BJP Politics Sarkarnama
महाराष्ट्र

BJP Politics : भाजपच्या पहिल्या यादीत कोणाची नावं, पराभूत खासदारांना संधी मिळणार?

Maharashtra Assembly Election BJP Politics : मंगळवारी दुपारी महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महायुती आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.

Roshan More

BJP Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये भाजपच्य वरिष्ठ नेत्यांची आणि महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत. आचारसंहित पुढील दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

भाजप आपल्या पहिल्या उमेदवारांच्या यादीमध्ये वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांचा समावेश असेल तसेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या खासदारांना विधानसभेला संधी मिळणार नाही, असे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्य हवाल्याने दिले आहे.

काही आमदारांचे तिकीटसुद्धा कापले जाणार आहे. उद्या (मंगळवारी) दुपारी महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महायुती आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जाणार

आज (सोमवार) दिवसभर दिल्लीतील भाजप मुख्यालयात भाजप नेत्यांच्या बैठका सुरू आहेत.तसेच आज रात्रीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजधानी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती आहे. यासाठी ते रात्री उशिरा दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सध्या दिल्लीत असल्याने तेही या बैठकीला उपस्थित राहण्याचे चिन्हे आहेत.

भाजपला 150 जागा?

भाजपने 160 जागांवर निरीक्षक नेमूण त्या जागांचा आढावा घेतला होता. भाजपच्या पदाधिकारी तसेच नेते यांनी देखील भाजपने 160 जागा लढवण्याचा आग्रह धरला होता. महायुतीमध्ये भाजप 150 पेक्षा अधिक जागा लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT