Maharashtra Budget Session 2025 sarkarnama
45 हजार कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प
मुद्रांक शुल्कातही वाढ जाहीर
बांधकामासाठी लागणाऱ्या क्रेन्सवर 7 टक्के कर वाढ
चार चाकी वाहनांचा करात एक टक्क्यांनी वाढ
3 ऑक्टोबर अभिजात मराठी भाषण सन्मान दिन म्हणून घोषणा. 3 ते 9 ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करणार
माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक
सातारा जिल्ह्यातील कोयना इथे जल पर्यटन केंद्र
नाशिक कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना
24 लाख महिलांना लखपती दीदी बनविणार
नायगाव येथे महिला सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारणार
आंबेगावच्या शिवसृष्टीसाठी अजून 50 कोटींचा निधी
हरियाणातील पानिपत येथेही स्मारक उभे करणार
छत्रपती संंभाजी महाराजांचे संगमेश्वरमध्ये भव्य स्मारक उभारणार
आग्र्यातील लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणार
बचत गटांसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल. पहिल्या टप्प्यात 10 उमेद मॉल उभारणार
लाडक्या बहिणीला 2100 रुपयांची घोषणा नाही
लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत 33 हजार 232 कोटी रुपये खर्च. दोन कोटी महिलांना लाभ. पुढील वर्षासाठी 36 हजार कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. यावेळी विरोधकांनी अजित पवार यांना 2100 रुपयांच्या आश्वासनाचे काय झाले? असे विचारल्यावर त्यांनी चिडून "जरा बजेट होऊ द्या" असे विरोधकांना सुनावले.
70 टक्के ग्राहकांचे वीज बिल शुन्यावर येणार
1 ते 100 युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना छतावरील सौर उर्जा संच देण्यात येणार. दीड कोटी ग्राहकांना या योजनेसाठी अनुदान देणार. यातून 70 टक्के ग्राहकांचे वीज बिल शुन्यावर येणार.
घरकुल योजनेत महाराष्ट्र नंबर वन. आतापर्यंत 44 लाख घरकुलांना मंजुरी
घरकुल योजनेत महाराष्ट्राकडून 50 हजारांची वाढ
घरकुल योजनेतील घरांच्या छतावर सौर उर्जा केंद्र बसविणार
जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5 हजार 818 गावांतमध्ये कामे सुरू
सौर कृषी पंपाची संख्या वाढवणार, सध्या दरदिवशी 1 हजार पंप बसविले जात आहेत.
मरोळला आंततराष्ट्रीय मत्स्य बाजार स्थापन करणार
एक तालुका एक बाजार समिती योजना आणणार
राज्यात बांबू उत्पादक क्षेत्र वाढवणार, 4300 कोटींचा प्रकल्प
गोसीखुर्द प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण करणार
अपूर्ण सिंचन योजना प्रकल्पांसाठी 5 हजार कोटींची तरतूद
कृषी संजीवनी योजना 21 जिल्ह्यांमध्ये राबवणार
कृषी क्षेत्रासाठी एआय धोरण आखणार
महामंडळाच्या 600 डिझेल बसेस सीएनजीमध्ये करणार
नवी मुंबई विमानतळावरून 2025 अखेर देशांतर्गत विमान सेवा सुरू होणार
अमरावती विमानतळावरून 31 मार्चला पहिले प्रवासी विमान झेपावणार
शिर्डी विमानतळाला नाईट लँडिगची सुविधा लवकरच सुरू होणार
येत्या वर्षात 41 किमीचे मेट्रो मार्ग सुरू होणार. मुंबई आणि नवी मुंबईला मेट्रोने जोडणार
पुणे ते शिरूर उन्नत मार्गाचे बांधकाम सुरू होणार, तळेगाव ते चाकण 4 पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित
64 हजार 787 कोटींंचे प्रकल्प, मुंबईला गतिमान करण्यासाठी
शक्तीपीठ महामार्ग भुसंपदानाची कारवाई प्रगतीपथावर, मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करणार
सिंधुदुर्गमधील देवबागमध्ये विशेष प्रकल्प
2025-26 मध्ये राज्यात 1500 किमी लांबीचे उद्दिष्ट
मुंबईतील तिसरे विमानतळ वाढवण बंदराजवळ होणार : अजित पवार
वाढवण बंदराजवळ मुंबईतील तिसरे विमानतळ प्रस्तावित आहे. हे बंदर बुलेट ट्रेन आणि समृद्धी महामार्गाने जोडले जाणार आहे.
पर्यटनाला बंदर करातून सूट,
पाच वर्षात 50 लाख नवीन रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट
राज्यात सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र स्थापन करणार
10 हजार महिलांना कौशल्य आणि कृत्रिम बुद्धीमतेचे प्रशिक्षण देणार
राज्यात 37 विशेष आर्थिक क्षेत्रं विकसित करणार
गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी 500 कोटींची तरतूद
अजित पवारांकडून कवितेच्या माध्यमातून मानले लाडक्या बहिणींचे आभार
लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो,
कोटी बारा प्रियजनांना मान्य झालो
विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो, पुन्हा आलो...
अजित पवारांकडून अर्थसंकल्पाचे वाचन सुरू
अजित पवारांकडून अर्थसंकल्पाचे वाचन सुरू झाले आहे. सुरुवातीला ते सरकारची धोरणात्मक माहिती देत आहेत. तसेच पुढील वर्षभरात सरकारचे काय नियोजन आहे आणि उद्दिष्ट्ये मांडत आहेत.
अजित पवार विधानभवनात दाखल
महायुती सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प मांडत आहेत. त्यासाठी ते विधानभवनात दाखल झाले आहेत.