Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Updates : यवतमाळमधील पळशी, संगम-चिंचोली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा; 140 कुटुंब पुराच्या पाण्यात अडकलं

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

सरकारनामा ब्युरो

Yavatmal Update : यवतमाळमधील पळशी, संगम-चिंचोली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा; 140 कुटुंब पुराच्या पाण्यात अडकलं

यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर प्रकल्पातील विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या 13 दरवाजे उघडून पैनगंगा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील पळशी, संगम-चिंचोली या गावात पाणी शिरल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. गावात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झालं आहे.

Mumbai Rains : मुंबईसह पुण्यात देखील मुसळधार पाऊस, कामाशिवाय घराबाहेर पडू नका, महापालिकेचं नागरिकांना आवाहन

कालपासून मुंबईत पाऊस सुरू तर रात्रीपासून पावसाने आणखी जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी साचलं आहे. अशातच आता मुंबईत आज देखील हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह पुण्यात देखील मुसळधार पावसाने जोर धरला आहे. अशातच भारतीय हवामान खात्याकडून मुंबईसह, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण, मराठवाडा, विदर्भाला पावसाचा इशारा दिला आहे. तर मुंबई महापालिका प्रशासनाने अति महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका अशी सूचना दिल्या आहेत..

Mumbai Rains : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, जीव धोक्यात घालून प्रवासी उतरले रेल्वे ट्रॅकवर

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ठाण्यातील कळवेकर रेल्वे प्रवासी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. कळवा परिसरातील रेल्वे कारशेट वरून सुटणाऱ्या रेल्वे ट्रेन पकडण्याकरिता नागरिकांची कारखेड ट्रॅकवर मोठी गर्दी झाली आहे. अनेक रेल्वे प्रवासी जीव धोक्यात घालून भर पावसात रेल्वे ट्रॅक वरून ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

Gilbert John Mendonca : मिरा-भाईंदर मतदारसंघाचे पहिले आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांचं निधन

मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार गिल्बर्ट जॉन मेंडोसा यांचं निधन झालं आहे. सोमवारी (ता.18) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मेंडोसा यांनी स्थानिक राजकारणात चार दशकांपेक्षा जास्त काळ महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. त्यांच्या निधनानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी श्रांद्धांजली अर्पण केली आहे. मिरा भाईंदर शहराचे प्रथम आमदार, स्व. गिल्बर्ट मेंडोसा यांचे दुःखद निधन ही अतिशय वेदनादायक घटना आहे. त्यांच्या निधनाने मिरा भाईंदरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक सशक्त व्यक्तिमत्व हरपले, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पन केली.

Kolhapur Circuit Bench : कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये पहिली याचिका गोकुळ दूध संघाच्या विरोधात

कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये कोल्हापूर जिल्हा दूध संघ तथा गोकुळच्या कारभारा विरोधात गर्जना संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बेलवाडे यांनी याचिका पहिली याचिका दाखल केली आहे. गोकुळ दूध संघात गंभीर स्वरूपाचे संशयास्पद व्यवहार झाले असून याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश देऊनही कारवाई न झाल्याने संचालक मंडळ बरखास्त करावी, अशी मागणी बेलवाडे यांनी याचिकेद्वारे न्यायालयाकडे केली आहे. याबाबतची पुढील कामकाज येत्या 26 ऑगस्टला होणार आहे.

Mumbai Rains : पावसामुळे मुंबईतर शाळांना सुट्टी, तर नोकरदारांचे हाल

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले आहेत. सगळेकडे पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर तिकडे हिंदमाता परिसरात पाणी गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. तर आज मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Mumbai University Exam :  मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबईसह रायगड कोकणमध्ये परवापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या आजपासून होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर सुधारीत वेळापत्रकानुसार सर्व परीक्षा 23 ऑगस्टला होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT