Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live : ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

Roshan More

लक्ष्मण हाकेंच्या समर्थकाला मारहाण

लक्ष्मण हाके यांचे समर्थक पवन करवर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांचे तीन साथीदार किरकोळ जखमी झाले आहेत. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून केला हे समजू शकले नाही.

मंत्री भुजबळ यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

पावसामुळे मराठवाडा, सोलापूर जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. आता मंत्री छगन भुजबळ यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 1महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची घोषणा केली आहे.

Mumbai Metro : मेट्रो सेवा दोन तास ठप्प, मुंबईकरांची कोंडी वाढली

मुंबईत मेट्रो-७ रेड लाईन दोन तासांपासून खोळंबली. ओवरीपाडा स्थानकापूर्वी तांत्रिक समस्या निर्माण झाली. सकाळी ८ वाजल्यापासून मेट्रो वेळेत नाही, त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो आहे. मेट्रो बंद असल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता आहे. प्रवाशांनी खबरदारी घेण्याचे आवाहन.

Maharashtra Weather : 26 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अलर्ट

26 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे 27 ते 29 सप्टेंबरदरम्यान मराठवाडा, विदर्भ, कोकण व मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी पूरस्थिती संभवते. पुण्यात 28- 29 सप्टेंबरला अतिवृष्टीची शक्यता आहे.

Dharashiv : ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

वालवड गावात दुधना नदीला आलेल्या पुरामुळे सोयाबीन पिके व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची जनावरे व मोटारसायकली वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी व तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आज प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.

Yashomati Thakur live: ओला दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलन- यशोमती ठाकूर

अतिवृष्टीमुळे शेतकर-यांचं मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारनं तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. शेतक-यांच्या प्रश्नावर तातडीनं निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करणार, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

Z.P.Election news update: मतदार याद्या 27 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश

राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या गट व गणनिहाय अंतिम मतदार याद्या व मतदान केंद्रांची यादी 27 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. दिवाळीनंतर याद्या अंतिम होणार असून निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांचा लवकरच मराठवाडा दौरा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याचे राऊत म्हणाले.

फडणवीस यांचा आज सोलापूर, लातूर दौरा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी सात वाजताच सोलापुरात पोहचले, ते धाराशीव येथे रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही धाराशीवच्या दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे या जालना जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूर आणि लातुरच्या दौऱ्यावर आहेत.

सोलापूर-कोल्हापूर महामार्ग बंद

सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सोलापूर - कोल्हापूर महामार्गवरील तिऱ्हे पूल गेला पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सोलापूर - कोल्हापूर वाहतूक झाली ठप्प आहे. तिऱ्हे परिसरातील पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

लक्ष्मण हाकेंचे साथीदार पवन कंवर यांच्यावर जीवघेणा हल्ला

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे विश्वासू समजेल जाणारे पवन कंवर यांच्या सावरगावजवळ हल्ला करण्यात आला. कंवर यांच्यासह त्यांच्यासोबत असेलल्या तीन जणांवर देखील हल्ला गेला गेला. बीडमधील सावरगावजवळ जेवण करत असतानाच 40 ते 50 अज्ञातांनी पवन कंवर यांच्यावर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले.

अजित पवारांनी करमाळ्यात केली नुकसान पाहणी

अजित पवारांनी सोलापूरच्या पूरपरिस्थितीचा पाहणी दौरा करमाळा तालुक्यातील कोर्टी इथून सुरू केला. सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसंच झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनानं काटेकोर नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना त्वरित राबवावी, असे स्पष्ट निर्देश अजित पवार यांनी दिले.

माजी आमदार प्रकाश देवळे यांचे निधन

शिवसेनेचे माजी आमदार आणि प्रति शिर्डी शिरगावचे मुख्य विश्वस्त प्रकाश केशवराव देवळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज (ता. 24 सप्टेंबर) रोजी दुपारी 3.00 वा. वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद, सीना पात्राबाहेर

मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. पावसामुळे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रात्री 11 पासून थांबण्यात आली आहे. सीन नदीच्या प्रवाहात वाढ झाल्यानंतर महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. महामार्ग बंद केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT