राज ठाकरेंनी निवडणूक प्रचाराची पहिली सभा डोंबवलीमध्ये घेतली. या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले आणि बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोमध्ये त्यांच्या नावा पुढे असलेला हिंदुहृदयसम्राट उल्लेख गायब झाला. उर्दुमध्ये बाळासाहेबांच्या नावापुढे 'जनाब' असा उल्लेख केला जातोय, असे राज ठाकरे म्हणाले.
पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. महायुती महाविकास आघाडी समोरासमोर लढत होणार असून काही ठिकाणी बंडखोर रिंगणात...
कसबा
आमदार रवींद्र धंगेकर,काँगेस
हेमंत रासने,भाजप
गणेश भोकरे,मनसे
कमल व्यवहारे,काँग्रेस बंडखोर
छत्रपती शिवाजीनगर
आमदार सिद्धार्थ शिरोळे,भाजप
दत्ता बहिरट, काँग्रेस
काँग्रेस बंडखोर मनीषा आनंद अपक्ष निवडणूक लढवणार
कोथरूड
आमदार चंद्रकांतदादा पाटील,भाजप
चंद्रकांत मोकाटे,उबाठा शिवसेना
किशोर शिंदे,मनसे
खडकवासला
आमदार भीमराव तापकीर, भाजप
सचिन दोडके,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
मयुरेश वांजळे,मनसे
हडपसर
आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
साईनाथ बाबर, मनसे
वडगावशेरी
आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
पर्वती
माधुरी मिसाळ,भाजप
अश्विनी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
आबा बागुल, काँग्रेस बंडखोर अपक्ष निवडणूक लढवणार
सचिन तावरे,बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
कॅन्टोन्मेंट
आमदार सुनील कांबळे,भाजप
रमेश बागवे,काँग्रेस
इंदापूर
हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
दत्ता भरणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
प्रवीण माने अपक्ष बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
बारामती
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
युगेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
अभिजीत बिचुकले,अपक्ष
पुरंदर
संजय जगताप, काँग्रेस
विजय शिवतारे, शिवसेना
संभाजीराव झेंडे,राष्ट्रवादी काँग्रेस
भोर वेल्हा मुळशी
संग्राम थोपटे,काँग्रेस
शंकर मांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
किरण दगडे पाटील, बंडखोर भाजप
कुलदीप कोंडे शिवसेना बंडखोर
मावळ
सुनील शेळके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
बापूसाहेब भेगडे,अपक्ष
खेड आळंदी
दिलीप मोहिते पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
बाबाजी काळे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
आंबेगाव
दिलीप वसे पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
देवदत्त निकम,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
जुन्नर
अतुल बेनके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
सत्यशील शेरकर,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
आशा बुचके,अपक्ष,भाजप बंडखोर
शरद सोनवणे,अपक्ष,शिवसेना
शिरूर हवेली
अशोक पवार,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
माऊली कटके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
दौंड
राहुल कुल,भाजप
रमेशआप्पा थोरात,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
पिंपरी
अण्णा बनसोडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
सुलक्षणा शीलवंत,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
चिंचवड
शंकर जगताप,भाजप
राहुल कलाटे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
भोसरी
महेश लांडगे,भाजप
अजित गव्हाणे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
मधुरीमाराजे यांच्या उमेदवारी मागे घेतल्यामुळे सतेज पाटील हे खासदार शाहू महाराज यांच्यावर संतापले होते. यानंतर धनजंय महाडीक यांनी सतेज पाटलांवर टीका केली आहे. ज्या गादीचा मान राखण्याची भाषा लोकसभा निवडणुकीत केली त्याच गादीचा मान न राखणाऱ्या घमेंडखोर आमदार सतेज पाटलांच्यामुळे काँग्रेसचा सुपडा साफ होईल. जिल्ह्यातील काँग्रेसच्या पाचही उमेदवारांचा पराभव होईल, असेखासदार धनंजय महाडिक म्हणाले.
मोहोळ मतदारसंघातून रमेश कदम आणि त्यांची मुलगी सिद्धी कदम यांनी आपला उमदेवारी अर्ज मागे घेतला. सिद्धी कदम यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांची उमेदवारी बदलण्यात आली. सिद्धी कदम यांच्या ऐवजी मोहोळमधून राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मधुरीमाराजेंची माघार घेण्याचा निर्णय सतेज पाटील यांना पटला नसल्याने ते संतप्त झाले होते. सतेज पाटील-शाहू महाराज यांच्यात टोकाचे वाद झाले. मात्र, या सगळ्या घटनाक्रमानंतर अपक्ष उमेदवार राजेश लाटकर समोर आले आहेत. त्यांनी मी सतेज पाटील यांना मानणारा कार्यकर्ता आहे. मात्र, पक्षाने मला का डावलले याचे आत्मचिंतन करावे, असे लाटकर म्हणाले.
कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी मागे घेण्यावरून काँग्रेस नेते सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज यांच्यात टोकाचे वाद झाल्याचे पाहण्यास मिळाले, दम नव्हता तर उभं राहायचे नव्हत ना. मी पण दाखवली असती माझी ताकद, असे शाहू महाराजांना सतेज पाटील यांनी संतापून सुनावले. कोल्हापूर उत्तरमधून मधुरीमाराजेंची माघार घेण्याचा निर्णय सतेज पाटील यांना पटला नसल्याने ते संतप्त झाले होते.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे बंडखोर उमेदवार उदय बने यांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. भाजपमधून आलेल्या बाळ माने यांना उमेदवारी मिळाल्याने बने नाराज होते. निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छूक नव्हतो, पण तालुक्याच्या अख्ख्या कार्यकारीणीने एकमुखी माझी शिफारस केली होती, म्हणून मी तयार झालो. मातोश्रीवर मंगळवारी मला बोलावण्यात आलं होतं, माझी चर्चा झाली. पण बुधवारी बाळ माने यांचा प्रवेश झाला, त्यांना एबी फॉर्म मिळाला. मी निषेध म्हणून फॉर्म भरला होता. मी आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे, आदेश आला तरीही पक्षाचं काम करणार नाही, असा शब्दात बने यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना खडेबोल सुनावले आहे. मातोश्रीच्या नजरेत जर मी सक्षम उमेदवार नसेन, कोणत्याही जबाबदारीसाठी सक्षम नसेन, तर मी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. मी आदेशाचा पाईक आहे, शेवटी घाण कशाला करावी, म्हणून मी माघार घेतली. गाडाभर मेहनत असली तरी चमचाभर मेहनतही लागते. मी आता थांबलो, पक्षाचं काम करणार नाही, असे बने म्हणाले.
पाटण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर हे अपक्ष रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे शंभूराज देसाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हर्षद कदम आणि अपक्ष म्हणून सत्यजित पाटणकर अशी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मधुरिमाराजे- काँग्रेस, कोल्हापूर उत्तर विधानसभा
गोपाळ शेट्टी- भाजप, बोरीवली
स्विकृती शर्मा- शिवसेना शिंदे गट, अंधेरी पूर्व
सुरज सोळुंके- शिवसेना शिंदे गट, उस्मानाबाद
मकरंदराजे निंबाळकर- शिवसेना ठाकरे गट, उस्मानाबाद
विजयराज शिंदे- भाजप, बुलढाणा
किशोर समुद्रे- भाजप, मध्य नागपूर
जयदत्त क्षीरसागर- अपक्ष बीड
जगदीश धोडी- शिवसेना शिंदे गट, बोईसर
अशोक भोईर- बहुजन विकास आघाडी, पालघर
अमित घोडा- भाजप, पालघर
तानाजी वनवे- काँग्रेस, नागपूर पूर्व
तनुजा घोलप- अपक्ष, देवळाली
मदन भरगड- काँग्रेस, अकोला
प्रशांत लोखंडे- शिवसेना शिंदे गट, श्रीरामपूर
सुहास नाईक-काँग्रेस, शहादा तळोदा
विश्वनाथ वळवी- काँग्रेस, नंदुरबार
सुजित झावरे पाटील- अजित पवार गट, पारनेर
जिशान हुसेन- वंचित बहुजन आघाडी, अकोला
नाना काटे- अजित पवार, चिंचवड
बाबुराव माने- शिवसेना ठाकरे गट, धारावी
मधू चव्हाण- काँग्रेस, भायखळा
विश्वजीत गायकवाड, भाजप, लातूर
संदीप बाजोरिया- शरद पवार गट, यवतमाळ
हेमलता पाटील- काँग्रेस, नाशिक मध्य
उदय बने- शिवसेना ठाकरे गट, रत्नागिरी
अंकुश पवार- मनसे, नाशिक मध्य
राजेभाऊ फड-अजित पवार गट, परळी
कुणाल दराडे- शिवसेना ठाकरे गट, येवला
जयदत्त होळकर- शरद पवार गट, येवला
किरण ठाकरे- भाजप, कर्जत खालापूर
रुपेश म्हात्रे- शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष-भिवंडी पूर्व
संगीता वाझे-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष-मुलुंड
मिलिंद कांबळे-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष-कुर्ला
अविनाश लाड-काँग्रेस-रत्नागिरी
प्रतिभा पाचपुते- भाजप, श्रीगोंदा
दिलीप माने- काँग्रेस, सोलापूर
अविनाश राणे- शिवसेना शिंदे गट- अणुशक्तीनगर
संगिता ठोंबरे- भाजप, केज
राजू परावे- शिवसेना शिंदे गट- उमरेड
अब्दूल शेख- अजित पवार गट- नेवासा
धनराज महाले- शिवसेना शिंदे गट, दिंडोरी
शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे- भाजप, सांगली
रणजीत पाटील- शिवसेना ठाकरे गट- परंडा
नरेश अरसडे- अजित पवार गट- काटोल
सुबोध मोहीते- अजित पवार गट- काटोल
राजश्री जिचकार- काँग्रेस- काटोल
वृषभ वानखेडे- आम आदमी पार्टी- काटोल
संदीप सरोदे- भाजप- कोटोल
पर्वती: आबा बागुल, काँग्रेस;
कसबा: कमल व्यवहारे, काँग्रेस
शिवाजीनगर: मनीष आनंद, काँग्रेस
इंदापूर: प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी
पुरंदर: संभाजी झेंडे, दिगंबर दुर्गडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
मावळ: बापू भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
जुन्नर: आशा बुचके, भाजप; शरद सोनवणे, शिवसेना शिंदे गट
खेड आळंदी: अतुल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस (एस पी)
भोर: किरण दगडे पाटील, भाजप; कुलदीप कोंडे शिवसेना शिंदे गट
माहीम विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे आता त्यांचा सामना राज ठाकरेचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासोबत होणार आहे. माघार घेण्यापूर्वी सदा सरवरणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. पण त्यांनी सरवणकर यांच्या अर्ज माघारीबाबत चर्चा करण्यास नकार दिला.
कोल्हापुरात निवडणुकीच्या रिंगणात मधुरिमाराजे यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने, काँग्रेस नेते सतेज पाटील हे चांगलेच नाराज झाले आणि यानंतर त्यांनी शाहू महाराजांना याबाबत बोलूनही दाखवले.
बीड विधानसभा मतदारसंघामधून अखेर शेवटच्या क्षणी जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघातून सदा सरवणकर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी माघार घेतलेली नाही. तत्पुर्वी ते राज ठाकरेंना भेटीसाठी गेले असता, राज ठाकरेंनी त्यांना भेट नाकारली होती.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतली आहे. यावेळी आमदार सतेज पाटील संतापून निघून गेल्याची माहिती आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिटी हे चिन्ह जनता दल ( युनायटेड ) या पक्षासाठी राखीव ठेवल्याचे स्पष्ट केल्यानंतर बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायलायत धाव घेतली होती. न्यायाधीशांसमोर जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (४ नोव्हेंबर) उच्च न्यायालयाने बहुजन विकास आघाडीच्या बाजूने निकाल दिला आहे. न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि न्यामूर्ती न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने हा निकाल देत बहुजन विकास आघाडीला 'शिटी' चिन्ह वापरता येईल, असे आपल्या निकालपत्रात म्हटले आह. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विधानसभेची निवडणूक शिट्टी चिन्हांवर लढवता येणार आहे.
जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच जळगावच्या रिधूर येथे त्यांची प्रचार रॅली आली असता कार्यकर्त्यांनी चक्क घोड्यावरून वाजतगाजत पाटील याची मिरवणूक काढण्यात आली.
संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघातून भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी सकारात्मक भेट झाल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आर्वीत भाजपला मोठी शक्ती मिळाली असून आपण आता सुमित वानखडे यांना पाठिंबा देणार असल्याचं केचे यांनी जाहीर केलं आहे.
वांद्रे पूर्व मतदारसंघातील बंडखोरी रोखण्यास महायुतीला अपयश आलं आहे. कारण शिंदेंच्या शिवसेनेचे कुणाल सरमळकर या मतदारसंघातून दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेणार नसून ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
मोहोळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका घेतलेले माजी आमदार रमेश कदम आणि सिद्धी कदम यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, नंतर ती मागे घेत राजू खरेंना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे रमेश कदम आणि सिद्धी यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र पवारांनी अवघ्या 26 व्या वर्षी सिद्धीला संधी दिलेली होती, त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी नको अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याने आपण अर्ज मागे घेत असल्याचं रमेश कदम यांनी सांगितलं.
काँग्रेस आणि अन्य पक्षांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर आयोगाना आता शुक्ला यांची बदली केली आहे. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिले. शुक्ला यांची तत्काळ प्रभावाने बदली करण्यात यावी, असा आदेश आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिला आहे.
माहिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर हे आपला उमेदवार अर्ज मागे न घेण्यावर ठाम आहेत. त्यांनी या मतदारसंघातून माघार घ्यावी अशी मागणी भाजपकडून केली जात होती. यासाठी त्यांना समजवण्याचा प्रयत्न खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता. मात्र तरीही ते निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज त्यांनी माघार न घेतल्यास या मतदारसंघात ते अमित ठाकरेंविरोधात लढणार हे स्पष्ट होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधाला. मुश्रीफ यांच्यावर अदृश्य शक्तीने काय जादू केली काही माहीत नाही. तसंच त्यांनी कोणती गुरूदक्षिणा दिली? ते सांगावं असा सवाल सुळे यांनी यावेळी उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेताच ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी नेहमी सांगत होतो की ते निवडणूक लढणार नाहीत किंवा सामोरे पण जाणार नाहीत. बारामतीच्या स्क्रिप्टनुसार ते वागतात.
मनोज जरांगे पाटील आज पत्रकार परिषदेतून मोठी घोषणा केली आहे. आपण विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे आता ते विधानसभेला देखील लोकसभा पॅटर्नच राबवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय एका जातीच्या आधारावर निवडणूक लढवणं शक्य नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत घेणार असून ते उर्वरित मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरातील फेलिसिटी सोसायटी समोर हिट अॅण्ड रनची घटना घडली होती. या घटनेला 72 तास उलटून गेले तरीही अद्याप आरोपी कारचालकाला पोलिसांनी अटक केलेली नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर पोलिसांवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. कारण माजी महापौर व काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार कमल व्यवहारे कालपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या वरिष्ठांकडून संपर्क करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही.
मनोज जरांगे पाटील यांनी आपण निवडणूक लढणार असल्याचं कालच्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं. तर आज या मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत. शिवाय ज्यांचं नाव नसेल त्यांनी उमेदावारी अर्ज मागे घ्यायचा असं देखील त्यांनी कालच स्पष्ट केलं आहे.
आज 4 नोव्हेंबर हा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज मागे घेण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना पक्षांतर्गत बंड मागे घेण्यास कितपत यश आलं हे स्पष्ट होणार आहे. शिवाय कोणते बंडखोर अर्ज मागे घेणार आणि कोण आपला अर्ज कायम ठेवणार यावर फायनल लढती ढरणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.