Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live|नाशिक महापालिकेची अंतिम प्रभाग रचना आज जाहीर होणार

Sarkarnama Headlines Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई विमानतळाचे उद्घाटन होणार आहे, कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या घरावर पोलिसांनी पुन्हा छापा टाकला आहे, मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना आज जाहीर होणार, यासह अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.

सरकारनामा ब्यूरो

Anandacha Shidha: आनंदाचा शिधा योजनेला ब्रेकः भुजबळ काय म्हणाले

राज्यातील सगळ्याच विभागासाठी निधी कमी झाला आहे, त्यामुळे काही योजनांवर त्याचा ताण येत आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. आनंदाचा शिधा योजनेला ब्रेक लागला आहे, या पार्श्वभूमीवर भुजबळ माध्यमाशी बोलत होते.

Nashik Mahapalika: नाशिकमध्ये इच्छुकांसह राजकीय पक्षांचं लक्ष

नाशिक महापालिकेची अंतिम प्रभाग रचना आज जाहीर होणार आहे. कोणत्या प्रभागात काय बदल होतो, याकडे इच्छुकांसह राजकीय पक्षांचं लक्ष लागले आहे. नाशिक महापालिकेसाठी ३१ प्रभागात १२२ वॉर्ड आहेत.

Marathi live: मराठी भाषा सप्ताहाचे उद्धघाटन

अमरावतीत: अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे उद्धघाटन शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस् झाले. अमरावती गाडगेबाबा विद्यापीठात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने भारतीय अभिजात भाषा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदा ‘आनंदाचा शिधा’नाही?

शिवभोजन थाळी ही योजना जवळपास बंद पडल्याची चर्चा सुरू असतानाच आता ‘आनंदाचा शिधा’ ही लोकप्रिय योजना देखील कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीला अवघे 12 दिवस बाकी असताना याबाबत सरकारी पातळीवर कुठलीही हालचाल दिसत नाही.

केंद्राला मदतीसाठी प्रस्ताव पाठवला नाही

अहिल्यानगरमध्ये रविवारी दौऱ्यावर आलेल्या अमित शाहांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे सांगितले, मात्र, त्यांच्या वक्तव्यावरुन महायुती सरकारकडून केंद्र सरकारकडे अजूनही मदतीसाठी प्रस्ताव पाठवला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणूक आयोगाची चार वाजता पत्रकार परिषद

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा आयोगाकडून या पत्रकार परिषदेमध्ये घोषित केली जाण्याची शक्यता आहे.

पोलिसावर कोयत्याने हल्ला

पुणे पोलिसावर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रविवारी मध्यरात्री कट मारल्याच्या रागातून डेक्कन परिसरातील लॉ कॉलेज रोडवर गुन्हे शाखा युनिट-३ मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार अमोल काटकर यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला.

रोहित पवार घेणार मंगेश साबळेंची भेट

राज्यातील शेतकरी आज अतिवृष्टीने पुरता कोलमडला असून ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सिल्लोड तहसील कार्यालयासमोर मागील सहा दिवसांपासून शेतकरी आमरण उपोषण करत आहेत. उपोषणकर्ते सरपंच मंगेश साबळे यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असून सरकारने अजूनही दखल घेतलेली नाही, असे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटरवरून सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहेकी, त्यांची खालावत असलेली तब्येत बघता त्वरित त्या भागातील मंत्री किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ संवाद साधत तोडगा काढावा, ही विनंती! त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी! सोमवार मीही त्यांची भेट घेणार आहे.

नवी मुंबईतून पंतप्रधान मोदी निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

नवी मुंबईतील दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवारी होणार आहे. या विमानतळ्याच्या उद्घाटनाची तयारी जोरात 50 हजार लोक बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमातून पंतप्रधान आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT