शरद पवारांनी महायुती सरकारवर टीका केली. आता महाराष्ट्राची निवडणूक आली.त्याआधी काही योजना त्यांनी आणल्या. ते म्हणाले, या राज्यातील आमची बहीण लाडकी आहे. एका बाजूने अर्थ सहाय्य करायचं आणि दुसरीकडे महिलांवरील आत्यचार वाढत चाललेत. शाळेतील विद्यार्थिनी सुद्धा आज सुरक्षित नाही.गेल्या आठ महिन्यात महिलांच्या आत्यचाराच्या घटना वाढल्या आहेत.पोलिसांना आरोपी हाती लागत नाही, असे शरद पवार म्हणाले.
अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. सत्तेसाठी उद्धव ठाकरे हे राहुल काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. राहुल गांधी यांची चौथी पिढी आली तरी 370 हटणार नाही, असे देखील शाह म्हणाले
महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या मनसेच्या स्थापनेपासून मनसेसाठी महत्त्वाची भूमिका निभावलीलेले राजन शिरोडकर यांचे निधन. तीन वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. राजन शिरोडकर यांचे पुत्र आदित्य शिरोडकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे सहसंपर्कप्रमुख आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ही राजन शिरोडकर यांनी काम केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोर्ट, एअरपोर्ट, धारावीची जमीन अडानीला देत आहेत. अंबानीच्या लग्नात जात आहेत. मोदी हे अडानी अंबानीसाठी काम करतात, अशी टीका राहुल गांधी यांनी गोंदीयाच्या सभेत केली.
आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे, अशी मागणी केली आहे. ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले तर महाविकास आघाडीला फायदा होईल, असे देखील सिंह म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार उद्यापासून पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते उद्या जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि भोसरीमध्ये सभा घेणार आहेत. तर गुरुवारी पुणे शहरात त्यांच्या सभा आहेत. गुरुवारी एकाच दिवशी पुणे शहरात त्यांच्या 3 सभा होणार आहेत. तर 17 तारखेपर्यंत शरद पवार पुणे शहरात असणार आहेत.
काल वणीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासल्या होत्या. याचा व्हिडिओ उद्धव ठाकरेंनी शेअर केल्यामुळे राज्यातील राजकारण तापलं होतं. यावरून ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांच्या बॅगा देखील तपासा असं आव्हान केलं होतं. अशातच आता आज औसामध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सायंकाळी पुण्यातील एस.पी महाविद्यालयाच्या मैदानात सभा होणार आहे. या सभेला पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे जवळपास 34 उमेदवार उपस्थित असणार आहेत.
चिमूर येथील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. 'मविआ' म्हणजे भ्रष्टाचाराचे खिलाडी आहेत. कलम 370 रद्द करण्यास काँग्रेसने विरोध केल्याचं सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकारने संकल्प केला असून आमच्या सरकारने नक्षलवादावर लगाम लावल्याचा दावा केला.
भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे दानवे ऐन निवडणुकीत विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते, माजीमंत्री आदित्य ठाकरे यांनी दानवेंची खिल्ली उठवली आहे. "रावसाहेब दानवे चुकून भाजपमध्ये आहेत. ते फुटबॉल टीममध्ये असायला हवे होते," असा टोला आदित्य ठाकरे यांनी दानवेंना लगावला. "कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे, धक्काबुक्की करणे योग्य नाही, भाजप कार्यकर्त्यांनी याचा विचार करायला हवा," असा सल्ला आदित्य ठाकरेंनी दिला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नवाब मलिक यांना न्यायालयाकडून तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्यांच्याकडून अंतरिम जानिमाचा गैरवापर केला जात असल्याचा दावा करत ईडीने जामीन रद्द करण्यासाठीची याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर मलिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. तांत्रिक अडचणीमुळे विमान संभाजीनगर विमानतळावर उतरवलं नाही. राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. बुलढाण्याच्या चिखली येथे त्यांची आज सभा होणार आहे. मात्र, त्याआधी त्यांच्या विनामात तांत्रिक बिघा झाल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदेंच्या सर्व उमेदवारांना आतापर्यंत 25 कोटी रुपये पोहोचल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यातील काही पैसे टोल नाक्यावर पकडले आहेच. मागे 15 कोटी पकडले पण गाडी कुणाची काही सांगितलं का? गाडी कोणाची होती आम्हाला माहिती आहे. 15 कोटी पकडले पण रेकॉर्डवर फक्त 5 कोटी दाखवले उरलेल्या पैशांचा हिशोब कुठे आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरेंच्या म्हणण्याला महाराष्ट्र किंमत देत नाही. उद्धव ठाकरेंवर टीका करतानात्यांनी भान ठेवावं. ठाकरे, पवारांची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे, असं राऊत म्हणाले.
मुंबईतील कुख्यात गुंड अरुण गवळी याची संचित रजा नाकारण्यात आली आहे. अरुण गवळी याने संचित रजेसाठी केलेला अर्ज उपमहानिरीक्षकांनी विधानसभा निवडणुकीचे कारण देत नाकारला आहे. त्यानंतर गवळीने वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.
मुंबईतील चांदिवली विधानसभेची सभा संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांना अपशब्द वापरले. या व्यक्तीचे अपशब्द ऐकू येताच मुख्यमंत्री संतापले आणि त्यांनी गाडी थांबवून त्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यातील एस.पी महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होत आहे. या सभेसाठी सभेसाठी महायुतीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.