Abu Azmi Sarkarnama
महाराष्ट्र

Mahavikas Aaghadi : शरद पवारांच्या भेटीनंतर अबू आझमींचा आघाडीला अल्टिमेटम; उरले काही तास...

Maharashtra Assembly Election Abu Azmi Samajwadi Party : अबू आझमी यांनी शुक्रवारी दुपारी शरद पवार यांची भेट घेतली.

Rajanand More

Mumbai News : महाविकास आघाडीचे जागावाटपाचे घोडे अजूनही अडले असून आता समाजवादी पक्षानेही निर्वाणीचा इशारा दिला आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी शुक्रवारी आघाडीला एक दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. आम्हाला पाच जागा द्या, आम्ही 25 मतदारसंघात उमेदवार उभे करू, असे आझमी यांनी म्हटले आहे.

आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यूला अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे छोट्या मित्रपक्षांची धाकधूक वाढली आहे. त्यापैकी समाजवादी पक्ष महत्वाचा मानला जात आहे. या पक्षाने आघाडीकडे पाच जागांची मागणी केली आहे. त्यासाठी अबू आझमी यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

पवारांच्या भेटीनंतर आझमी यांनी मीडियाशी बोलताना आघाडीला अल्टिमेटम दिला. आम्ही आघाडीकडे पाच जागा मागितल्या आहेत. त्याचे उत्तर देण्यासाठी शनिवारपर्यंत वेळ दिला आहे. पाच जागांमध्ये भिंवडी पूर्व मानखूर्द, भिवंडी पश्चिम, मालेगांव आणि धुळे शहर हे मतदारसंघ आहेत. या जागांवर आम्ही जिंकून येऊ शकतो.

शनिवारी दुपारपर्यंत आम्ही वाट पाहू. त्यानंतर मात्र आम्ही निर्णय घेऊ. मी 25 उमेदवारांची घोषणा करेन. महाराष्ट्रात मला निर्णय घेण्याचे अधिकार अखिलेश यादव यांनी दिले आहे. तुम्ही अल्पसंख्यांकांना प्रतिनिधित्व दिले नाही तर तुमच्याजवळ आणखी एक हरियाणा असेल, असा इशारा आझमींना दिला.

दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या तीन प्रमुख पक्षांना प्रत्येकी 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. उरलेल्या 18 जागा मित्रपक्षांना दिल्या जाऊ शकतात. पण जागांचा फॉर्म्यूला निश्चित होण्याआधीच तिन्ही पक्षांकडून काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले असून त्यावरून वाद सुरू झाले आहेत. त्यामुळे मित्रपक्षांना नेमके किती आणि कोणते मतदारसंघ मिळणार, याबाबत अजूनही संभ्रम आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT