नाशिकच्या रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये पूर परिस्थितीची पाहणी मंत्री गिरीश महाजन यांनी केली. गोदावरीला आलेल्या पुरामुळे रामसेतू पूल धोकादायक बनला आहे. गोदाकाठावरील व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मालकीच्या दीडशे बस सुट्या भागांच्या तुटवड्यामुळे अनेक दिवसांपासून रस्त्यावर आलेल्या नाही. दुरुस्ती रखडल्याने मार्गावर धावणाऱ्या बसची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.बस उपलब्ध न झाल्याने अनेक चालक-वाहक कामावरून घरी परत जात आहेत. सुटे भाग खरेदी प्रक्रियेत होत असलेल्या विलंबामुळे प्रशासनावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज होत आहे. सभास्थळी गोंधळ होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबईतील अंधेरी मेट्रो स्थानकावरील जाहिरात केवळ हिंदीत असल्याने मनसे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. मेट्रो स्थानकाच्या फलकाला मनसेच्या कार्यकर्त्यानी काळं फासलं.
राज्यातील ओला दुष्काळ घोषित करावा का ? या पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बोलणे टाळले. धन्यवाद म्हणत त्यांनी प्रश्नाला बगल दिली. चार वेळा ओल्या दुष्काळावर प्रश्न विचारला असता कुठलंही उत्तर रवींद्र चव्हाण यांनी दिले नाही.
कोल्हापूर लोेकसभेचे खासदार शाहू महाराज यांना मी खासदार होऊन दीड वर्षे झाले. परंतु घर मिळालेले नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून आपल्याला महाराष्ट्र सदन येथे राहावे लागत आहे, अशी खंत खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी मराठा महासंघाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलताना व्यक्त केली.
लाडक्या बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांना केवायसी करण्याचे बंधन सरकारने घातले आहे. मात्र, ई-केवायसीसाठी महिलांना अडचणी येत आहे. आटोपी न येणे, वेबसाइट ओपन न होणे अशा समस्यांचा सामना महिलांना करावा लागतो आहे.
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षे आहेत. अजुनही पंचनामे झाले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. माजी कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून नये, राजशिष्टाचारात अधिकाऱ्यांचा वेळ जात असून तातडीने पंचनामे करणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले होता. आता त्यांनी अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित झालेल्या नुकसानामुळे राज्य सरकारने आपत्ती निवारणाची काही पाच महत्त्वपुर्ण कामे तातडीने हाती घ्यावीत, असे सूचवले आहे.
एका एकराच्या मागं एक बोरं सुद्धा सोयाबीन होणार नाही, पंजाबने शेतकऱ्यांना 50 हजार हेक्टरी मदत केली मग महाराष्ट्र सरकारच्या हाताला लकवा मारला का, का नाही मदत करत, का नाही 50 हजार हेक्टरी मदतीच्या कागदावर सही करत, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
भारतीय संघाने एशिया कप जिंकत पाकिस्तानला पराभूत केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले. तसेच ऑपरेशन सिंदूर क्रिकेट मैदानातही निकला एकच भारत जिंकला, असे म्हणत पाकिस्तानला डिवचले.
पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार आज पाच जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. ऑरेंज अलर्टनुसार मुंबई, रायगड, पालघर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्याला जोरदार पावसाची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.