Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Updates : व्होट अधिकार यात्रेत तेजस्वी यादव सहभागी

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

सरकारनामा ब्यूरो

Rahul Gandhi : राहुल गांधींची भाजप सरकारवर टीका

बिहारमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी व्होट अधिकार यात्रा काढली आहे. या वेळी त्यांनी भाजप सरकारवर मत चोरीचा आरोप केला आहे. राजदचे नेते तेजस्वी यादव आता या यात्रेत सहभागी झाले आहेत.

Uddhav Thackeray : निवडणुकीच्या अनुषंगाने शाखा भेटी सुरू

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी शाखा भेटी सुरू केल्या आहे. उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी दहिसर येथे शाखा क्रमांक 4 ला भेट देऊन शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी सगळ्यांनी एक काम करायचं मतदार यादी तपासायच्या. पण सध्या मतं चोरी होताय. डोळ्यांमध्ये तेल घालून मतदार यादीत तपासा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या.

Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला भरणेंच्या नियुक्तीचा किस्सा; ‘ज्याचं काही बाहेर निघालं नाही पाहिजे, असाच कृषिमंत्री शोधून काढतो’

कृषिमंत्र्यांबाबत काहीतरी सारखं निघत असतं. त्यामुळे असं ठरवलं की आता असा कृषिमंत्री निवडून काढतो, त्याचं काही बाहेर निघालंच नाही पाहिजे. आता तुझ्या साक्षीने सांगितलं आहे, का निघू देऊ नको, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना जाहीर कार्यक्रमात सांगितले.

Sadabhau Khot : ....तर विरोधक आम्हा दोघांना नवैद्यालाही शिल्लक ठेवणार नाहीत : सदाभाऊ खोत

आमदार गोपीचंद पडळकर यांना साथ दिली नाही, तर आम्हा दोघांनाही विरोधक नवैद्यालाही शिल्लक ठेवणार नाहीत, असे विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगलीतील एका धार्मिक कार्यक्रमात केले आहे.

Raj-Uddhav Thackeray : राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन; घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी दिले निमंत्रण

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी शिवतीर्थवर येण्यासाठी फोन करून निमंत्रण दिल्याची बातमी आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना घरच्या गपणतीचे दर्शन घेण्यासाठी राज यांनी फोन करून आमंत्रण दिल्याची माहिती आहे.

MUMBAI BJP : मुंबई महापालिका निवडणुकीबाबत रवींद्र चव्हाणांनी बोलावली भाजप नेत्यांची बैठक

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज (ता. 24 ऑगस्ट) बैठक आयोजित केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही बैठक बोलावली आहे. मंत्री अशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर आणि मुंबईतील पक्षाचे सर्व महत्वाचे नेते या बैठकील उपस्थित राहणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर या बैठकी चर्चा होणार आहे.

Vijay Thalapathy : तमिळनाडू विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची विजय थलपतीची घोषणा

अभिनेते विजय थलपतीने आगामी 2026 मध्ये होणाऱ्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली असून डीएमके आणि भाजपसोबत युती करणार नसल्याचेही थलपतीने स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूला काही दिलं नसल्याचा आरोपही थलपतीने मुदराई येथे झालेल्या मेळाव्यात केला आहे. या मेळाव्याला झालेल्या गर्दीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.

Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाका, असं मी तेव्हा सांगत होतो : राज ठाकरे

मी त्याचवेळी सांगत होतो की, लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाका, जागतिक बातमी होईल. आता ते राहुल गांधी यांनी प्रकरण बाहेर काढले. मी तेव्हापासून सांगतोय की, आपल्याला मतदान होत नाही, असं तुम्ही समजू नका. मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत. भलतेच आकडे टाकले जात आहेत आणि तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागतंय, असे विधान राज ठाकरे यांनी पुण्यात मनसैनिकांना मार्गदर्शन करताना केले आहे.

Eknath Shinde On Sangamner : एकनाथ शिंदे आज संगमनेर दौऱ्यावर; कीर्तनातील वादावर काय भूमिका मांडणार याकडे लक्ष

शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संगमनेर दौऱ्यावर येत असून, तिथं कीर्तनकार संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका मांडतात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, संग्रामबापू भंडारे महाराज यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना डिवचलं आहे.

Chhagan Bhujbal : मतदार याद्या तपासून घ्या, मंत्री भुजबळांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

Chhagan Bhujbal

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या मुद्यावरून चौकशीची मागणी केली आहे. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना, 'मतदार याद्या बरोबर आहेत की नाही, नवीन मतदार समाविष्ट करायचे आहे का, पुन्हा डुप्लिकेट आले आहेत का, याची आपल्या पदाधिकाऱ्यांनी तपासणी करावी', असं म्हटलं आहे. ऐन निवडणुकीच्या वेळी तिकीट घेऊन लढवणं, यापेक्षा मतदार याद्या तपासण्यापासून काम सुरू करा, असेही मंत्री भुजबळ यांनी म्हटले आहे.

Dharashiv Update : मराठवाड्यात दुसरे प्राणी संग्रहालय उभारले जाणार; वाघ, सिंह, जिराफ यासारखे प्राणी असणार...

धाराशिवच्या तुळजापूर खुर्द इथल्या वनविभागाच्या जागेत मराठवाड्यातील दुसरे प्राणी संग्रहालय उभारले जाणार असल्याची माहिती आमदार जगजितसिंह पाटील यांनी दिली. या प्राणी संग्रहालयात वाघ, सिंह, जिराफ यासारखे प्राणी असणार आहेत. प्राणी संग्रहालयाच्या नियोजित जागेची वनविभागाच्या अधिकाऱ्यासह आमदार पाटील यांनी पाहणी केली. पुढील पंधरा दिवसात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वनविभागाला याचा प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचंही आमदार पाटील यांनी सांगितलं.

Dharashiv Update : मराठवाड्यातील दुसरे प्राणी संग्रहालय उभारले जाणार; वाघ, सिंह, जिराफ यासारखे प्राणी असणार...

धाराशिवच्या तुळजापूर खुर्द इथल्या वनविभागाच्या जागेत मराठवाड्यातील दुसरे प्राणी संग्रहालय उभारले जाणार असल्याची माहिती आमदार जगजितसिंह पाटील यांनी दिली. या प्राणी संग्रहालयात वाघ, सिंह, जिराफ यासारखे प्राणी असणार आहेत. प्राणी संग्रहालयाच्या नियोजित जागेची वनविभागाच्या अधिकाऱ्यासह आमदार पाटील यांनी पाहणी केली. पुढील पंधरा दिवसात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वनविभागाला याचा प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचंही आमदार पाटील यांनी सांगितलं.

Dattatray Bharne : 10 दिवसात राज्यात पावसामुळे 22 लाख एकर शेतीचं नुकसान; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

10 दिवसात राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने 22 लाख एकरावर शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय, असेही मंत्री भरणे यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar And Ajit Pawar : शरद पवार अन् अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार...

शरद पवार आणि उप मुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या 65 व्या वार्षिक अधिवेशनात दोघं पवार एकाच व्यासपीठावर एकत्र येतील. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दर वर्षी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचं अधिवेशन होत असतं. उप मुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि कृषी विभागांचे प्रधान सचिव विकास रस्तोगी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहेत.

Mahesh Baldi : उरण-नेरूळ रेल्वे प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा, लवकरच फेऱ्या वाढणार...

Mahesh Baldi

उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी दिल्ली इथं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उरण ते नेरूळ या महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गाच्या संदर्भात केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच सध्याच्या 40 फेऱ्यांऐवजी 50 फेऱ्या सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार बालदी यांनी दिली.

Ahilyanagar Crime Update : अहिल्यानगरमध्ये रात्रीतून धार्मिक स्थळ उद्ध्वस्त केल्याने शहरात तणाव

Ahilyanagar Crime Update

अहिल्यानगर शहरातील पटवर्धन चौकात असणाऱ्या एक जुन्या धार्मिक स्थळ उद्ध्वस्त केल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. हा प्रकार आज पहाटे झालं. धार्मिक स्थळ जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून या धार्मिक स्थळाकडे पाहिले जात होते. हे धार्मिक स्थळ संपूर्णपणे तोडून टाकण्याची तयारी केली गेली होती. अहिल्यानगर शहरात यामुळे तणाव असून, परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोतवाली पोलिस सीसीटीव्हीमधील चित्रीकरणाच्या मदतीने धार्मिक स्थळ पाडणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

MNS : मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, परप्रांतीय नागरिकाला मारहाण भोवली

नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकाला मारहाण करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांसह उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला होता. गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून परप्रांतीय नागरिकाने राज ठाकरेंविषयी अर्वाच्च भाषा करत मराठी नागरिकांविरोधात गरळ ओकली होती. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या परप्रांतीय नागरिकाला चोप दिला होता होता.

जय सहकार पॅनेल पराभूत

मुंबई महापालिकेशी संबंधित असलेल्या दी म्युनिसीपल काॅ.बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्याशी संबंधित जय सहकार पॅनेलचा पराभव झाला आहे.

ZP : जिल्हा परिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

जिल्हा परिषदेच्या ७३ गट आणि १४६ गणांची अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी (ता. २२) प्रसिद्ध झाली. जिल्ह्यातील सर्व तहसील, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील फलकांवर प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत गट आणि गणांमध्ये घट झाल्याने आरक्षणदेखील नव्याने करावे लागणार आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय ग्रामविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोग घेणार आहे.

Narendra Modi : भारत जागतिक विकासात 20 टक्के योगदान देईल - PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचं कौतुक केलं आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असून भारत आता जगातील शंभर देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची निर्यात करणार आहे. या संदर्भातील 26 ऑगस्टला खूप मोठा कार्यक्रम आयोजित केल्याचंही मोदींनी सांगितलं. तर तज्ञांनी आता जागतिक विकासात भारताचं योगदान 20 टक्के असेल असं सांगितलं आहे. आज आपल्या बँका पूर्वीपेक्षा खूप मजबूत आहेत. महागाई कमी आहे, व्याजदर कमी आहेत, असंही मोदींनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.

चिपळूनमधील पिंपळी नदीवरचा पूल कोसळला

गणोशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या मुंबईकरांचे हाल होणार आहे. चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल पडल्याने या मार्गावरून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा पूल पडल्याने 10 ते 15 गावांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पूल नदीत कोसळ्यानंतर बांधकाम विभागाचे अधिकारी येथे आले होते. सुदैवाने येथे कोणतीही दुसरी दुर्घटना घडली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT