Maharashtra Live Updates sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Session : विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी, काँग्रेस नेते आक्रमक

maharashtra assembly monsoon session 2025 vidhansabha adhiveshan mva vs mahayuti : राज्य विधीमंडळाचे अधिवेशनाच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

Roshan More

Sanjay Raut : संजय राऊताचा आमदार शेळकेंवर हजारो कोटीची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय. सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटीची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं आहे. देवेंद्रजी महाराष्ट्रातली लुटमार थांबवा असा उल्लेख त्यांनी या पत्रात केलाय. मावळचे आमदार सुनील शेळके त्यांनी एमआयडीसीच्या जमिनीवर खाण उद्योग सुरु करुन सरकारची हजारो कोटीची रॉयल्टी बुडवली असा आरोप संजय राऊत यांनी केला.

वीजपडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना 10 लाखाची मदत करा

वीजपडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना 10 लाखाची मदत करा, अशी मागणी अधिवेशनात काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वड्डेटीवार यांनी केली. तर, मात्र चार लाखाची मदत 10 लाख करा अशी मागणी वड्डेटीवार यांनी केली.

विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी, काँग्रेस नेते आक्रमक

विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी करत आहेत. महाविकास आघाडीतील नेते या घोषणाबाजीमध्ये सहभागी झाले आहेत. शक्तिपीठाविरोधात काँग्रेसनेते आक्रमक झाले असून शेतकऱ्यांची सरकारने फसवूक केल्याच्या घोषणा देण्यात येत आहेत. विजय वडेट्टीवार, सतेज पाटील या तसेच अंबादास दानवे देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT