naresh goyal sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Elections 2024 LIVE updates : नरेश गोयल यांना जामीन मंजूर

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 LIVE updates : विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याआधी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचं मोठं आव्हान राजकीय नेत्यांसमोर आहे. त्यामुळे पायाला भिंगरी बांधून ते प्रचार करत आहेत. याच नेत्यांच्या प्रचार सभा, त्यांनी एकमेकांवर केलेले आरोप-प्रत्यारोप याबाबतच्या सर्व घडामोडी जाणून घेऊया.

Jagdish Patil

538 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी केली होती अटक

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केला आहे. 538 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी जमीन मंजूर झाला आहे. कर्करोगाच्या उपचारासाठी जामीन मिळावा यासाठी गोयल यांनी दाखल केली होती याचिका. गोयल यांना हायकोर्टानं आधी दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता, त्यानंतर या जामीनाची मुदत एक महिन्यासाठी वाढवण्यात आली होती.गेल्यावर्षी ईडीने या घोटाळाप्रकरणी नरेश गोयल यांना अटक केली होती.याप्रकरणी सहआरोपी असलेल्या त्यांच्या पत्नी अनिका गोयल यांचं नुकतच कर्करोगाने निधन झाल होत

भाजपचा अपक्षांना ताकद देणार हरियाणार पॅटर्न - जयंत पाटील

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीचे प्रमाण जास्त दिसते आहे. भाजप अपक्षांना ताकद देत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील म्हणाले, हरियाणा पॅटर्न प्रमाणे जास्तीत जास्त अपक्ष उभं करून मतं खायची हा भाजपचा पॅटर्न आहे.

आमच्या कुटुंबाला काही झाल्यास सरवणकर जबाबदार

माहिम कोळीवाड्यात प्रचारासाठी आलेल्या सदा सरवणकर यांच्यावर कोळी भगिनी संतापल्या. आपल्या बचत गटाच्या सीफूड स्टॅल बंद केल्याचा राग मंगला तांडेल यांनी व्यक्त केला.तसेच आमच्या कुटुंबातील कोणालाही काही बरं वाईट झालं तर त्याचे पूर्णपणे जबाबदार सदा सरवणकर , समाधान सरवणकर आणि स्थानिक शाखाप्रमुख मिलिंद तांडेल असेल, असे मंगला तांडेल म्हणाल्या.

मोदींनी एकही आश्वासन पाळलं नाही - नाना पटोले

काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीवर मोठं भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आली तर केंद्रातील नरेंद्र मोदी यांची सत्ता जाईल, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. 2014 मध्ये मोदींनी जी आश्वासनं दिली होती त्यातील एक देखील पाळलं नाही, अशा टीका ही नाना पटोले यांनी केली.

कायदा सर्वांना समानच पाहिजे - अमोल कोल्हे

निवडणूक अधिकाऱ्यांकडून खासदार अमोल कोल्हे यांची बॅग तपासण्यात आली. या विषयी अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. कोल्हे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज पुन्हा बॅग तपासली गेली, विधानसभा निवडणुकीदरम्यान दुसऱ्यांदा तपासणी झाली. आजच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेसाहेबांचीही तपासणी झाली.नियम असतात हे मान्य आहे, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही. कायदा आहे, तर तो समानच असला पाहिजे.

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बंडखोरांवर कारवाई

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. नागपूरच्या आबा पांडे, रमेश फुले यासोबतच महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे प्रवक्ता मुजीब रूमाने यांच्यावर कारवाई तिन्ही पदाधिकाऱ्यांवर पक्षाकडून निलंबनाची कारवाई केली आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी

उद्धव ठाकरे हे यवतमाळमधील वणी येथे हेलिकाॅप्टरने सभेसाठी आले होते. त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी हॅलिपॅडवर उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी केली. बॅगची तपासणी करत असतानाचा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांनी काढला तसेच निवडणूक अधिकाऱ्यांना माझ्या आधी कोणत्या नेत्यांची बॅग तपासली असा प्रश्न देखील विचारला.

Aditya Thackeray Live News : भाजपचे हिंदुत्व घरे जाळते आणि आमचे हिंदुत्व चूल पेटवते - आदित्य ठाकरे

मुंबईतील भायखळा येथील प्रचारादरम्यान बोलताना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. "गेल्या दोन वर्षांत भाजपने आमच्याविरुद्ध अनेक षडयंत्र रचली, पण आम्ही तुटलो नाही. आम्ही महाराष्ट्र धर्माशी एकनिष्ठ आहोत. आम्हाला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. आम्ही हिंदुत्वाचे समर्थक आहोत, असे काही जण म्हणत आहेत. पण आम्ही हिंदुत्ववादी असून आमचं हिंदुत्व आणि भाजपचे हिंदुत्व वेगळे आहे. भाजपचे हिंदुत्व घरे जाळते आणि आमचे हिंदुत्व चूल पेटवते", असं आदिक्य म्हणाले.

Eknath Shinde Live News : 'मविआ'ने महायुतीचा जाहीनामा चोरला, मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रमेश बोरणारे यांच्या प्रचार सभेत बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. तर महायुतीने प्रकाशित केलेला जाहीरनामा फक्त ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे, असं म्हणत आगामी काळात आणखी मोठ्या योजना आणणार असल्याचे संकेत दिले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीने महायुतीचा जाहीरनामा चोरल्याचा आरोप केला.

