Prakash Ambedkar VBA Sarkarnama
महाराष्ट्र

VBA News : 'वंचित'चे 200 पैकी 194 जागांवर डिपाॅझिट जप्त, 'मविआ'ला 20 जागांवर फटका

Maharashtra Assembly Election results VBA : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला साडेसहा टक्के मतं होती. मात्र, 2024 विधानसभा निवडणुकीत या मतांची टक्केवारी 3.6 वर आली.

Roshan More

VBA News : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला यश मिळाले नव्हते. त्यामुळे विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वाची होती. कोणत्याही पक्षासोबत युती, आघाडी न करता वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढली. 200 जागा लढणाऱ्या वंचितच्या 194 जागांवर डिपाॅझिट जप्त झाल्याची माहिती समोर येत आहे.

लोकसभेला मिळालेली तीन टक्के मते विधानसभेला टिकवण्यात वंचितला विधानसभेत यश आले आहे. वंचितच्या उमेदवारामुळे कमी फरकाने महाविकास आघाडीचे 20 उमेदवार पराभूत झाले आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला साडेसहा टक्के मतं होती. मात्र, 2024 विधानसभा निवडणुकीत या मतांची टक्केवारी 3.6 वर आली. त्यामुळे ही मतांची घटलेली टक्केवारी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वंचित टिकवणार का? याची चर्चा सुरू होती.

58 मतदारसंघात तिसऱ्या स्थानी

वंचितचे तब्बल 194 जागांवर डिपाॅझिट जप्त झाले आहे. मात्र, वंचितचा एक उमेदवार दुसऱ्या स्थानावर तर, तब्बल 58 उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत. वंचितला एकुण 14 लाख 22 हजार मते मिळाली आहेत.

2019 च्या तुलनेत पिछेहाट

वंचित बहुजन आघाडीला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत साडेसहा टक्के मते मिळाली होती. तर विधानसभेला साडेचार टक्के मते मिळाली होती. त्या तुलनेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वंचितच्या मतांमध्ये घट झाल्याची दिसून येत आहे. वंचितला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 3.1 टक्के मते आहेत.

मविआ, एमआयएमला फटका

वंचितमुळे मविआच्या 20 उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला तर, एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा देखील कमी फरकाने पराभव झाला. मविआमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आठ, काँग्रेसचे सहा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा उमेदवार पराभूत झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT