4 senior IAS officers transferred in Maharashtra Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra IAS Transfer: फडणवीस सरकारकडून पुन्हा एकदा प्रशासनात मोठे फेरबदल; 4 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांवर सोपवली नवी जबाबदारी

IAS News: महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेत पुन्हा एकदा महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वीच राज्य शासनाने तीन वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले होते.

Deepak Kulkarni

Mumbai News: महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेत पुन्हा एकदा महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वीच राज्य शासनाने तीन वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले होते. आता शुक्रवारी(ता. २० नोव्हेंबर) रोजी राज्यातील चार वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

फडणवीस सरकारकडून सातत्यानं आयपीएस आणि आयएएस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू आहेत. या बदल्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शासनाने शुक्रवारी जारी केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या प्रवीण कुंडलिक पुरी तसेच महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्यासह एकूण चार अधिकाऱ्यांकडे नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाने मंगळवारी (ता.17 नोव्हेंबर) तीन वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले होते. त्यात वरिष्ठ अधिकारी अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांचा समावेश होता. या सर्व अधिकाऱ्यांकडे मंत्रालयातील महत्त्वाच्या विभागांची धुरा सोपवण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे (MAIDC) व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेल्या अशोक वामन काकडे यांची मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तर उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या प्रवीण कुंडलिक पुरी यांच्याकडे महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सचिवपदाची जबाबदारी दिली आहे.

राज्य शासनाने गुलाब राजाराम खरात यांची महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली आहे. तर मुख्यमंत्री सचिवालयातील मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून कार्यरत असलेल्या मकरंद प्रल्हाद देशमुख यांची मुंबईतील राज्य कर विभागाच्या सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT