Rahul Gandhi Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Updates : : राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी, भाजप प्रवक्यावर गुन्हा दाखल

Sarkarnama Headlines Updates : 30 सप्टेंबर 2025 रोजीच्या देशासह राज्यातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पाऊस थांबला तरी अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती कायम. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या भूमिकेवर विरोधक ठाम.

सरकारनामा ब्युरो

Rahul Gandhi Threaten :गृहमंत्री अमित शाह यांना पत्र

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या झाडून त्यांची हत्या करू अशी धमकी भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांनी एका टीव्ही वाहिनीवरील चर्चेत दिली. या प्रकरणी केरळमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. प्रिंटू महादेवन यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून केली.

Sanjay Raut:   बँकांमध्ये घोटाळे केले आहेत, त्यांच्याकडून तो पैसा वसूल करून करा

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जमीनच वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुटपूंजी मदत न करता किमान 50 हजार रुपये हेक्टरी मदत करावी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ज्या मंत्र्यांनी बँकांना लुटले आहे, बँकांमध्ये घोटाळे केले आहेत, त्यांच्याकडून तो पैसा वसूल करून तो शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

Shivsena live :शिंदेसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी सावंतवाडी मतदारसंघातून 5000 शिवसैनिक जाणार

शिंदेसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदान येथे होणार आहे. मेळाव्यासाठी सावंतवाडी मतदारसंघातून सुमारे 5000 शिवसैनिक जाणार आहेत. तर जिल्हाभरातूनही शिवसैनिक उस्फूर्त पणे दसरा मेळाव्यासाठी रवाना होतील असा दावा शिवसेनेचे सावंतवाडी जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पुण्यात अराजकतेच्या विरोधात आंदोलन

'गुंड निलेश घायवळ फरार आणि सोनम वांगचुक यांना अटक', ही अराजकता आहे, असं म्हणत केंद्र आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करत पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येत आहे. गुन्हेगारांना मोकळे रान, देशाची सेवा करणाऱ्यांना मात्र तुरुंगवास, असं म्हणत बालगंधर्व चौकात हे आंदोलन सुरू आहे. एकीकडे महाराष्ट्राचे गृहमंत्री खंडणी, दरोडा, अपहरण, खून, गोळीबार असे गुन्हे असलेल्या निलेश घायवळला लंडनला पळवून लावण्यासाठी कार्यरत आहेत आणि दुसरीकडे देशाचे गृहमंत्री सत्तेच्या बळावर सोनम वांगचुक यांच्यासारख्या मॅगसेसे पुरस्काराने देशाचे नाव उज्वल करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात डांबतात. याच अराजकतेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करत असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे.

BMC Election : मुंबई महापालिकेची प्रभाग रचना 6 ऑक्टोबरला जाहीर होणार

सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती, सूचना जाहीर घेतल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेली प्रभाग रचना 6 ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे. निवडणुकीसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.

Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवेसींची आज अहिल्यानगरमध्ये सभा

असदुद्दीन ओवेसींची आज अहिल्यानगरमध्ये सभा होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ही सभा होणार आहे. तसंच या सभेनंतर वक्फ बोर्डाची बैठक देखील होणार आहे. मात्र काल अहिल्यानगर शहरात झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांमध्ये रात्री उशिरापर्यंत या सभेसाठी परवानगी द्यायची की नाही याबाबत संभ्रमावस्था होती.

Cabinet Meeting : आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पूरग्रस्तांबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता

आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यभरात पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळण्याची शक्यता आहे. शिवाय पंचनाम्यासंदर्भातील निकष शिथिल केले जाऊ शकतात. त्यामुळे आजच्या बैठकीकडे राज्यभरातील शेकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Aditya Thackeray : सध्या महाराष्ट्रात निवडणुका नाहीयेत हे शेतकऱ्यांचं दुर्दैव - आदित्य ठाकरे

ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं घोर दुर्दैव आहे की सध्या महाराष्ट्रात निवडणुका नाहीत. अन्यथा केंद्र आणि राज्यातलं भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाटी मोठमोठे आकडे जाहीर करण्यात अग्रेसर असतं आणि मदतीपेक्षा मोठ्या जाहिराती करण्यासाठी धडपडत असतं, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राला अतीवृष्टीचा जबरदस्त फटका बसलाय. मराठवाडा, विदर्भातला काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्र संकटात सापडला आहे. पण केंद्राच्या तिजोरीत सर्वात जास्त वाटा उचलणारा महाराष्ट्र मात्र आजही दुर्लक्षित राहिलाय. या सरकारने बिनशर्त कर्जमाफीचं वचन दिलंय. आता मात्र योग्य वेळेची वाट बघा, असं म्हणत आहेत. कर्जमाफी आत्ता नाही तर मग कधी? निवडणुका जवळ आल्यावर असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT