मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया लवकरात लवकर करावी. ही प्रक्रिया आपल्या सर्वांच्या हितासाठीच असून यामुळे लाडक्या बहिणींच्या सन्मान निधी वितरणात सुलभता व सुसूत्रता येणार आहे.
"आज, 20 सप्टेंबर हा भारताच्या समुद्री क्षेत्रासाठी आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. सकाळी सुमारे 10:30 वाजता भावनगर येथे ‘समुद्र से समृद्धि’ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात 34,200 कोटी रुपयांहून अधिक कामांचे उद्घाटन किंवा शिलान्यास केला जाईल. यामुळे देशभरातील जनतेला फायदा होईल. तसेच शिपिंग क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या धोरणांवरही आपले लक्ष केंद्रीत राहील."
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भावनगर येथे रोड शो आणि जनसभेत सहभागी झाले. या वेळी शिपिंग व पोर्टशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात येणार आहे. भावनगरच्या विकासाला गती मिळावी आणि रोजगाराच्या संधी वाढाव्यात, यासाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरणार असल्याचे मोदींनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत विकसित ऑनलाईन पोर्टलद्वारे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. राज्यात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून जानेवारी २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत ३ लाख ४१ हजार ९७३ विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असल्याची माहिती ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांनी दिली.
दौंड तालुक्यात सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत तालुक्याचे आमदार राहुल कूल यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ५०० हून अधिक लाभपत्राचे श्रीकृष्ण मंगल कार्यालय, बोरीपार्धी, चौफुला येथे वितरण करण्यात आले. नागरिकांना सेवा पंधरवडा उपक्रमात सहभागी होऊन सेवांचा लाभ घेण्याचे प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याच्या निषेधार्थ इस्लामपूर बंदची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा ४ ऑक्टोबर रोजी पुणे दौरा येणार आहेत.ते स्थानिक स्वराज्य निवडणुकीची तयारी संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. पक्षाचे एकदिवशीय शिबिर देखील आयोजित केले जाणार असल्याची माहिती आहे.
गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य म्हणजे आईला शिवी आहे.राजकीय नेत्यांना शिव्या द्या पण आई वडिलांना शिव्या देणे योग्य नाही. पडळकर कुणाच्या इशाऱ्यावर बोलत आहे, कोण त्याला पाठीशी घालत आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नव्हती ही पद्धत भाजपने सुरू केली आहे एखाद्याच्या आईवर बोलणे हे कोणते संस्कार आहेत? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.