Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.jpg sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Shirsat : विधानसभेचा महायुतीचा फाॅर्म्युला ठरला? शिंदे गटाच्या नेत्याने सांगून टाकलं

Mahayuti Maharashtra Assembly Election : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटल्या आहेत. तर, शिंदे गटाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर शिंदे गटाकडून दावा केला जावू शकतो.

Roshan More

Sanjay Shirsat News : विधानसभा निवडणुकीत भाजप 170 जागांवर लढण्यासाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. तर, अजित पवार गटाकडून देखील 80 पेक्षा अधिक जागांची मागणी केली जात असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरला असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी असा कोणताही फाॅर्म्युला ठरला नसल्याचे स्पष्ट केले.

शिरसाट Sanjay Shirsat म्हणाले, प्रत्येकाने या निवडणुकीत ताकद दाखवली आहे. आम्ही ताकद दाखवली आहे. जेव्हा महायुतीचे तीन मोठे नेते एकत्र बसतील तेव्हा फाॅर्म्युल्यावर चर्चा होईल.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटल्या आहेत. तर, शिंदे गटाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर शिंदे गटाकडून दावा केला जावू शकतो. विशेषता मुंबईतील जागांवर शिंदे गट लढण्यास आग्रही असेल अशा चर्चा आहेत.

महाविकास आघाडीत काय होणार?

महाविकास आघाडीत MVA कोणी मोठा भाऊ नाही, असे नाना पटोले म्हणाले आहेत. शिवाय काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले. त्यात शरद पवार यांनी देखील विधानसभा निवडणुकीसाठी जास्त जागांसाठी आग्रह असेल असे स्पष्ट केले. त्यामुळे ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस यामध्ये जागा वाटपाचा काय फाॅर्म्युला काय असणार याची देखील चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT