Maharashtra Assembly Election 2024 Sarkarnama
महाराष्ट्र

IANS Opinion Poll : राज्यात मोठी उलाढाल! महायुती की 'मविआ' यंदा कुणाचं सरकार? मतदानापूर्वीचा पहिला सर्व्हे आला समोर

IANS and Matrize Opinion Poll : लोकसभेच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. तर दुसरीकडे महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेसह अन्य योजनांमुळे राज्यात युतीचं पारडं जड मानलं जात आहे. अशातच आता आयएएनएस आणि मॅट्रीझ माध्यम समुहाने केलेल्या निवडणूक मतदानपूर्व सर्व्हे समोर आला आहे.

Jagdish Patil

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीत जोरात सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राज्यात आपलंच सरकार येणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं चित्र खूप वेगळं असल्याने नेमकी कोणाची सत्ता येणार ह सांगणं कठीण झालं आहे.

कारण या विधानसभा निवडणुकीला (Vidhan Sabha Election 2024) राज्यातील तीन प्रमुख राजकीय पक्ष एकत्र आले असून युती-आघाडीच्या माध्यमातून ते निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे यंदा राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील नेते, पदाधिकारी आणि मतदार देखील विभागले आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या (Shivsena) फुटीमुळे या पक्षांमध्ये दोन गट पडले आहेत. त्यातील एक गट महाविकास आघाडी आणि दुसरा महायुतीसोबत आहे.

राज्यात कोणाचं सरकार येणार?

लोकसभेच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. तर दुसरीकडे महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेसह (Ladaki Bahin Yojana) अन्य योजनांमुळे राज्यात युतीचं पारडं जड मानलं जात आहे. अशातच आता आयएएनएस आणि मॅट्रीझ माध्यम समुहाने केलेल्या निवडणूक मतदानपूर्व सर्व्हेतून (A pre poll survey by IANS and Matriz media) राज्यात कोणाचं सरकार येणार? याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे.

'आयएएनएस'च्या सर्व्हेनुसार राज्यातील सर्व म्हणजे 288 मतदारसंघांचा आढावा घेतल्यास महायुतीची (Mahayuti) बाजू स्ट्राँग दिसत आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांच्या महायुतीला मिळून 145 ते 165 जागा मिळण्याची शक्यता असून राज्यात स्थापन महायुती सरकार स्थापन करू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची महाविकास आघाडी 106 ते 126 जागांवर विजयी होऊ शकते असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्यातील इतर पक्ष आणि अपक्षांना केवळ 5 जागा मिळण्याची शक्यता आहे.

मात्र, निवडणूक मतदानपूर्व सर्व्हेतून हा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी राज्यात कोणाला किती जागा मिळणार आणि महायुती बहुमताचा आकडा गाठणार की महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) याचं अंतिम चित्र 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे. सर्व्हेनुसार राज्यातील विभागनिहाय आकडेवारी देखील देण्यात आली आहे.

मराठवाड्यात महायुतीला फटका

त्यानुसार विदर्भातील एकूण 62 मतदारसंघापैकी 32 ते 37 जागांवर महायुतीला यश मिळू शकतं, तर आघाडीला 21 ते 26 जागा मिळू शकतात. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 70 मतदारसंघापैकी आघाडीला 29 ते 32 जागा, तर 31 ते 38 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील 46 पैकी 18 ते 24 जागांवर महायुती तर 20 ते 24 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात.

ठाणे, कोकण मुंबईक कोणाचं वर्चस्व?

ठाणे, कोकण विभागातील 39 पैकी 23 ते 25 जागा महायुतीला तर, 10 ते 11 जागांवर आघाडीला मिळू शकतात. मुंबईतील 36 जागांपैकी 21 ते 26 जागा महायुतीला तर 16 ते 19 जागा आघाडीला मिळण्याचा अंदाज या सर्व्हेतून वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील 14 ते 16 जागांवर युतीला आणि 16 ते 19 जागा आघाडीच्या वाट्याला जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सध्याच्या या सर्व्हेनुसार राज्यात युतीचं पारडं जड दिसत असलं तरी जनता कोणाला कौल देणार याबाबतचं स्पष्ट चित्र निवडणुकीच्या निकालानंतरच समोर येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT