raj thackeray eknath shinde sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Elections 2024 LIVE updates : एकनाथ शिंदेंची शिवसेना- मनसेत छुपी युती?

Maharashtra Assembly Elections 2024 LIVE News : विधानसभा निडणुकीसाठी आता राज्यात प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या प्रचार सभा निश्चित झाल्या आहेत. त्यानुसार आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रमुख नेते महाराष्ट्र पिंजून काढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Jagdish Patil

शायना एन. सी सभेत मनसेचे कार्यकर्ते

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार शायना एन. सी यांच्या पदाधिकारी मेळाव्यात मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी शिवसेना उपनेत्या आशा मामेडी यांनी मंचावरूनच मानले राज ठाकरे यांचे आभार . त्यामुळे मनसे-शिवसेनेच्या छुपी युती असल्याची चर्चा. शिवडी विधानसभेत मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांना भाजपने दिला आहे पाठिंबा.

याचिका न स्वीकारण्याची पोलिसांनी न्यायालयाला विनंती

शिखर बँक घोटाळा घोटाळ्यातील प्रोटेस्ट पीटिशन (विरोध याचिका) रद्द करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. किसन कानोळे यांना याप्रकरणी विरोध याचिका दाखल करण्याचा अधिकारच नसल्याचा आर्थिक गुन्हे शाखेचा कोर्टात दावा. याचिकाकर्ता याप्रकरणाशी कुठेही संबंधित नसल्यानं त्यांची याचिका न स्वीकारण्याची तपासयंत्रणेकडून कोर्टाकडे विनंती.

पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली हायकोर्टातील सुनावणी टळली

पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली हायकोर्टातील आजची सुनावणी टळली. पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीन संदर्भात होणार होती सुनावणी. यापूर्वी दिल्ली हायकोर्टानं पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण दिलं आहे. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे आजची सुनावणी होऊ शकली नसल्याची माहिती.

भूपेश बघेला भाजपवर चिडले

भाजप नेत्यांकडून काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लाल कव्हर असलेले संविधानाची प्रत दाखवत असल्याने टीका केली जात आहे. मात्र, या टीकेला छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेला यांनी उत्तर दिले आहे. भाजप सरकार आल्यापासून राज्यावर 251 कोटींचे कर्ज झाले. त्यावर कोणी बोलत नाही, असा टोला बघेला यांनी लगावला

Amit Shah : अमित शाहांकडून प्रचाराला सुरुवात

बत्तीस शिराळा येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात गृहमंत्री अमित शाह यांनी केली. येथील सभेत समर्थ रामदासांनी तरुणांना एकत्र करून एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराज यांना पाठिंबा दिला, असे म्हटले आहे.

Raj Thackeray Live News : कोकणात चमत्कार घडवून दाखवतो आम्हाला निवडून द्या - राज ठाकरे

मी 2006 साली पक्ष निर्मितीच्या वेळी जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावायचा आहे असं म्हटलं होतं. कोकणात चमत्कार घडवून दाखवतो आम्हाला निवडून द्या, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणवासियांना केलं. तसंच तुमचा शत्रु जमिनीवरून जमिन हडप करण्यासाठी येतोय. राजकारणी नाहीत तर ते दलाल आहेत. जमिनी घेण्यासाठी आपली माणसे तुमच्याकडे येतात. नाणार ,बारसू प्रस्ताव आला 5 हजार एकर जमिन आली कुठून? पायाखालची जमिन गेली की तुमचं अस्तित्व संपलं. इतिहास जमिनीशी भूगोलाशी आधारीत आहे, त्यामुळे कोकणातील जमिनी विकू नका, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

PM Narendra Modi Live : देशात आता गरिबांचा विचार करणार सरकार - मोदी

महायुती आहे तर महाराष्ट्राची प्रगती आहे आणि देशात आता गरिबांचा विचार करणार सरकार असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील प्रचार सभेत केलं. यावेळी त्यांनी महायुती सरकारने शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत केल्याचा दावा करत काँग्रेस फक्त विविध योजनांना विरोध करत असल्याचा आरोपही केला.

Govind Devgiri Maharaj Live News : हिंदूंचं 50 टक्के मतदान होणं ही  राष्ट्रीय आपत्ती - गोविंद देवगिरी महाराज

श्रीराम तीर्थक्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष श्री गोविंद देव गिरी महाराजांनी हिंदूंनी 100% मतदान करणे आवश्यक असल्याचं वक्तव्य केलं आहे. हिंदू समाजात मतदानाबद्दल अत्यंत मोठी उदासीनता दिसून येत असून 50% च्या आसपास मतदान होणे ही एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray Live News : कोकण इतकं सुंदर करता येईल ज्याची कल्पनाही करता येणार नाही - राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभेत कोकण खूप सुंदर आहे. मात्र, चुकीची माणसं निवडून दिल्यानं त्यांनी इथे काहीही चांगलं केलं नसल्याची खंत व्यक्त केली. शिवाय 750 किलोमीटरचा समुद्र किनारा आणि महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. गोवा राज्य पर्यटनावर सुरू आहे. त्याचप्रमाणे कोकण इतकं सुंदर करता येईल त्याची कल्पना करता येणार नाही, असं म्हटलं आहे.

Dhule Narendra Modi Live : PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

धुळ्यातील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. आमच्या बहीण-मुलींना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आणल्या, महिलांना हक्क दिला त्यावेळी विरोधक आमची खिल्ली उडवत होते. आज महाराष्ट्रात कागदपत्रांवर आईचं नाव लावलं जात आहे. आमचं सरकार महिलांसाठी जे करत आहे ते काँग्रेसला सहन होत नाही. माझी लाडकी बहीण योजनेची देशभरात चर्चा सुरु आहे. मात्र ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेस कोर्टात गेली होती, असं मोदी म्हणाले.

PM Modi Dhule Live News : पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर फडणवीसांचा शेतकऱ्यांना मोठा वादा 

धुळ्यातील प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार असल्याचं आश्वासन दिलं. यावेळी व्यासपीठावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थितीत होते.

Aligarh Muslim University Live News : अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याक संस्थानचा दर्जा कायम

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला (AMU) अल्पसंख्याक संस्थानचा दर्जा कायम राहिल असा निकाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिला आहे. घटनेच्या कलम 30 नुसार धार्मिक समुदायाला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि ती चालवण्याचा अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. 2005 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने AMU ला अल्पसंख्याक संस्था म्हणून मान्यता देण्यास नकार दिला होता. हायकोर्टाच्या याच निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील दाखल केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला.

Sanjay Raut On Chhagan Bhujbal Live News : "सगळ्यांनी ईडीला घाबरून पलायन केलं - संजय राऊत

छगन भुजबळ यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, "एकनाथ शिंदेंपासून अजित पवार हे सगळे ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेले ईडी आणि सीबीआयपासून बचाव करण्यासाठी, आपली कातडी आणि प्रॉपर्टी वाचवण्यासाठी ते भाजपमध्ये गेले आहेत. प्रफुल्ल पटेल भाजपसोबत गेले नसते तर त्यांची इस्टेट मोकळी झाली नसती. भाजपमध्ये जाताच सध्या तरी त्यांच्या फायली बंद करण्यात आल्या. मग हसन मुश्रीफ असो वा दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेतून फुटून गेलेले आमच्या लोकांनी ईडीला घाबरून पलायन केलं आहे."

Chhagan Bhujbal Live News : पुस्तकावर कारवाई करणार - छगन भुजबळ

राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात करण्यात आलेला दावा छगन भुजबळ यांनी खोडून काढला आहे. शिवाय आपण यांचं पुस्तक वाचणार आणि त्यात काही चुकीचं किंवा खोटं आढळल्यास कारवाई करणार असल्याचंही भुजबळ म्हणाले.

Nandurbar Live News : निवडणूक काळात शरद पवारांना नंदुरबारमधून मोठा धक्का!

नंदुरबारमधील शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 91 पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Pandharpur Live News : पंढरपूरचे काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांना पुन्हा मोठा धक्का

पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा उज्वला भालेराव, माजी नगरसेवक महादेव धोत्रे, ऋषीकेश भालेराव यांनी भगीरथ भालके यांची साथ सोडत भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवाय त्यांनी भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना समर्थन दिलं आहे. कालच मंगळवेढा येथील समविचारी आघाडीने भालकेंची साथ सोडल्यानंतर आज पंढरपूरातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हा भगीरथ भालके यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Mumbai Police Live News : मुंबईत 2.3 कोटींची रोकड जप्त

मुंबई पोलिसांनी भुलेश्वर परिसरातून ल 2.3 कोटींची रोकड जप्त केली असून या प्रकरणी 12 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर एल. टी. मार्ग पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

Chhagan Bhujbal Live News : ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर - छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. मी ओबीसी असल्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यात आली आणि ईडीपासून मुक्तीसाठी आपण भाजपमध्ये गेल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे. राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात हा मोठा दावा करण्यात आला आहे.

Pooja Khedkar Live News : वादग्रस्त माजी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी

वादग्रस्त माजी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. खेडकर विरोधात UPSC आणि दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी केली आहे.

Amit Shah kolhapur visit : अमित शहांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा

भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सभा घेणार आहेत. तसेच ते कराड तालुक्यातही सभा घेणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT