Raj Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Elections 2024 LIVE updates : महापालिका निवडणुकीवरून राज ठाकरेंनी टोचले सरकारचे कान

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 LIVE updates : विधानसभा निवडणूक अवघ्या 11 दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून मतदारांना भरमसाठ आश्वासन दिली जात आहेत. शिवाय दिल्लीतील नेते देखील महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. याच नेत्यांच्या आज कुठे कुठे सभा आहेत आणि ते काय बोलणार याबाबतच्या सर्व अपडेट जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

Raj Thackeray : नगरसेवक असतो हे नागरिक विसरले

राज्यात गेल्या काही वर्षांपासून महापालिकांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यावरून शनिवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारचे कान टोचले आहेत. चार-पाच वर्ष झाली महापालिका निवडणुका झाल्याच नाहीत. नगरसेवक असतो हे आता नागरिक विसरुन गेली आहेत, असे म्हणत राज ठाकरेंनी पुण्यातील कसबा मतदारसंघातील सभेप्रसंगी राज्य सरकारच्या कारभारावर घाणाघात केला.

Eknath Shinde : महायुतीचे सरकार आल्यानंतर कर्जमाफी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील महायुतीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याचे हिमायतनगर येथील प्रचार सभेत जाहीर केले.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील भूमिका जाहीर करणार

मनोज जरांगे पाटील हे उद्या (रविवारी) पत्रकार परिषद घेणार आहे. सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेत कोणाला पाडायचे, कुणाला निवडून आणायचे याची भूमिका मनोज जरांगे पाटील जाहीर करणार आहेत.

महायुतीचा 'स्वाभिमानी'ला 'जोर का झटका', डझनहून अधिक बड्या नेत्यांनी सोडली साथ

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी गळती लागली आहे. संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार राजू शेट्टींची साथ सोडली आहे. तिसरी आघाडी स्थापन केल्याने पहिल्या फळीतील डझनभर नेते नाराज होते.दोन दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील हे शिवसेनेत दाखल झाले होते. तिसऱ्या आघाडीचा पर्याय आम्हाला अमान्य असल्याचं परिपत्रक काढत या नाराज नेत्यांनी काढलं आहे.

सावकार मदनाईक,मिलिंद साखरपे,जनार्दन पाटील, पायगोंडा पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांबाबत सहकारात्मक निर्णय घेत असल्याने महायुतीला आम्ही पाठिंबा देत असल्याचे परिपत्रक जारी केले आहे. मात्र, चळवळीचे काम पूर्ववत राहील,असा खुलासाही पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Mallikarjun kharge : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला का नेले?

खोटेनाटे ऐकण्याची सहनशीलता आता लोकांची संपली आहे. काँग्रेसला 70 वर्षांत काय केले हे मोदी वारंवार विचारतात. आता 11 वर्षांपासून मोदी पंतप्रधान आहेत. त्यांनी काय काय केले हे जनसेला सांगावे. पंतप्रधान होण्यापूर्वी ते 15 वर्षे ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरातचा सर्वाधिक विकास केल्याचा दावा ते करतात. हे खरे असेल तर महाराष्ट्रात येणारे मोठे प्रकल्प त्यांना आपल्या राज्यात का पळवून न्यावे लागत याचे उत्तर द्यावे, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले

Nana Patole : शाहा-मोदींनी महाराष्ट्राला लुटले - नाना पटोले

महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. महाराष्ट्राला नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी एटीएम बनवले आहे. महाराष्ट्राला हे लुटत आहेत, असा आरोप नाना पटोलेंनी केला.

Vinayak Raut Live News : राणे तुमची औकात काय? ठाकरेंना धमकी देणं सोडून द्या - विनायक राऊत

लोकसभा निवडणुकीत भाजपचा जसा सुपडा साफ झाला तसाच विधानसभेला होणार. शिवाय या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 180 जागांवर उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते सिंधुदुर्गात बोलत होते. तर इटूकली, बिटूकली राणेंची काय औकात आहे. राणे उध्दव ठाकरेंना अडवण्याची हेमंत मोदींमध्ये देखील नाही. उद्धव ठाकरेंना धमकी देणं सोडून द्या, असा घणाघात त्यांनी नारायण राणेंवर केला आहे.

Uddhav Thackeray Live News : ही लढाई ठाकरे, पवार, गांधी यांच्या एकट्याची नाही- उद्धव ठाकरे

ही लढाई फक्त उद्धव ठाकरेंची शिवसेनेचे नाही, राहुल गांधी, शरद पवारांची नाही. ही लढाई तुमची (जनतेची) आहे. सरकार आणयाचं आहे. सरकार फक्त तुमच्यासाठी आणायचं आहे. कारण आपण महाराष्ट्राव प्रेम करतो ते महाराष्ट्राचे लुटारू आहेत, असा म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

Mahavikas Aghadi Live News : 'मविआ'चा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थित उद्या महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. हॉटेल ग्रँड हयात इथे हा जाहीरनामा प्रकाशित केला जाणार आहे. जाहीरनामा प्रकाशित झाल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद होणार आहे.

Uddhav Thackeray Live News : महिला पोलिसांची भरती करणार - उद्धव ठाकरे

महायुती आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी सभांचा धडाका लावला आहे. लोह कंधारमधील सभेतून त्यांनी राज्यातील महिलांना मोठं आश्वासन दिलं. मविआचं सरकार आल्यावर महिलांना महिन्याला तीन हजार रुपये देणार, महिला पोलिसांची भरती करणार असं आश्वासन त्यांनी दिलं. तसंच त्यावेळी माझं सरकार पाडलं नसतं तर शेतकऱ्यांची दुसऱ्यांदा कर्जमाफी केली असती असंही म्हणाले.

Sangli Politics Live News : भाजप नेते सुधाकर खाडे यांची हत्या

सांगलीत भाजप नेते सुधाकर खाडे यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करण्यात आले आहेत. सुधाकर खाडे हे सांगलीमधील भाजपचे नेते आहेत. याआधी त्यांनी सांगलीचे मनसे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. सुधाकर खाडे हे मनसेच्या स्थापनेपासून जिल्हाध्यक्ष होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

PM Narendra Modi Live : पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्यातील सभेतून महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीव म्हणजे भ्रष्टाचार, महाविकास आघाडी म्हणजे हजारो करोडोंचे घोटाळा आणि महाविकास आघाडी म्हणजे ट्रान्सफर पोस्टींगचा धंदा असल्याची टीका पंतप्रधानांनी केली आहे. तसंच यावेळी त्यांनी देशातील सर्व गरिबांना मोफत घर देण्यासाठी भाजप कटीबद्ध असून एखादा गरीब झोपडीत राहत असेल तर मला सांगा मी त्याला घर बांधून देणार, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

Pandharpur Politics Live News : भगीरथ भालकेंना आणखी एक मोठा धक्का!

पंढरपूरमधील काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भालके यांची साथ सोडली आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे भगीरथ भालके यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Prashant Bamb Live News : भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या सभेत तरुणाला मारहाण

गंगापूर मदतारसंघातील भाजपचे उमेदवार प्रशांत बंब हे प्रचारासाठी ते एका गावात आले होते. यावेळी त्यांना एका तरुणाने तुम्ही पंधरा वर्षात काय केलं? साधा रस्ता तरी केला का? असं विचारलं असता या कार्यकर्त्याला बंब यांच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला मारहाण करून सभा स्थळाहून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Vishwajit Kadam ON Vishal Patil : जयश्री पाटलांना फितवून कोणी बंडखोरी करायला लावली...

लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांना आपण निवडून आणले, हे छाती ठोकपणे सांगतो, अशा शब्दात काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी सांगितले . विश्वजीत कदम यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांचे काम केल्याची जाहीर कबुली दिली आहे. सांगली विधानसभा निवडणुकीमध्ये जयश्री पाटलांना कोणी फितवून बंडखोरी करायला लावली, हे सत्य ज्या दिवशी उघडे होईल, तेव्हा त्याची खैर नाही,असा इशारा देखील विश्वजीत कदम यांनी दिली आहे. ते सांगलीमध्ये काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

Lawrence Bishnoi Gang

Lawrence Bishnoi Gang Live News : लॉरेन्स बिश्नोई गँगची आर्थर रोड कारागृह प्रशासनाला धास्ती

लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांची आर्थर रोड कारागृहात बदली करा अन्यथा या कैद्यांमध्ये टोळीयुद्ध होऊ शकते अशी भीती तुरुंग प्रशासनाने व्यक्त केली आहे. शिवाय टोळीतील सदस्यांची अन्य कारागृहात बदली करावी यासाठी तुरुंग प्रशासनाने न्यायालयात अर्ज देखील केला आहे. त्यामुळे आता बिश्नोई गँगची धास्ती तुरुंग प्रशासनाला देखील असल्याचं पाहायला मिळत आहे.

PM Narendra Modi

PM Narendra Modi Live : महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मैदानात

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. सध्या ते महाराष्ट्र दौऱ्यावर असून काल धुळे आणि नाशिकमध्ये त्यांच्या सभा झाल्या. तर आज त्यांची नांदेडमध्ये सभा होणार आहे. दुपारी दोन वाजता ही सभा होणार आहे.

Railway accident in West Bengal : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघात, 4 डब्बे घसरले

मागील काही दिवसांपासून देशात विविध ठिकाणी रेल्वे अपघाताच्या घटना घडत आहेत. अशातच आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा रेल्वे अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिकंदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरून घसरल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. तर या अपघातामध्ये अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत.

Prakash Ambedkar Live News : प्रकाश आंबेडकरांची आज सोलापुरात सभा

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतींचा सल्ला दिला होता. त्यानंतर आज पहिल्यांदाच त्यांची सोलापुरात जाहीर सभा होणार आहे.

Mumbai-pune Expressway Accident : कोल्हापूरहून मुंबईकडे येणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. आज पहाटे 4 वाजता हा अपघात झाला आहे. कोल्हापूरहून मुंबईकडे येणाऱ्या खासगी बसचा खोपोली येथे अपघात झाला. या अपघातात 15 प्रवासी जखमी असून यातील 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे आहे.

CM Eknath Shinde Meet Prakash Ambedkar : CM शिंदेंकडून आंबेडकरांच्या प्रकृतीची विचारपूस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यातील शिवाजी नगर येथे प्रचाराला आले होते. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली. आंबेडकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर अनेक नेते त्यांची भेट घेत आहेत. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आंबेडकर यांची भेट घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT