Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Updates : भाजप किसान मोर्चाकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 100 टन चारा व कडबा कुट्टीची मदत

Sarkarnama Headlines Updates : 27 सप्टेंबर 2025 रोजीच्या देशासह राज्यातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. राज्यातील पूरपरिस्थिती, हवामान खात्याने दिलेला अलर्ट आणि राज्य शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काय काय मदत देण्यात आली आहे. याबबतच्या ताज्या अपडेट्स जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

Solapur Flood : भाजप किसान मोर्चाकडून शंभर टन चारा व कडबा कुट्टीची मदत

सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी भाजप किसान मोर्चाकडून शंभर टन चारा व कडबा कुट्टीची मदत पाठवण्यात आली आहे. यासाठी सांगलीतून शंभर टन कडबा कुट्टी चाऱ्याचा पहिला ट्रक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आला आहे.

बिहारामधील योजना म्हणजे 'मतदार लाच योजना', ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.26) बिहारमधील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी 'बिहार मुख्यमंत्री महिला रोजगार योजने'ची सुरुवात करण्यात आली. या योजने अंतर्गत बिहारमधील तब्बल 75 लाख महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा करण्यात आले. तर मोदी सरकारची ही योजना बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महिलांची मते मिळवण्याठीचा डाव असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. महिलांच्या खात्यात पैस जमा करून भाजप निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यावर निवडणूक आयोग गप्प का? बिहारातील ही योजना दुसरे तिसरे काही नसून 'मतदार लाच योजना'च आहे. भारतीय निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाने डोळ्यांना झापडे बांधल्याचा परिणाम भारताला भोगावा लागत आहे. मतदार लाच योजनेचा प्रत्येक भारतीयाने धिक्कार करायला हवा, अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारच्या या योजनेवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

Marathwada Rains : मराठवाड्यात पुन्हा पावसाचं थैमान, तर नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस

काल रात्रीपासून मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. नांदेड, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव, परभणी, गोंदिया, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत पावसाने हाहाकार घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह मराठवाड्यातील सामान्य नागरिकांसमोर पुन्हा नवं संकट उभं राहिलं आहे. नांदेडसह अनेक जिल्ह्यांमध्ये सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Laxman Hake : OBC महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरवरून लक्ष्मण हाकेंचा फोटो वगळला

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे मागील काही दिवसांपासून सतत वादात सापडत आहे. आधी त्यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली त्यानंतर त्यांच्या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली ज्यामध्ये ते पैशाच्या व्यवहारा संबंधित बोलत होते. अशातच आता बीडमध्ये होणाऱ्या महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरवरून लक्ष्मण हाकेंना वगळण्यात आलं आहे. बीडमध्ये हे बॅनर लागल्यानंतर हाके यांनी आपल्या सोशल हँडलवर भावनिक पोस्ट देखील केली. 28 तारखेला बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाएल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून मेळाव्यासाठी मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यातील ओबीसी नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं. मात्र, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना बॅनरवर स्थान न दिल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

RSS : 'आरएसएस'ची शतकपूर्ती, संघाकडून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज 27 सप्टेंबर रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्या दिवशी नागपूर येथे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली होती. संघाच्या याच शतकपूर्ती वर्षानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. नागपूरमध्ये देखील आज विशेष पथसंचालन केलं जाणार आहे.

राज्याचा प्रस्ताव आल्यानंतर भरीव आर्थिक मदत करण्याचं PM मोदींंचं आश्वासन, CM फडणवीसांची माहिती

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाने हाहाकार घातला आहे. मराठवाड्यात तर महापूर आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत राज्याचा प्रस्ताव आल्यानंतर भरीव आर्थिक मदत देण्याचं आश्वासन मोदींनी दिलं आहे. अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

Maharashtra Rain Alert : राज्यावर पावसाचं संकट कायम! हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन

मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यात तर या पावसामामुळे नद्यांना महापूर आले आहेत. अशातच आता या पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून आजपासून म्हणजे 27 ते 29 सप्टेंबरपर्यंत राज्यात ऑरेज आणि रेड अर्लट दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पावसामुळे संभाव्य पूर परिस्थिती निमार्ण होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT