नाशिकमध्ये एका मुजोर परप्रांतीयाने एका स्थानिक रहिवासी असलेल्या मराठी कुटुंबाला दादागिरी करून शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या मनसैनिकांनी त्या परप्रांतीयाला चांगलाच चोप दिला.
शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणांवर आज नगरपरिषदेने कारवाई करत बुलडोजर फिरवला. टपऱ्या, बंद टपऱ्या, हातगाड्या, दुकाने बाहेर काढलेली शेड्स, बोर्ड यांसह वाहतुकीस अडथळा ठरणारी अनेक अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले. अशी कारवाई पुढील काळात सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली.
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कार्यालय आणि घरावर ईडीने छापेमारी केल्यानंतर आता सीबीआयने अंबानी यांच्यावर छापेमारी सुरु केली आहे. आज अंबानी यांच्या अनेक ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली.
इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव येथिल गायरानावरती अतिक्रमण काढण्यादरम्यान पोलीस आणि पारधी समाजात शाब्दीक चकमक उडाली आहे. त्यामुळे पोलिसांनीलाठीचार्ज केल्याची माहिती आहे. पारधी समाजाच्या महिला व लहान मुलांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप होत आहे. पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सावंत यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. ही राजकीय भेट नव्हती, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे शहरातल्या मुख्य गणेश मंडळांची पाहणी करणार आहेत.पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती पासून अमितेश कुमार यांचा दौरा सुरु होईल. मंडप,वाहतूक आणि पोलीस बंदोबस्त याचा आढावा घेणार आहे.
मालाड येथील महापालिकेच्या शाळेच्या खासगीकरणाच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे.पोलिसांनी आंदोलकांना अडवले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नेते अमित ठाकरे भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना शेलार यांच्यासोबर राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी सर्व प्रश्नांचं एकच उत्तर राज ठाकरे असल्याचंही वक्तव्य केलं.
आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. मात्र पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विरोध दर्शवला आहे. पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्यांचे रक्त अद्याप सुकलेले नाही. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू अजून थांबलेले नाही आणि तरीही पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्यास क्रीडा मंत्रालयाने हिरवा कंदील दिला हे प्रत्येक देशवासीयासाठी वेदनादायक आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्रालयाच्या परवानगी शिवाय हे शक्य नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
बीडमधील एका तरुणाने संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परळी परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी श्रीनाथ गोविंद कराड या 25 वर्षीय तरुणाला पूर्वी कार्यरत असणाऱ्या केज येथील शैक्षणिक संस्था चालकाचालकाच्या त्रासाला कंटाळूनच श्रीनाथ कराडने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप केला जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे नुकतंच मनसेप्रमुख राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच अमित ठाकरे भाजप नेत्यांना भेटत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त लावलेल्या साऊंड सिस्टीमवरून दुपारी झालेल्या वादातून दोन समाजात शुक्रवारी रात्री दंगल झाली. सिद्धार्थनगर-राजेबागस्वार परिसरात दगडफेक, तोडफोड करत वाहने जाळण्यात आली. पोलिसांनी लाठीमार करत जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी जमाव आक्रमक होता. यामध्ये पोलिसांसह 10 जण जखमी झालेत.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगें पाटील यांच्या आंदोलनाआधी राज्य सरकारने मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन केलं आहे. या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर या उपसमितीत सद्स्य म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह मंत्री शंभूराज देसाई, आशिष शेलार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणिकराव कोकाटे, मकरंद जाधव, बाबासाहेब पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.