Maharashtra Assembly interim Budget Session 2024  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Monsoon Session 2024 LIVE Updates : तृतीयपंथीयांना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेता येणार

Govt Scheme For Third Gender : तृतीयपंथीयांना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेता येणार

सरकारनामा ब्यूरो
Govt Scheme For Third Gender

Govt Scheme For Third Gender : तृतीयपंथीयांना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेता येणार 

• 'तृतीयपंथी धोरण २०२४' जाहीर

• भरतीप्रक्रियेत तसेच सर्व शासकीय योजनांमध्ये स्त्री-पुरूषांसोबतच 'तृतीयपंथी' हा लिंग पर्याय उपलब्ध तृतीयपंथी

• तृतीयपंथीयांना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेणे सुलभ

Maharashtra Budget 2024 : विद्यार्थ्यांसाठी या महत्त्वाच्या घोषणा 

  • इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी ३८ ते ६० हजार रुपयांपर्यंत निवासभत्ता

  • गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी ८२ शासकीय विश्रामगृहे स्थापन करण्यास मंजूरी.

Maharashtra Budget 2024 : शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्प काय तरतुदी  

• राज्यात गाव तिथे गोदाम योजनेसाठी 331 कोटींची तरतूद

• कापूस, सोयाबीन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 5000 रुपयांचे अर्थसहाय्य

• गाईच्या दुधासाठी 1 जुलैपासून प्रति लिटर 5 रुपयाचं अनुदान

• ई पंचनामा योजना राज्यभर राबवण्यात येणार

• शेतकऱ्यांना 1 रुपयात पीकविमा देण्याची योजना कायम राहणार

• राज्यातील पडीक जमिनीवर बांबू लागवड करणार

• शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी मागेल त्याला सौर पंप

Ajit Pawar in budget Session

Budget Session Live Updates : अर्थसंकल्प सादर करतांना अजित पवारांची शेरोशायरी

'तुफानों में संभलना जानते है!

अंधेरों को बदलना जानते है!

चिरागों का कोई मजहब नहीं है!

ये हर मेहफिल में जलना जानते है!

Budget Session Live Updates :  दिव्यांगांसाठी आनंद दिघे घरकुल योजना. 

विधवा, दिव्यांग, अनाथांना 1500 रुपये अनुदान.

Maharashtra Budget Session Live Updates : राज्यात जल युक्त शिवार अभियान 2 राबवले जाणार - अजित पावर यांची घोषणा

जलयुक्त शिवारसाठी

Maharashtra Budget 2024 : सिंधुदुर्गात स्कुबा डायव्हिंग केंद्र

Maharashtra Budget 2024 : शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी सरकार कटीबद्ध -अजित पवार

Budget Session 2024 : AI संशोधनासाठी विद्यापीठांना १०० कोटींचा निधी 

Budget Session 2024 : 8 लाख शेकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्यात येणार.

मागेल त्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप दिले जाईल. शेतकऱ्यांना मोफत वीजेसाठी सौरऊर्जा पंप मोफत देण्यात येणार आहे.

Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी..

राज्यातील पडीक जमिनींवर बांबू लागवड करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना बांबूची रोपे देण्यात येणार आहेत. वन्य प्राणी हल्ल्यात झालेल्या मृत कुटुंबाला निधीची मदत करणार आहे. ही रक्कम 20 लाखांवरुन 25 लाखांवर करण्यात आला आहे. रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार आहोत. 

Maharashtra budget : 1 जुलैपासून दूध उत्पादकांना 5 रूपये अनुदान. 

गायीच्या दुधाला 5 रूपये लीटर अनुदान देण्यात येणार.

Ajit Pawar Maharashtra Budget Session : गाव तिथे गोदाम योजना जाहीर. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर.

Maharashtra state budget live updates :10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी निधी देणार.

राज्यातील 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी 10 हजार रुपये देणार. यामधून 10 हजार रोजगार निर्माण होणार आहे.

Maharashtra Assembly Budget 2024-2025 Live Updates:

वर्षांला 3 गॅस देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू होणार. प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची मी घोषणा करत आहे. 

Maharashtra Assembly Budget 2024-2025 Live Updates:

सरकारी रूग्णालयात गर्भाशय कर्करोगाची तपासणी करणार आहे. विवाहीत मुलीसांठी शुभमंगल योजना लागू होणार आहे.

Ajit Pawa On Warkari : अजित पवारांची वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा

वारकरी महामंडळ स्थापन करणार आहे. त्यासह वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे.

Farmers movement Live Monsoon Session : विधान भवनाबाहेर दूध ओतले! शेतकरी आक्रमक, दूध दरवाढीचे पडसाद विधिमंडळात

गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहेत. दुधाच्या बाजारभावामध्ये वाढ करून 40 रु प्रति लिटर इतके करावे. अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी करीत आहेत. त्यांचे पडसाद आज विधिमंडळात उमटले.

आज दुपारी दोन वाजता महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर होणार आहे. 

विधान भवनाबाहेर शेतकऱ्यांचे दुध ओतून आंदोलन, राज्यभरात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक. दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन. गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी या मुद्द्यावर आंदोलन करत आहेत. मात्र या विषयावर तोडगा न निघाल्याने आज अशा पद्धतीचे आंदोलन शेतकऱ्यांकडून होतांना दिसत आहे.  

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE Updates

इथे पाहा विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचे कामकाज 

Devendra Fadnavis

Maharashtra state budget live updates: पुणे हिट अँड रन प्रकरणात पहिलीच लक्षवेधी. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिल्यांदाच सभागृहात माहिती. आरोपीवर 304चा गुन्हा दाखल. विधानसभेत पुणे कार अपघाताच्या मुद्द्यावर चर्चा. 

Maharashtra Budget 2024

Today Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE Updates : अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे. केंद्र सरकारच्या दूध भुकटी आयातीच्या निर्णयाचा विरोधकांनी निषेध केलाय. या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागतील असा आरोप विरोधकांनी केलाय. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचीही मागणी केली आहे. 

Maharashtra Assembly interim Budget

महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन गुरुवार पासून सुरु झाले आहे. आणि आज राज्याच्या आर्थकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज राज्याचा अर्थसकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, युवक वर्गांसाठी कोणत्या योजना जाहीर होतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं कंबर कसली आहे. राज्याच्या 2024-25 चा अर्थसंकल्प आज  विधिमंडळात सादर होणार आहे. त्यात अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पोतडीतून शेतकरी, महिला, युवक वर्गांसाठी योजनांचा पाऊस पाडण्यात येणार असल्याचं म्हणलं जात आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला फटका, चार महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्याचे आव्हान या पार्श्वभूमीवर हे 'इलेक्शन बजेट' ठरू शकेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT