शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे काम उत्तम सुरु असल्याने 'आमच्याकडे इनकमिंग सुरु आहे. आऊटगोईंग नाही,' असा टोला आमदार मनिषा चौधरी यांनी विरोधकांना लगावला. ठाकरे गटातील नेते शिंदे सरकारची बदनामी करीत आहे. कुणावरही विश्वास ठेवू नका, महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार का झाला याची चौकशी करावी, अशी मागणी चौधरी यांनी केली. मनोज जरांगे फडणवीसांवर टीका करीत आहे , पण त्यांचे आरोप बिनबुडाचे आहे, असे चौधरी म्हणाल्या.
पाणी कपातीवर आपण बोलतो, पण परराज्यातील लोकांना मुंबईत येण्यापासून कोण रोखणार? असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला. त्यांच्यामुळे मुंबईतील अतिक्रमण वाढत आहे. हे अतिक्रमण काढून टाकावे, अशी विनंती राणे यांनी केली.
एसआरएचे काम सुरु असताना त्या परिसरात रस्ते, वाहतूक यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करुन द्यायची असते. मुंबईची पाणी कपात ही नैसगिक नाही, प्रशासकांच्या चुकीमुळे ही पाणी टंचाई झाली आहे. प्रशासकाच्या हलगर्जीमुळे ही वेळ आली आहे, असे सुनिल प्रभु म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दृष्काळसदृष्य भागातील विद्यापीठांमध्ये फी माफीचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला गेला. विद्यापीठांकडून फी माफीची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व विद्यापीठांना एक पत्रक काढून जुनमध्ये कोणाचीही 1 रुपया फी घेता कामा नये, असे आदेश देण्याचे आश्वासन दिले.
विद्यार्थ्यांच्या फी माफीच विक्रम काळे यांनी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केला होता. खासगी विद्यापीठ स्थापनेच्या बाबतीतलं 2024 चं विधेयक आहे. आपल्या राज्यात नवीन खासगी विद्यापीठ येत आहेत, याबद्दल आम्ही स्वागत करतो. परंतु जी काही नियमावली घालून दिली गेली आहे, त्या नियमावलीचं पालन होतं की नाही आणि विद्यार्थ्यांना त्याठिकाणी ठरवून दिलेली फी असतानाही भरमसाठ फी घेतली जाते. या बाबतीत राज्य सराकारचं नियंत्रण असलं पाहिजे. विद्यापीठाची परवानगी घेत असताना हे सर्व नियम पाळून त्याठिकाणी करार होतो, शपथपत्र होतं, त्याठिकाणी ते दिलं जातं. परंतु ग्रामीण भागातील विद्यापीठ फी माफीची अंमलबजावणी करताना दिसत नाही, असे ते म्हणाले.
वांद्रे-पूर्व येथील एसआरएची अनेक कामे रखडली आहे. काही कामे दुसऱ्या बांधकाम व्यावसायिकांना दिले जावे, अशी मागणी झिशान सिद्दीकी यांनी केली. बांधकाम व्यावसायिक आणि लोकप्रशासन यांची बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी सूचना सिद्दीकी यांनी केली. वांद्रे-पूर्व येथील पाण्याचा प्रश्नही अद्याप सुटलेला नाही, असे सिद्दीकी यांनी सांगितले.
रस्ते, वाहतुकीचे प्रकल्प मुंबईत येऊ शकले नाही. मुंबई महापालिकेची सत्ताधाऱ्यांचे लक्ष स्थायी समितीतील 'पाच टक्के'वर आहे. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबईबाबत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले 'मेरा मुंबई बदल रहा है' असे मुंबईकरांना वाटू लागले आहे, असे भाजपचे आमदार अमित साटम यांनी सांगितले.
आरटीएच्या कायद्यात सरकारने केलेला बदल चुकीचा आहे. या निर्णयाचा फेरविचार झाला पाहिजे. कायद्यातील बदलामुळे गरिबांची मुलांना चांगले शिक्षण मिळण्यापासून वंचित राहतील, अशी भीती गायकवाड यांनी व्यक्त केली.
अमित साटम भडकले...म्हणाले, राहुल गांधी कुठे मस्ती करतो सांगू का?
आपल्या भाषणात Varsha Gaikwad यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. त्यावर भाजपचे आमदार अमित साटम भडकले. म्हणाले, राहुल गांधी कुठे मस्ती करतो सांगू का?
मुंबईचे बजेट करणाऱ्या आयुक्तांची बदली करा, अशी मागणी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केली. सरकारचा पैसा हा पार्टी फंड म्हणून खर्च केला जात आहे. 'डिप क्लिनिंग' मुळे स्वच्छ अभियानाच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड आली.बचत गट, अशासकीय संस्था यातील अनेक जण बेरोजगार झाले आहेत. निकटवर्तीयांसाठी त्यांनी नवीन टेंडर काढले आहे, असा आरोप गायकवाड यांनी केला. मुंबई महापालिकेतील टेंडरवरुन विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मुंबई आयुक्तांची बदली करण्याची मागणी वर्षा गायकवाड यांनी केली.
झोपटपट्टीमध्ये राहणारे कुणी त्याठिकाणी आनंदाने राहत नाहीत, पर्याय नाही म्हणून ते राहतात, त्यांच्यासाठी असलेल्या घराचे नियोजन करून या सरकारने नवीन विकसक नेमला. अगोदरच्या आघाडी सरकारला जे सुचलं नाही, ते महायुतीच्या सरकारने केले. झोपटपट्टीतल्या व्यक्तींना विकसकाने दोन वर्षांचे भाडे देण्याचा महत्वाचा निर्णय सरकारने घेतला-आशिष शेलार
मुंबई पिण्याच्या पाण्याचे समान वाटप केले पाहिजे. शेवटचा भाग असेल, या भागाकडे पुरसे पोहचत नाही. या पाण्याचे समान वाटप का होत नाही, याबाबतची श्वेतपत्रिका प्रसिद्धी केली पाहिजे. पाच वर्षात मुंबई महापालिकेने त्यासाठी ३० हजार कोटी रुपये खर्च केले गेले, पण पाणी जनतेपर्यंत पोहचले नाही, ते का पोहचले नाही, याची चौकशी करा, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. त्यांनी ठाकरे गटावर अप्रत्यक्षपणे टोमणा हाणला.
कापसाला १४ हजार रुपये प्रति क्क्विंटल भाव मिळाला पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली.
कापसाला भाव, घ्या गाजर!
भाताला भाव, घ्या गाजर !
सोयाबीनला भाव, घ्या गाजर !
संत्र्याला भाव, घ्या गाजर !
आदी घोषणांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत सरकारने हमीभाव खाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कापसाच्या माळ्या व हातात गाजर घेत विरोधकांनी जोरदार निषेध आंदोलन केलं.
सर्वच लोकसभेच्या जागांवर भाजपचा डोळा असल्याची टीका शरद पवार गटातील नेते, आमदार रोहित पवार यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बार्गेनिंग पॉवर कमी आहे. मनोज जरांगेच्या चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे टार्गेट आहेत, का अशी शंका रोहित पवार यांनी उपस्थित केली. विधानसभेचे काम दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra assembly Interim Budget session 2024 LIVE updates in Marathi) आज तिसरा दिवस. विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी आंदोलनास सुरवात केली आहे. कापूस आणि गाजर हातात घेत विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली,
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.