दापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांच्या उमदेवारीमुळे नाराजी असलेले आप्पासाहेब जगदाळे हे शरद पवारांची साथ सोडणार आहेत.आप्पासाहेब जगदाळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात उमेदवार देण्याची घोषणा करत प्रवीण माने निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र,ते शरद पवारांची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच ते राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रेय भरणे यांना पाठींबा देखील देणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या काळात नागपूर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा पत्र पाठविले आहे. कामठी विधानसभा मतदारसंघातून गोडबोले यांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत होते.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी अशा सर्जरी पुण्यातील एका रुग्णालयात करण्यात आल्या. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचा काही दिवसापूर्वी अपघात झाला होता. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे आज (रविवारी) निधन झाले. समीर खान यांच्याच कारचालकाने समीर खान यांच्यावर गाडी घातली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
लक्ष्मण हाके म्हणाले , मनोज जरांगे तुतारीची सुपारी का सुपारी घेऊन ते तुतारी वाजवणार आहेत? मनोज जरांगे बारामतीला मॅनेज झाले आहेत. लोकसभेला त्यांनी महाविकास आघाडीचे काम करून ओबीसीच्या नेत्यांना पाडले आहे. जरांगे यांच्या पाठीमागे दलित आणि मुस्लिम जाणार नाही कारण सर्वसामावेशक भूमिका घेणाऱ्या नेता या समाजाला आवश्यक असतो. जरांगे यांना जे जे नेते रात्री येऊन भेटले त्यांच्या विरोधात त्यांनी उमेदवार दिले नाहीत. मात्र जे नेते त्यांना येऊन भेटले नाहीत त्यांच्या विरोधात त्यांनी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे जरांगे मॅनेज झाले आहेत. म्हणून जरांगे नावाचे वटवागूळ महाराष्ट्राच्या मानेवर बसलं आहे ते उद्या 3 नंतर इतिहास जमा होईल, अशी टीका हाके यांनी केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समरजीत घाटगे हे नुकतेच मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेले होते. या भेटीनंतर आज (रविवारी) हसन मुश्रीफ यांनी अंतरवाली सराटीमध्ये जात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरांगे यांच्यासोबत विविध राजकीय विषयांवर सविस्तर आणि समाधानकारक चर्चा झाली, असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युग्रेंद्र पवार रिंगणात आहेत. अजित पवारांचा आज बारामतीत मतदारांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्या प्रचारावरुन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील खासदार संजय राऊत यांनी त्यांना आव्हान दिले आहे. ''बारामतीची लढाई आता सोपी राहिलेली नाही. 26 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं असेल. त्यामुळे कोण- काय बोलतं? कुणाचे काय दावे आहेत? याला काहीही महत्व नाही. त्यांना म्हणावं (अजित पवार) आधी आपण जिंकून या… अजित पवारांसह सगळ्यांना माझं सांगणं आहे की आधी आपण जिंकून या…,'' असे खुलं चॅलेंज राऊतांनी अजितदादांना दिले आहे, यावर अजितदादा काय उत्तर देतात, हे लवकरच समजेल.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागपुरात शिवसेना ठाकरे गटाचे नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा पाठवला आहे. मागील 17 वर्षांपासून पक्ष संघटनेसाठी काम करत असूनही पक्ष पाठीशी उभा होत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. तर प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना पदाचा राजीनामा दिल्यामुळे ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणारा संदेश मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी यांनी दहा दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार बाबा सिद्दिकी यांच्याप्रमाणे तुमचा शेवट करू, असा हा संदेश आहे. यामुळे खळबळ उडाली असून, मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सांगोला मतदारसंघात महाविकास आघाडीने शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा द्यावा, असं आवाहन उमेदवार बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे. संजय राऊत यांनी आज सांगोल्याची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाची असून इथून दिपक साळुंखे यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा आम्ही ताकदीने लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात आघाडीत बिघाडी झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी चार विधानसभा लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मराठवाड्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांचे टेन्शन वाढवले आहे. बीड, जालना संभाजीनगर, फुंलब्री विधानसभा मतदार संघात मनोज जरांगेंचे शिलेदार रिंगणात उतरणार आहेत. तर गेवराई आणि आष्टी विधानसभा मतदारसंघाबाबत येथील जनतेशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते आणि कागल मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. मुश्रीफ यांनी मनोज जरांगे यांच्याकडे समर्थन मागितल्याची माहिती मुश्रीफ यांनी भेटीनंतर दिली. महत्वाची बाबा म्हणजे दोनच दिवसांपूर्वी मुश्रीफ यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार समरजित घाटगे यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतली होती.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते रुपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. म्हात्रे यांनी भिवंडी पूर्वमधून अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यांना शिंदेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्धव ठाकरे मुलाला जिंकून आणण्यासाठी आमचा बळी देत आहेत. 30 वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ, मात्र माझ्यावर अन्याय झाल्याची खंत म्हात्रे यांनी बोलून दाखवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांची होती. अजित पवार यांनी त्यांना धक्का मारत त्यांच्या हातातील 'घड्याळ' हिसकावलं. ही पाकीटमारांची टोळी आहे. अजित पवार यांच्यात हिम्मत असती तर त्यांनी शरद पवार हे ज्याप्रमाणे 'तुतारी'वर लढत आहे. त्याप्रमाणे अजित पवार यांनीही दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवली असती, असे आव्हाड म्हणाले.
राज्यात सध्या भावी मुख्यमंत्र्यांची जोरदार चर्चा सुरू आहेत. अशातच आता एकनाथ शिंदे हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होऊ दे यासाठी दिवाळी पाडव्यानिमित्त युवासेनेच्या सहसचिव शर्मिला येवले आणि सहकाऱ्यांनी उज्जैनच्या महाकाल चरणी प्रार्थना केली आहे. यावेळी त्यांनी 'अनाथाचा नाथ एकनाथ' म्हणत महाकाल दरबारात घोषणा दिल्या.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी एका सभेत बोलताना अजित पवार यांनी विधानसभेला मला खुश करा असं वक्तव्य केलं आहे. लोकसभेला शरद पवार साहेबांना या वयात धक्का बसेल, याचा विचार करून तुम्ही सुप्रियाला मतदान करून निवडून दिलं. आता मला मतदान करा. शरद पवार साहेबांना खुश केलं आता मला खुश करा. मी खुश म्हणजे साहेब खुश, असं अजित पवार म्हणाले.
बारामती आता सोपी राहिली नसून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्यासह सर्वांनी आधी जिंकून दाखवावं असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शिवाय बारामतीचा किंगमेकर कोण? निकालानंतर कळेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात नंबरहून मेसेज करत ही धमकी देण्यात आली आहे. योगींनी 10 दिवसांत राजीनामा दिला नाही तर त्यांना बाबा सिद्दिकींसारखं मारू, असा उल्लेख या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
इंदापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विजयासाठी आता शरद पवार मैदानात उतरले आहेत. पाटलांच्या उमेदवारीमुळे इंदापूरात नाराज झालेल्या नेत्यांची ते आज बैठक घेणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता पाटलांना विजयी करण्यासाठी खुद्द पवारांनी फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून आता मनसे उमेदवारांसाठी राज ठाकरे सोलापुरात जाहीर सभा घेणार आहेत. येत्या 6 तारखेला त्यांच्या जिल्ह्यात दोन सभा होणार आहेत. सोलापूर दक्षिण,सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर मध्यच्या उमेदवारांसाठी ते या सभा घेणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाला पाडायचं आणि कोणाला विजयी पाठिंबा द्यायचा, याबाबतचा निर्णय मनोज जरांगे पाटील आज घेणार आहेत. यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं असून ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. जरांगे यांच्या सांगण्यावरून अनेक लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ते अर्ज तसेच ठेवायची की मागे घ्यायचे याबाबतची जरांगे यांची स्पष्ट भूमिका समोर येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.