महाविकास आघाडीला आलेल्या अपयशामुळे महाविकास आघाडीत ऐकी नव्हती अशा चर्चा आहेत. मात्र, महाराष्ट्र म्हणून आम्ही एकमताने निवडणूक लढवली.आमचे पक्षांतर्गत वाद नव्हते, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
महायुती सरकारचा शपथविधी दोन डिसेंबरला होणार असल्याची चर्चा होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार नव्या सरकारचा शपथविधी पाच डिसेंबरला आझाद मैदानावर होणार आहे. मुख्यमंत्रिपद भाजपकडे राहणार असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील अशी चर्चा आहे.
या देशात नव तंत्रज्ञान आणले असे ढोल काँग्रेस बडवत होती. आम्ही सगळं केलं म्हणून म्हणत होते आता EVM बद्दल तुम्हाला का विरोध आहे?२००४, २००९ मध्ये तुम्ही EVM वरच निवडणूक लढवल्या. नाना पटोले यांनी थोडंसं जमिनीवर यावं, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला.
राज्यात सध्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, सत्ता स्थापनेच्या घडामोडींमध्ये राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता शिंदेंच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे वर्षा निवास्थानी दाखल झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
गोंदियामध्ये शिवशाही बस उलटून 8 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत करण्यात येईल, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांची गिरे तो भी टांग उपर अशी परिस्थिती झाल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊत यांनी केलेल्या टीकेला म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, "राज्य चालवण्यासाठी केंद्राची मदत लागते. राऊत सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे तळवे चाटत असतात. केवळ ते वाटेल ते बरळत असतात. दिल्लीच्या फेऱ्या मारणे अशी टीका करणं चुकीचं आहे. एवढीच दिल्लीची लाज वाटत असेल तर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि मुंबईत बसावं", अशा शब्दात म्हस्के यांनी राऊतांना डिवचलं आहे.
दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज दुसरू बैठक पार पडत आहे. मात्र, या बैठकीआधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले आहेत. बावनकुळे सकाळी 11 च्या सुमारास सागर बंगल्यावर दाखल झाले होते. सध्या बावनकुळे आणि फडणवीसामध्ये बंद दाराआडच चर्चा सुरु आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांच्या जुहू येथील घरी तसेच कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणी ईडीचं हे धाडसत्र सुरू आहे.
महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आज मुंबईत पुन्हा महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असणार आहेत. तर या बैठकीत नव्या सरकारचा शपथविधी मुहूर्त आणि खातेवाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत गृहमंत्री पद कोणाला मिळणार? यावरून रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे. या दोन्ही पक्षाकडून गृहमंत्री पदाची मागणी करण्यात आली आहे. भाजपला मुख्यमंत्रिपदासोबत गृहमंत्री मिळावं असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला, शिवसेनेकडून सुद्धा गृहमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे.
राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर गुरूवारी रात्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मध्यरात्री महत्वाची बैठक पार पडली या बैठकीनंतरआ आता नव्या सरकारचा शपथविधी कधी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून केला जाणार असल्याची माहिती आहे. तर भाजपने मुख्यमंत्रिपदासह गृह आणि नगरविकास खात्यावर दावा केल्याची माहिती साम टीव्हीच्या सुत्रांनी दिली आहे.
दिल्लीतील बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना अमित शहांसोबत सकारात्मक बैठक झाल्याची माहिती दिली. तसंच आज पुन्हा मुंबईत बैठक होणार असल्याचंही शिंदेंनी सांगितलं. ते म्हणाले, "आमच्यात समन्वय आहे. आम्ही सकारात्मक आहोत. सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा झाली. मी काळजीवाहू मुख्यमंत्री असून सगळ्यांची काळजी मी घेत आहे. लाडकी बहीण फेमस आहे तसाच लाडका भाऊ फेमस आहे." दरम्यान यावळी त्यांनी घाई अजिबात करू नका, मी सगळ्याची काळजी घ्यायला आहे, असं सूचक वक्तव्य केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.