Maharashtra Political Live updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Update : अडचणीत असलेल्या महाराष्ट्राला केंद्राची मोठी मदत, 6418 हजार कोटी रुपये दिले

Sarkarnama Headlines Updates : 3 ऑक्टोबर 2025 रोजीच्या देशासह राज्यातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. केंद्राकडून महाराष्ट्राला कराचे आगाऊ सहा हजार 418 कोटी रुपये दिले, राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला का नाही गेले? जिल्हा परिषदेच्या प्रभाग आरक्षणाचे सोडत वेळापत्रक जाहीर अशा ताज्या अपडेट जाणून घेऊयात.

सरकारनामा ब्यूरो

kolhapur News :  कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज काम बंद आंदोलन केलं. महापालिकेसमोर घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

 Yavatmal live: नगरपालिकांच्या प्रभाग रचना फायनल

यवतमाळ जिल्ह्यातील दहा नगरपालिका तसेच एका नगरपंचायतीचा अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. दहा पालिकेत 276 नगरसेवक राहणार असून यवतमाळ पालिकेत 29 प्रभाग तर 58 नगरसेवक असणार आहेत. न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रक्रियेला वेग आला आहे.

Kolhapur live: कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

विविध मागण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरु केले आहे. कर्मचाऱ्यांकडून महापालिकेसमोर घोषणाबाजी करण्यात येत आहे. मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

October Rain Alert : या  महिन्यात देशात अधिक पावसाचा अंदाज 

या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये देशात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच ११५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

महाराष्ट्र सरकार हे चोरांचे सरकार - प्रकाश आंबेडकर

“महाराष्ट्र शासन हे चोरांचे शासन आहे. जर ओला दुष्काळ जाहीर केला तर शेतकऱ्यांना खावटी द्यावी लागेल. त्यामुळे अधिकाऱ्यांचे आणि सत्ताधाऱ्यांचे कमिशन कमी होऊ नये, म्हणूनच सरकारने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही.” अशी गंभीर टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

पाच वर्षांत ३१ हजार ७८५ दस्तावेजांची नोंदणी

ई-रजिस्ट्रेशनमुळे नोंदणी प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर झाली असून गेल्या पाच वर्षांपासून याची यशस्वीपणे अंमलबजावणी होत आहे . आजअखेर एकूण ३१ हजार ७८५ दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी दिली. नोंदणी व मुद्रांक विभागाच्यावतीने पुणे येथे ई-रजिस्ट्रेशन आणि ई-एसबीटीआर प्रणालीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते, यावेळी नोंदणी उपमहानिरीक्षक ( मुख्यालय) श्री. उदयराज चव्हाण व विभागाचे इतर अधिकारी तसेच विविध बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ॲप द्वारे एसटीचा ठावठिकाणा कळणार- मंत्री प्रताप सरनाईक

) प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा, यासाठी " आपली एसटी " या नावाने नवीन ॲप चे दसऱ्याच्या मुहूर्तावरण लोकार्पण होत असून भविष्यात प्रवाशांना त्याचा चांगला फायदा होईल! तथापि , १२ हजार पेक्षा जास्त बसेस व राज्यभरातील १ लाख पेक्षा जास्त मार्गाचे मॅपिंग करून हे ॲप विकसित केले आहे. भविष्यात लाखो प्रवासी याचा वापर करणार असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यास, प्रवाशांनी त्या जरूर सुचित कराव्यात ,असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

मराठी माणसात फूट पडू देणार नाही - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात स्पष्ट केले की, राज आणि ते एकत्र आलेत ते एकत्र राहण्यासाठी. मराठीची गळचेपी होताना मराठी माणसात फूट पडू देणार नसल्याचे देखील ते म्हणाले.

महाराष्ट्राला केंद्राने  6418 हजार कोटी रुपये दिले

अतिवृष्टीने अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्राला केंद्राकडून कराच्या हप्तांपैकी आगाऊ हफ्ता म्हणून केंद्राची मोठी मदत, 6418 हजार कोटी रुपये दिले आहेत. आता या पैशातून राज्य सरकार पूरग्रस्तांना मदत करणार का? हे अजून स्पष्ट झाले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT