Maharashtra Assembly Session 2024 : एकाच लिफ्टमधून उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमधून विधानभवनात गेले. लिफ्टमध्ये जाताना दोघांमध्ये चर्चा होताना दिसून आले.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी वेगळं समीकरण दिसणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. यावर उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'ना ना करते प्यार कर बैठे असे काही नाही. ही भेट योगायोगाने झाली', असे स्पष्टच उद्धव ठाकरे यांनी सांगितले. भिंतीला कान असतात असे म्हणतात मात्र लिफ्ट कान नव्हते, असे म्हणत ठाकरेंनी फडणवीसांच्या भेटीने होणाऱ्या राजकीय चर्चा निरर्थक असल्याचे म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत चाॅकलेट दिले होते. हाच मुद्दा पकडून ठाकरे म्हणाले, सरकार वेगवेगळ्या योजनांची घोषणा आत्ता अधिवेशनात करेल.
मध्य प्रदेश प्रमाणे लाडकी बहिण की काय योजना ते आणत असल्याचे ऐकले आहे. चंद्रकांतदादा आज मला चॉकलेट देऊन गेले. तसचं त्यांनी मुलीच्या मोफत शिक्षणाच्या योजनचे चॉकलेट दिले होते ते पोकळ ठरले. त्यामुळे योजनांची चाॅकलेट देऊ नका, असे ठाकरे म्हणाले.
पीक विम्याचे पैसे मिळत नाही. कर्ज माफी करून ती निवडणुकीच्या आधी अंमलबजावणी करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. कर्ज माफीची घोषणाच फक्त करू नका अंमलबजावणी केल्यानंतर निवडणुकीला सामोरे जा, असे देखील ठाकरे Uddhav Thackeray म्हणाले. मी मुख्यमंत्री असताना पहिल्याच नागपूरच्या अधिवेशनात कर्ज माफी केली आणि त्याची अंमलबजावणी देखील केली.
प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, मी लिफ्टमध्ये शिरत असताना देवेंद्रजी आणि उद्धवजी तेथे आले. त्यावेळी कोणीतरी म्हणाले की तुम्ही दोघे एकत्र आला हे पाहून समाधान वाटले. मात्र, उद्धवजी म्हणाले याला आधी बाहेर काढा.
मी त्यांना म्हटलो तुमचे अजुनही समाधान झालेले दिसत नाही. होताय का एकत्र त्यावेळी म्हणाले बोलता तसे करा. आमच्यात हस्यविनोद झाले. ते विरोधी पक्षाच्या दिशेने गेले आम्ही सत्तेच्या दिशेने. यामध्ये कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.