Eknath Shinde | Sanjay Raut Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Updates : शिवाजी पार्क मधून गद्दारांच्या मेळाव्यावर चिखलफेक करणार: संजय राऊत

Sarkarnama Headlines Updates : 02 ऑक्टोबर 2025 रोजीच्या राज्यसह देशातील दिवसभरातील विविध महत्त्वाच्या घडामोडी. संघाच्या शताब्दीनिमित्त दसरा मेळाव्यास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे, नारायण गडावर मनोज जरांगे यांचा मेळावा, भगवान गडावर पंकजा मुंडेंचा मेळावा तसेच मुंबईत ठाकरे आणि शिंदे यांचे मेळावे.

Roshan More

Sanjay Raut: 'आधी निष्ठावंताचे मेळावे व्हायचे आता गद्दारांचे मेळावे...

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदेंचा मेळावा म्हणजे गद्दारांचा मेळावा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे, शिवाजी पार्कातून गद्दारांच्या मेळाव्यावर चिखलफेक करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Ajit Pawar live: राष्ट्रवादी काँग्रेसचा मुरबाड येथे आज जाहीर मेळावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुरबाड येथील नवीन जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. . यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीर मेळावा आयोजित केला आहे. अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत. अजित पवार कार्यक्रम स्थळी पोहचले आहेत

Manoj Jarange live: नारायण गडावरुन मनोज जरांगे पाटील काय बोलणार? 

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आज नारायणगडावर दसरा मेळावा होत आहे. बारा वाजता नारायणगडावरून जरांगे काय बोलणार याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

RSS Live: स्वदेशीला दुसरा पर्याय नाहीः  मोहन भागवत 

स्वतःच्या स्वार्थासाठी अमेरिकेने अलिकडेच लागू केलेले आयात शुल्क धोरण आपल्याला काही पैलूंवर पुनर्विचार करण्यास नक्कीच भाग पाडणार आहे. जग परस्परावलंबनावर चालते. तथापि वैश्विक जीवनाची एकता लक्षात घेऊन स्वावलंबी होऊन जीवन जगणे आवश्यक आहे. दुसऱ्या देशांवर असलेली आपली निर्भरता कमी करण्यासाठी स्वदेशी, स्वावलंबनाला दुसरा पर्याय नाही, असे मोहन भागवत म्हणाले.

निलेश घायवळ युरोपमध्येच, पत्नी, मुलगा परतले

कुख्यात गुंड निलेश घायवळ हा पोलिसांना चकवा देत युरोपमध्ये गेला होता. त्याला पासपोर्ट कसा मिळाया याची चौकशी पोलिस करत आहेत. दरम्यान, युरोपमधून निलेश घायवळची पत्नी आणि मुलगा भारतात परतले आहेत. मात्र, पोलिसांच्या भीतीने फरार आहेत. तर, निलेश घायवळ अजुही युरोपमध्ये असल्याची माहिती आहे.

जगाला भारत दिशा दाखवू शकतो - मोहन भागवत

भारत जगाला दिशा दाखवू शकतो. मागील 100 वर्षात महापुरुषांच्या चिंतनाला घेऊन संघ काम करतोय. विविध संस्था, स्थानिक स्तरावर, व्यक्तिगत स्तरावर स्वयंसेवक सक्रीय आहेत. या सगळ्याच्या आधारावर संघाचे चिंतन आहे. सारे जग पुढे गेला आपण देखील पुढे गेले आहोत. आता मागे पाहिले तर गाडी उलटेल. मात्र हळुहळु आपल्याला मागे वळून पाहावे लागले. कामाच्या मागे धावणाऱ्यांना धर्माची दृष्टी द्यावी लागेल, धर्म म्हणजे सर्वांना जोडणार, सर्वांना उन्नत करणाऱ्या धर्माचे उदाहरण आपल्याला जगाला दाखवावे लागेल.

जगभरातील विकासतही दोष - मोहन भागवत

श्रीमंतांमधील आंतर वाढत आहे. जगभरातील सारा समाज अराजकतेकडे जातोय की काय, असे वाटते. जगभरातील विकासतही दोष दिसत आहेत, असे मोहन भागवत म्हणाले.

स्वदेश, स्वावलंबनाला पर्याय नाही - मोहन भागवत

अमेरिकेने टॅरिफ हे त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी लागू केले आहे. मात्र, परदेशांशी संबंध ठेवत आपल्याला स्वदेशी आणि स्वलंबनाचा वापर करावा लागेल. स्वदेशी, स्वावलंबनाला पर्याय नाही, असा संदेश विजयदशमी सोहळ्यात मोहन भागवत यांनी दिला.

उत्तर भारतीय मंचाचे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

उत्तर भारतीय एकता मंचच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मतदाराचे नाव नोंदणीकरिता पक्षानी सहकार्य करावे - गजानन पाटील 

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी - नोव्हो) तयार करण्याचा कार्यक्रमाअंतर्गत राजकीय पक्षाने जिल्ह्यातील पात्र मतदारांचे मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता सहकार्य करावे, असे प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी केले.

राज्यात पाच दसरा मेळावे; संघ,ठाकरे, शिंदे, जरांगे, मुंडेंच्या मेळाव्याकडे लक्ष

राज्यात आज विजयादशमी निमित्त पाच मेळावे वेगवेगळ्या ठिकाणी संपन्न होणार आहेत. नागपूरातील रेशीम बागेत संघाच्या मेळाव्याला सुरुवात झाली असून आज मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांचे मेळावे होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT