Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; ड्रग्ज तस्करीप्रकरणी आता मकोका कारवाई करण्यात येणार

Sarkarnama Headlines : महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय घडामोडींची अपडेटस्....

Deepak Kulkarni

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; ड्रग्ज तस्करीप्रकरणी आता मकोका कारवाई करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात होत असलेल्या ड्रग्ज तस्करीची गंभीर दखल घेतली आहे. फडणवीस यांनी यावेळी राज्यात ड्रग्सची तस्करी खपवून घेतली जाणार नसल्याचं ठणकावतानाच या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

मराठीच्या मुद्द्यानंतर आता कर्नाक पुलासाठी शिवसेना अन् मनसेचं एकत्रित आंदोलन

उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून मराठीच्या मुद्द्यानंतर कर्नाक पूल अद्याप सुरू झालेला नसल्याने एकत्रित आंदोलन करण्यात आलं आहे. मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक उड्डाणपूलाच्या अपूर्ण कामावरुन महापालिकेविरोधात आंदोलन छेडलं आहे.

'वाल्मिक कराडच्या टेबलावर त्यांचं कातडं, हाड आणि रक्त...'; विजयसिंह बांगर यांचा धक्कादायक खुलासा 

वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे केले आहेत. महादेव मुंडे यांना मारल्यानंतर वाल्मिक कराडच्या टेबलावर त्यांचं कातडं, हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं. यानंतर कराडने मारणाऱ्यांना शाबासकी देत गाड्याही गिफ्ट दिल्याचा गौप्यस्फोटही बांगर यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! भाजप आमदार प्रसाद लाड यांचं बनावट लेटरहेड अन् सही वापरून 3 कोटी 20 लाखांचा निधी वर्ग

महाराष्ट्र अधिवेशन काळात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांचं बनावट लेटरहेड आणि सही वापरून 3 कोटी 20 लाखांचा निधी वर्ग केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत आमदार लाड यांनीच विधान परिषद सभागृहात माहिती दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT