Bharat Gogawale Reaction on Rane Brothers Demand Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Updates: नारायण राणेंविषयी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद; शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी गोगावलेंना दिली तंबी

Sarkarnama Headlines : महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय घडामोडी....

Deepak Kulkarni

नारायण राणेंविषयी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद; शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी गोगावलेंना दिली तंबी 

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी काही दिवसांपूर्वी भाजप खासदार नारायण राणे यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी बोलताना सावधगिरी बाळगायला हवी, अशी तंबी गोगावले यांना देण्यात आल्याची माहिती आहे.

जालन्यात गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात ख्रिश्चन समाजाच्या वतीनं मोर्चा

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात जालन्यात ख्रिश्चन समाजाच्या वतीनं मोठा मोर्चा काढण्यात आला. पडळकरांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात हा मोर्चा निघाला. मोर्चेकरी पडळकरांची आमदारकी रद्द करण्याची आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत.

अहमदाबाद दुर्घटनेनंतर काही दिवसांपूर्वी दिल्लीहून आलेल्या विमानाला पक्षी धडकल्यामुळे विमानाचं उड्डाण रद्द करण्याची वेळ आली होती. आता यानंतर पुण्यातून एक धक्कादायक बाब समोर आली होती. धावपटट्टीवरील एका कुत्र्यामुळे भुवनेश्वरहून पुण्याला आलेल्या विमानाला लँडिंग करता आलं नाही. सुमारे तासभर हे विमान हवेतच असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT