिकेशन काढलं नाही तर मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर बंद पडू असा इशारा भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला आहे. तसेच दि बा यांच्या नावासाठी दहा लाख आगरी कोळी समाजा रस्त्यावर उतरेल, असे देखील म्हात्रे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT