Maharashtra Live Updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Updates : देश-विदेशात दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

सरकारनामा ब्यूरो

जीआरचा विरोध करणाऱ्या मराठा अभ्यासकांना विखेंनी चर्चेला बोलावलं; योगेश केदार यांची टीका 

सरकारनं हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीबाबत काढलेल्या जीआरला मराठा अभ्यासकांनी विरोध केला होता. त्यांना उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी चर्चेला बोलावलं आहे. यावरुन जरांगेंचे सहकारी अॅड. योगेश केदार यांनी टीका केली आहे.

"आम्ही चर्चेला येऊ, पण मराठवाड्यातील मराठ्यांना 'कुणबी' प्रमाणपत्र देण्याचं अधिकार क्षेत्र आहे का? मराठवाड्यातील साडेआठ हजार गावांपैकी दीड हजार गावांमध्येच कुणबी नोंदी आहेत, उरलेल्या सात हजार गावातील मराठ्यांना कुणबी नोंदीच नाहीत, त्यांना तुम्ही ओबीसीतून आरक्षण देऊ शकणार आहात का? तरच चर्चा करण्यात मजा आहे," असं योगेश केदार यांनी म्हटलं आहे.

OBC Leader : नागपुरात उद्या विदर्भातील ओबीसी नेत्यांची बैठक

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सातारा संस्थानचे गॅझेटसंदर्भात महिनाभरात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर विदर्भातील ओबीसी नेत्यांची उद्या (ता. 06 सप्टेंबर) नागपूरमध्ये बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस कार्यकर्ते, राजकीय नेते आणि वकिल महासंघाचे सभासद उपस्थित राहणार आहेत. नागपूरच्या रवि भवनात ही बैठक होणार आहे.

Maratha Reservation : मराठ्यांना ओबीसीमधून नको; तर मराठा म्हणून आरक्षण द्या : मुधोजीराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाही. मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्या, अशी मागणी मुधोजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. फडणवीस हे नागपूर दौऱ्यावर असताना मुधोजीराजे भोसले यांनी या मागणीचे निवेदन दिले आहे.

Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणतात, ‘मला ते पत्रक दाखवले नाही’; भुजबळांना मी स्पष्टीकरण देईन : विखे पाटील

माझ्याशी विचारविनिमय केल्याची दिशाभूल करू नका. हैदराबाद गॅझेटच्या संदर्भाने काढण्यात आलेले परिपत्रक मला दाखविण्यात आलेले नाही, असे सांगून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला इशारा दिला होता. त्यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, भुजबळ हे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या मनात काय असेल मी स्वतः त्यांची भेट घेईन. त्यांना ज्या मुद्याचे स्पष्टीकरण पाहिजे, ते मी स्वतः भेटून देईन.

Ajit Pawar Viral Video : अजित पवारांंनी कधीही चुकीच्या कामाचे समर्थन केलेले नाही : उमेश पाटील

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधीही चुकीच्या कामाचे समर्थन केलेले नाही. या प्रकरणात विर्पयास केला जात आहे. कारण नसताना या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न थांबवला पाहिजे, त्यांनी अधिकाऱ्याला दमबाजी केली म्हणणे चुकीचे आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिले आहे.

OBC Protest : परवानगी नसतानाही बारामतीत ओबीसींचा मोर्चा

परवानगी नसतानाही बारामतीत ओबीसींचा मोर्चा निघाला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील उपस्थितीत झाले आहेत. गणेशोत्सव व ईद च्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

OBC : ओबीसी बांधवांनी औंढा -जिंतूर मार्ग रोखला

राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा जीआर काढल्याने राज्यभरात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी बांधवांनी औंढा -जिंतूर मार्ग रोखला आहे. हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत. सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

Mumbai : मुंबईत 400 किलो आरडीएक्सचा स्फोट घडवण्याची धमकी 

मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान मानवी बॉम्फस्फोटाच्या धमकीचा मॅसेज वाहतूक पोलिसांना आला आहे. वाहतूक पोलिसांच्या व्हाट्सअपवर हा मॅसेज आला आहे. ३४ गाड्यांमध्ये मानवी बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. ४०० किलो आरडीएक्सचा स्फोड घडवण्याची ही धमकी आहे. हा निवावी कॉल असल्याची माहिती देत मुंबई पोलिस अलर्ट झाले आहे.

OBC Morcha Baramati : लक्ष्मण हाकेंच्या मोर्चाला बारामतीत परवानगी नाकारली

बारामतीत आज मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार आहे. परंतु बारामती पोलिसांनी गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. पुढील तारीख घ्या अशी आंदोलकांना पोलिसांनी विनंती केली आहे.

Mumbai live: अनंत चतुर्दशीपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट होणार?

अनंत चतुर्दशीपूर्वी बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांना आला आहे. वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर हा धमकीचा मेसेज आला आहे. या संदेशात 34 वाहनांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी दिली आहे. 400 किलो आरडीएक्समुळे 1 कोटी लोक मृत्युमुखी पडतील, असा दावा करण्यात आला आहे.

Congress live: सर्व शाळांच्या व्यवहारात मराठी अनिवार्य करा

काही दिवसापूर्वीच ठाकरे बंधूंनी राज्यात हिंदी सक्तीचच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत सरकारला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडले होते. आता काँग्रेसनेही ठाकरे बंधूंच्या पावसावर पाऊल ठेवत मराठीच्या मुद्यांवरुन सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. सर्व सरकारी ,खाजगी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना दैनंदिन व्यवहारांमध्ये मराठी अनिवार्य करण्याची मागणी ठाणे काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

Pune PMC School live: पुणे महापालिकेच्या 75 शाळा होणार मॉडेल स्कूल

शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी, यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा महापालिका शाळांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 75 शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शाळांमध्ये आवश्यक सुविधा पुरवताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले. याबाबत आराखडा तयार करून शिक्षण मंडळामार्फत अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Malegaon live : मालेगाव महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

मालेगाव महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. 21 प्रभागांतून 84 नगरसेवक निवडले जाणार आहेत. नवीन प्रभाग रचनेवर 15 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. 2017 प्रमाणेच प्रभाग रचना, फारसा बदल नाही. प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे निवडणुकीचे रणशिंग फुंकले

पुण्यात प्रभाग रचनेवर साडेपाच हरकती

पुणे महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेवर साडेपाच हजार हरकती आल्या आहेत. गुरुवारी हरकती नोंदवण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल दोन हजार 899 हरकती दाखल झाले आहे. लवकरच या हकरतींवर सुनावणी घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.

महिला IPS ला धमकी, अजित पवारांवर यशोमती ठाकूर यांची टीका

गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी स्वतः उपमुख्यमंत्रीच जर अवैध उत्खनन करणाऱ्या गुन्हेगारांना प्रोत्साहन देत असतील आणि कायद्याचे पालन करणाऱ्या IPS महिला अधिकाऱ्याला धमकावलं जात असेल तर हे, राज्यासाठी अतिशय लाजिरवाणी बाब आहे. अंजली कृष्णा यांनी दाखवलेले धैर्य आणि प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे, पण अजित पवार यांचे हे वर्तन राज्यासाठी खरंच दुर्दैवी आहे. सरकारच्या आशीर्वादानेच भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर बाबींना प्रोत्साहन मिळत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हे पाहत आहे, अशी टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अजित पवारांवर केली आहे.

बारामतीत आजपासून ओबीसींचे आंदोलन

हैद्राबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा केला, असा आरोप करत ओबीसी संघटनांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. लक्ष्मण हाके यांनी आज बारामतीमध्ये मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आहे, असे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT