Congress Politics : लोकसभा निवडणुकीत कांद्याला दर मिळत नसल्याने आणि आयातीवर बंदी असल्याचा फटका महायुतीला बसला. 12 ते 13 जागांवर याचे थेट परिणाम झाल्याचे बोलले जाते. लोकसभेनंतर केंद्र सरकारने आयातीवरील बंदी उठवली. मात्र, विधानसभेच्या तोंडावर सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.
कांद्याचा आणि सोयाबीनच्या भावाचा प्रश्न लक्ष्यात घेत राहुल गांधी यांनी या दोन्ही पिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. महाविकास आघाडी सोयाबीनला सात हजार रुपये क्विंटल एमएसपी तसेच बोनस देणार असल्याचे राहुल गांधी यांनी जाहीर केले.
कांद्याचे भाव कमी जास्त होत असल्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे कांद्याची किंमती ठरवण्यासाठी समिती गठीत तसेच कापसाला देखील योग्य एमएसपी ठरवणार असल्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी आपल्या ट्विट करत दिले आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलेल्या आश्वासनामुळे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग या ठिकाणी महाविकास आघाडीला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राहुल गांधींनी निवडणुकीच्या आधी केलेल्या या घोषणा गेम चेंजर ठरण्याची देखील चर्चा आहे.
राहुल गांधींनी आपल्या ट्विटमद्ये म्हटले आहे की, मागील तीन निवडणुकांमध्ये भाजप सोयाबीनला सहा हजार रुपये एमएसपी देणार असल्याचे वचन देते. मात्र, आजही शेतकऱ्यांना कष्टाने पिकवलेले सोयाबीन तीन ते चार हजार रुपयांना विकावे लागत आहे.
महाविकास आघाडी शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचे मेहनतीचे फळ आणि न्याय मिळवून देईल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.