धारावीत काॅग्रेस आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. प्रचार सुरू असताना दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर घोषणाबाजी करत धक्काबुक्की करण्यात आली. जय श्री राम अशा घोषणा देत खासदार वर्षा गायकवाड यांचे पती राजू गोडसे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. धारावीत तणावाचं वातावरण झाल असून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी फरार असलेला शूटर शिव कुमारला अखेर अटक करण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. शिवकुमार नेपाळला पळून जाण्याच्या होता तयारीत होता. गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशमध्ये शिवकुमारला अटक केली. मुंबई गुन्हे शाखा आणि उत्तर प्रदेश STF ची संयुक्त कारवाई करण्यात आली. शिव कुमारसह दोघा जणांना गुन्हे शाखेने केली अटक केली.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारासाठी छत्रपती मालोजीराजे आणि मधुरिमाराजे छत्रपती सक्रिय झाले आहेत. कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी निर्णय घेतला. छत्रपती मालोजीराजे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात काँग्रेसचे नेते सतेज पाटील देखील उपस्थित होते.
भाजपने आज आपले संकल्पपत्र जाहीर केले. या संकल्पपत्राविषयी चित्र वाघ यांनी 'अंत्योदयाचा ध्येय ठेवणार... सबका साथ सबका विकास याची खूनगाठ मनाशी बांधलेल्या भाजप आणि महायुतीसाठी संकल्पपत्र म्हणजे फक्त कागदाचा डॉक्युमेंट नाही की काँग्रेसच्या खोटा फॅक्टरी सारखी खटाखट खोटी वचनं नाही. तर आमच्यासाठी संकल्पपत्र म्हणजे एक पवित्र डॉक्युमेंट आहे. जे आपल्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला प्रगतशील बनवेल', असे म्हटले आहे.
भाजपवाल्यांनो तुम्ही राज्य विकत घेतलेले नाही. खासदार धनंजय महाडिक 'लाडकी बहिण' योजना सरकारी आहे, महिलांना तुमच्या खिशातून नव्हे तर सरकारी तिजोरीतून पैसे दिले जात आहेत. माझ्या महाराष्ट्रातील गरीब, कष्टकरी, शेतकरी, आदिवासी महिला स्वाभिमानी आहेत. दीड हजार रुपये देऊन त्यांच्यावर रुबाब करायचा नाही, अशा शब्दांत नाना पटोलेंनी सुनावले
आमदार दत्तात्रेय भरणेंनी हर्षवर्धन पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता फोडला. हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक अतुल व्यवहारे यांचा अजित पवार गटात पक्ष प्रवेश. कार्यक्रमासाठी रूपाली चाकणकर यांची उपस्थिती. यापूर्वी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव यांनी केला होता अजित पवार गटात प्रवेश
महाविकास आघाडी गॅरंटी देत आहे. पण महाविकास आघाडीची गॅरंटी म्हणजे भ्रष्टाचाराचे गॅरंटी, खोटेपणाची गॅरंटी, भाई भतीजावादाची गॅरंटी आहे, अशी टीका मलापूरमधील सभेत गृहमंत्री अमित शाह यांनी केली. शाह म्हणाले, आघाडी महाराष्ट्राला सुरक्षित ठेऊ शकत नाही. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाची प्रगती झाली. अर्थव्यवस्थेत देश 11 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आला.
भाषणातून लाडक्या बहिणींना दमदाटी करणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांना निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे. महाडिक यांनी लाडक्या बहिण योजनेचे पैसे घेऊन काँग्रेसच्या प्रचारात जाणाऱ्या महिलांचे फोटो काढा, आपण त्यांचे पैसे बंद करू, असा धमकी वजा इशारा दिला होता. त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.
महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नावर भाजप नेते, केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "सध्या महायुतीचे नेतृत्व एकनाथ शिंदे करीत आहेत. निवडणूक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार? हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहे, असे अमित शाह यांनी म्हटले. महायुतीची सरकार आल्यावर तीन पक्षांची समिती बनणार आहे.ती समिती मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवार आहे.
सांगली जिल्ह्यात जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या युवासेनेने भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय विश्लेषणांच्या भुवया उंचावल्या आहेत. जत युवासेनेकडून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना जाहीर पाठिंबा केला आहे. गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जत मतदारसंघात पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.विधानसभा निवडणूकीत जतच्या युवा सेनेला काँग्रेसकडून विश्वासात घेण्यात येत नसल्याने आणि डावलल्याने पडळकरांना पाठिंबा देण्यात येत असल्याचे जत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या युवा सेनेने स्पष्ट केले आहे.
भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी लाडक्या बहिणींबाबत केलेल्या विधानाचा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला आहे. महाडिक यांनी लाडक्या बहिणींनी दिलेली धमकी आम्ही कदापिही खपवून घेणार नाही, अशा शब्दात सुळे यांनी महाडिकांना खडेबोल सुनावले
महालक्ष्मी अंतर्गत महिलांना प्रतिमा 3000 रुपये देणार.
महिलांना बस प्रवास मोफत.
स्वयंपाकाचे 6 गॅस सिलिंडर प्रत्येकी 500 रुपये उपलब्ध करणार.
3 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी, नियमित कृषी कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान.
नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना महिन्याला 4 हजार रुपये देणार.
हेल्थ विमा संरक्षण 25 लाखापर्यंत देणार, जातीय जनगणना, 50 आरक्षणाची मर्यादा महाराष्ट्रात हटवणार, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा, 300 युनिटममध्ये 100 युनिटपर्यंत मोफत वीज, उद्योग-व्यवसायाला गती देणार, MPSC मार्फत अडीच लाख सरकारी पदे भरणार इत्यादी आश्वासनं या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला आहे. भायखळामध्ये त्यांना मनसेकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये महिला, शेतकरी, युवक शिक्षण, आरोग्य, उद्योग, व्यवसाय, सामाजिक न्याय या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. तर महालक्ष्मी योजने अंतर्गत महिलांना महिना 3000 देण्यासह महिलांना बस प्रवास मोफत करण्याच आश्वासन देण्यात आलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानंतर आता थोड्यच वेळात महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित होणार आहे. त्यामुळे या जाहीरनाम्यातून आगाडी राज्यातील जनतेला काय आश्वासनं देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी महिन्याला 2100 रुपये देणार.
वृद्ध पेन्शनधारकांना महिन्याला 2100 रुपये देणार.
अंगणवाडी आणि आशा सेवकांना १५ हजारांचं विमा संरक्षण.
25 लाख रोजगार निर्मिती करणार.
शेतमालाची हमीभावाने खरेदी करणार.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचं संकल्प पत्र प्रकाशित करण्यात आलं आहे. यासाठी भाजपकडून मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार इत्यादी भाजप नेते उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत जे आपल्या मतांशी सहमत आहेत त्यांना पाठिंबा द्या, आपलं मत वाया जाऊ देऊ नका, असं आवाहन करत ज्याला पाडायचं त्याला पाडा असा सल्ला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला आहे. ते सकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते. तसंच ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना सोडायचं नाही, असंही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत कुणाला पाडायचं आणि कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबतचा अंतिम निर्णय मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज जाहीर करणार आहेत. सकाळी 10 वाजता ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे आता जरांगे कोणाला पाठिंबा देणार आणि कुणाच्या विरोधात दंड थोपटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहिण योजनेसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर महिलांची जाहीर माफी मागितली आहे. मात्र, यावरून आता काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महाडिक यांना कोंडीत पकडलं आहे. खोटं बोलणं आणि धमकी देणं ही महाडिकांची स्टाईल असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. शिवाय महाडिकांची पार्श्वभूमी गुंडगिरी असल्याच्या मुळेच असली वक्तव्य येतात असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर येथील सभेत लाडकी बहीण योजनेवरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका होताच 24 तासांच्या आत त्यांनी जाहीर माफी मागितली आहे. शिवाय आपले हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनींचा अपमान करण्यासाठी नव्हेत विरोधकांकडून आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावेळी आघाडीतील सर्व मित्र पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.