Uddhav Thackeray on Narendra Modi: 370 कलमाचा शेतकऱ्यांना काय फायदा?

"नरेंद्र मोदी हे एका पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. मोदी-शाह रोज राज्यात येत आहेत, दाढीवाले, जॅकेटवाले रोज बॅगा तपासत आहेत. सगळ्यांच्या बॅगा तपासा. महाराष्ट्र को लुटगें और बांटेगे, असे त्यांचे सुरु आहे," अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी महायुतीवर टीका केली. आमचा विकासाला विरोध नाही, पण हे 370 कलमांविषयी नेहमी बोलत आहेत. पण 370 कलमाचा शेतकऱ्यांना काय फायदा? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीचे वणी विधानसभेचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचार सभेत ठाकरे बोलत होते.

Narendra Modi Live News : पंतप्रधान नरेंद्र मोदींची 14 नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीतील नेत्यांनी जोर लावल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आणि महाविकास आघाडीसाठी राहुल गांधी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. अशातच आता PM मोदी उद्या पुणे शहरात तर 14 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार सभेसाठी येणार आहेत.

Devendra Fadnavis Live News : मी कधीही आपलं घर भरण्याचा विचार केला नाही - फडणवीस

"देवेंद्र फडणवीसने कधीही आपलं घर भरण्याचा विचार केला नाही. कधीही स्वतःचे उद्योग, व्यवसाय, शिक्षण संस्था उभारल्या नाहीत. महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या 20 मुख्यमंत्र्यांपैकी मी एकटा मुख्यमंत्री असा आहे, ज्याचं मुंबईत स्वतःचं घर नाही. आजही माझं घर नागपुरातच आहे.", असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाच्या प्रचार सभेत बोलत होते.

Shivani Vijay Wadettiwar Live News : पुढील मुख्यमंत्री विजय वडेट्टीवार, शिवानी वडेट्टीवार यांचा दावा

विरोधी पक्षनेता पुढचा मुख्यमंत्री असतो, असं म्हणत वडील विजय वडेट्टीवार पुढील मुख्यमंत्री असतील असे संकेत शिवानी वडेट्टीवार यांनी दिले आहेत. भाषणा दरम्यान वीज गेली म्हणून संतापलेल्या शिवानी वडेट्टीवारांनी यांनी शिवराळ भाषेचा वापर केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी त्यांनी वीज मंडळासह सरकारवर टीका करताना शिवराळ भाषा वापरली आहे.

Ramdas Athawale Live News : महायुतीतील आणखी एक मंत्री मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत

महाराष्ट्राचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरच नसेल तर मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. तसंच राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचा दावा देखील त्यांनी साम टीव्हीशी बोलताना केला आहे. शिवाय राज ठाकरेंपेक्षा उद्धव ठाकरे यांची ताकद जास्त असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Sanjeev Khanna Live News : संजीव खन्ना यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ!

भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायाधीश संजीव खन्ना यांनी कार्यभार स्वीकारल आहे. ते 13 मे 2025 पर्यंत या पदावर राहणार आहेत. आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला

Amravati Live News : यशोमती ठाकूर यांच्या प्रचाराचे बॅनर फाडले

अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचाराचे बॅनर फाडल्याची घटना समोर आली आहे. तर विरोधकांनी हे बॅनर फाडल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या घटनेबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Ajit Pawar Live News : धावत्या दौऱ्यात अजितदादांची ग्रामस्थ व कर्यकर्त्यांसोबत चाय पे चर्चा..!

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. वाणेवाडी येथे आयोजित संवाद सभेनंतर सोमेश्वर कारखाना परिसरातील हॉटेल सोमेश्वर रेस्टॉरंट येथे थांबून अजितदादांनी चहाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांसोबत चाय पे चर्चा केल्याचं पहायला मिळालं..

Sanjay Raut Live News : आताचं सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही - राऊत

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 160 ते 165 मिळतील असा विश्वास शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसंच राज्यात आता जे सरकार आहे ते चंद्रचूड कृपेने किंवा मोदी-शहांच्या कृपेने पुन्हा येणार नाही, असंही ते म्हणाले.

Ajit Pawar : बारामतीत लाखाच्या पुढे लीड मिळेल - अजित पवार

बारामतीत मला लाखाच्या पुढे लीड मिळेल शिवाय महायतुीला राज्यात 175 जास्त जागा मिळतील असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत महायुतीतील घटक पक्षांची समन्वय संदर्भातील बैठक आयोजित केली होती, अशी माहिती त्यांनी सांगितली,

Dhananjay Mahadik : धनंजय महाडिकांच्या विरोधात गुन्हा दाखल!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत संदर्भात बोलताना 'काँग्रेसच्या सभांना जाणाऱ्या आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिलांचे नाव आणि फोटो द्या, व्यवस्था करतो.', असं वादग्रस्त वक्तव्य केलेले भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली आहे. आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Baba Siddique shot dead case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील फरार शूटरला अटक

माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील फरार शूटर शिव कुमार याला उत्तर प्रदेशातील बेहराईचमधून अटक करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT