Mumbai News : लोकसभा निवडणुकीनंतर 'सांगली पॅटर्न' राज्यभर चर्चेत आला. या पॅटर्नची आता विधानसभा निवडणुकीवेळी देखील चर्चा आहे.
पण याच पॅटर्नवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जाहीर माफी मागितली. तसंच मुख्यमंत्री पदाबाबत देखील मोठे भाष्य केले. महाविकास आघाडीतून कोणीही मुख्यमंत्री झाले तरी मला चालेल, असे स्पष्ट थोरातांनी सांगितले.
बाळासाहेब थोरात काँग्रेसचे (Congress) स्टार प्रचारक आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी त्यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. विधानसभा सभागृहातील ते ज्येष्ठ नेते असून, काँग्रेसकडून त्यांचे मुख्यमंत्री पदासाठी नाव चर्चेत आहेत. यातच थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्यातील राजकीय संघर्ष राज्यात परिचित आहे. या विधानसभा निवडणुकीला संगमनेर विधानसभा मतदारसंघात झालेल्या राड्यामुळे थोरात अधिकच चर्चेत आहेत.
बाळासाहेब थोरातांनी सांगली पॅटर्नवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाची जाहीर माफी मागितली. बाळासाहेब थोरात यांनी लोकसभा निवडणुकीत सांगलीत बंडखोर विशाल पाटलांना काँग्रेसची मदत झाल्याचे जाहीरपणे कबुली दिली. यावर भाष्य करताना, विशाल पाटलांना काँग्रेसकडून झालेली ही मदत नाकारता येणार नाही, असे सांगताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेत्यांकडे पाहून आम्हाला क्षमा करा, असे थोरात यांनी म्हटले. सगळ्या मदतीने विशाल पाटील खासदार झाल्याचे नाकारताच येणार नाही, असेही थोरात यांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सांगलीची जागा लढवली. परंतु इथं काँग्रेसमध्ये बंडखोरी करत विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत छुप्यापद्धतीने काँग्रेसने विशाल पाटील यांना मदत केली. मविआतील शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला होता. यानंतर राज्यात सांगली पॅटर्न चर्चेत आला. याच सांगली पॅटर्नवर बाळासाहेब थोरात यांनी माफी मागितली.
विशाल पाटील यांना खासदार होण्यास काँग्रेसने मदत केल्याची जाहीर कबुली बाळासाहेब थोरात यांनी देत माफी मागितली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सांगलीची जागा लढवली होती. चंद्रहार पाटील त्यांचे उमेदवार होते. विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. मविआचे उमेदवार असून देखील चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला होता. बंडखोर विशाल पाटील विजयी झाले होते. यानंतर सांगली पॅटर्न चर्चेत आला.
बाळासाहेब थोरात यांनी सांगली पॅटर्नपाठोपाठ मुख्यमंत्री पदावर देखील मोठं विधान केले. ते म्हणाले, "मुख्यमंत्रीपदाविषयी बोलायचं कशाला. महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. मविआमधील कोणीही मुख्यमंत्री झाले, तरी मला चालेल". मुख्यमंत्रीपदाची चर्चा होते, ती फक्त महाविकास आघाडीचीच होते. महायुतीची झाली का? त्यांनी विरोधी पक्षनेते पदाची चर्चा करावी, असा टोला थोरातांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.