Devendra Fadnavis Meet Uddhav Thackeray
Devendra Fadnavis Meet Uddhav Thackeray  sarkarnama
महाराष्ट्र

Video Devendra Fadnavis Meet Uddhav Thackeray : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंशी भेट, एकाच लिफ्टमधून...

Roshan More

Maharashtra Assembly Session : विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर दोघांमध्ये हस्तविनोद होताना दिसला. तर, त्यानंतर एकाच लिफ्टमधून उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात गेले. लिफ्टमध्ये जाताना दोघांमध्ये चर्चा होताना दिसून आले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी वेगळं समीकरण दिसणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

विधानभवनात उद्धव ठाकरे Uddhav Thackeray , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लिफ्टच्या बाहेर भेट झाली. लिफ्ट बाहेर ठाकरे फडणवीस एकमेकांशी चर्चा करताना दिसून आले. त्यानंतर दोघे एकाच लिफ्टमधून गेले. या लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह मिलिंद नार्वेकर, प्रवीण दरेकर हे देखील होते.

लिफ्टमध्ये नेमकी काय चर्चा

प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, मी लिफ्टमध्ये शिरत असताना देवेंद्रजी आणि उद्धवजी तेथे आले. त्यावेळी कोणीतरी म्हणाले की तुम्ही दोघे एकत्र आला हे पाहून समाधान वाटले. मात्र, उद्धवजी म्हणाले याला आधी बाहेर काढा. मी त्यांना म्हटलो तुमचे अजुनही समाधान झालेले दिसत नाही. होताय का एकत्र? त्यावेळी ते म्हणाले बोलता तसे करा. आमच्यात हस्यविनोद झाले. ते विरोधी पक्षाच्या दिशेने गेले आम्ही सत्तेच्या दिशेने. यामध्ये कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT